Vidyut विलेपन Yachi माहिती विद्युत विलेपन याची माहिती

विद्युत विलेपन याची माहिती



Pradeep Chawla on 23-09-2018

विद्युत् विलेपन : वस्तूच्या पृष्टभागाचे गुणधर्म, तिची परिमाणे किंवा दर्शनी रूप बदलण्यासाठी तिच्यावर विद्युत् प्रवाहाच्या मदतीने धातूचा मुलामा देण्याची प्रक्रिया. पृष्ठभाग आकर्षक वा गुळगुळीत करणे, गंजणे व झीज (अपघर्षण) यांना असणारा रोध सुधारणे, इष्ठ ते विद्युतीय (उदा., उच्च विद्युत् संवाहकता) व चुंबकीय गुणधर्म प्राप्त करून देणे, झिजलेल्या व अयोग्य भागांची परिमाणे सुधारणे यांकरिता मुख्यत्वे विद्युत् विलेपन करतात. प्रकाशकीय परावर्तनक्षमता वाढविणे, विषारीपणा कमी करणे इ. हेतूंनीही विद्युत् विलेपन कमी प्रमाणावर केले जाते. गृहोपयोगी उपकरणे, सायकल, मोटारगाडी इ. वाहनांचे काही दर्शनी भाग यांवरील क्रोमियमाचे विद्युत् विलेपन त्या वस्तू आकर्षक दिसाव्यात म्हणून करतात. हे विलेपन झीजरोधक व संक्षारणालाही (गंजण्याच्या क्रियेलाही) रोधक असते. काटे-चमच्यांवरील चांदीचे व दागदागिन्यांवरील सोन्याचे पातळ विद्युत् विलेपन हे त्या वस्तू सुंदर दिसण्यासाठी असते. विशिष्ट विद्युतीय गुणधर्म आणण्यासाठी बऱ्याचदा सोन्याचे विद्युत् विलेपन करतात (उदा., स्पर्शकांच्या रूपातील विद्युतीय संपर्क स्थाने). पर्म-ॲलॉय हे लोखंड आणि निकेल यांच्या मिश्रधातूचे व्यापारी नाव असून या मिश्रधातूच्या बाबतीत चुंबकीय गुणधर्म सर्वांत महत्त्वाचे असतात. तांब्याच्या तांरावर या मिश्रधातूचे विद्युत् विलेपन करतात. आणि संगणकातील माहिती साठविण्यासाठी त्यांचा वापर करतात. बादल्या, पिंपे, डबे इत्यादींचा पत्रा, तसेच नट, बोल्ट यांच्यावरील जस्तलेपन गंजरोधक असते.



मराठी विश्वकोशात कथिलच्छदित पत्रे, गॅल्व्हानीकरण, जर व कलाबूत धातूंचे मुलामे, विद्युत् घट, विद्युत् धातूविज्ञान, विद्युत् रसायनशास्त्र, विद्युत् रासायनिक श्रेणी व विद्युत् विच्छेदन ह्या विद्युत् विलेपनाशी निगडीत असलेल्या स्वतंत्र नोंदी आहेत.



इतिहास : काही धातूंचे विलेपन प्राचीन काळापासून करण्यात येत होते. तथापि विद्युत् विलेपनाची सुरूवात 1800 साली झाली. त्या वर्षी व्होल्टा चिताचा शोध लागल्याने एकदिश (एकाच दिशेत वहनारा) विद्युत् प्रवाह पुरेसा प्रमाणात उपलब्ध झाला. त्याच वर्षी लोखंड पोलाद इत्यादींवर जस्त, तांबे व चांदी यांचे विद्युत् विलेपन करण्यात आले. याच सुमारास शिसे, तांबे इत्यादींच्या विद्युत् निक्षेपणासाठी (थर साचविण्यासाठी) विद्युत् घटमाला वापरण्यात आली.



मायकेल फॅराडे यांच्या विद्युत् चुंबकीय प्रवर्तनाच्या (चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत बदल केल्यास विद्युत् चालक प्रेरणा म्हणजे विद्युत् मंडलात प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा उत्पन्न होण्याच्या तत्त्वाच्या) शोधामुळे (1831) विद्युत् जनित्र (यांत्रिक ऊर्जेचे विजेत रूपांतर करणारे साधन) तयार करता आले आणि विजेचा चांगला स्त्रोत उपलब्ध झाला. 1840-41 च्या सुमारास विद्युत् विलेपन व्यापारी प्रमाणात वापरले जाऊ लागले. चांदी, सोने, तांबे व पितळ यांचे विद्युत् विलेपन करण्यासाठी उपयुक्त असलेल्या सायनाइड विद्रांवाचा शोध लागल्याने या उद्योगाच्या वाढीला गती मिळाली; उदा., सायनाइड-कॉपर विद्रावामुळे लोखंड व पोलाद यांच्यावर सरळ तांब्याचे चांगले विद्युत् विलेपन करता येऊ लागले. हा विद्राव अजूनही वापरतात. 1837 साली मॉरिट्झ याकोबी यांनी गॅल्व्हानो प्लॅस्टी ही प्रक्रिया शोधून काढली. हिला आता विद्युत् धातूरूपण म्हणतात व हिची अधिक माहिती पुढे दिली आहे. मात्र विद्युत् विलेपन उद्योगाचे जनक म्हणून सामान्यपणे जॉर्ज रिचर्ड्स एल्किंग्टन व हेन्री एल्किंग्टन यांचा उल्लेख करतात. कारण चांदीच्या विद्युत् विलेपणाचे ब्रिटनमधील पहिले (पेटंट) त्यांनी 1840 मध्ये मिळविले होते.



अभियांत्रिकी व सामग्री यांच्या सुविकसित स्वरूपामुळे वाढलेल्या गरजांतून हा उद्योग विकसित झाला व त्याचा व्याप वाढला. 1925 साली क्रोमियमाच्या विद्युत् विलेपणास सुरूवात झाली व हा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढला. क्रोमियमाचा मुलामा आकर्षक, चकचकीत व दीर्घकाळ टिकणारा असतो. विविध प्रकारच्या वाहनांचे भाग, घरगुती वापराची साधने इत्यादींवर क्रोमियमाचा मुलामा देण्याचे प्रमाण वाढत गेले. निकेल क्रोमियम तांबे निकेल-क्रोमियम असे मिश्र विद्युत् विलेपन करता येऊ लागले. क्रोमियमाच्या विद्युत् विलेपनातील यशस्वी वाटचालींमुळे निकेल, चांदी, तांबे व सोने या धातूंचाही अभियांत्रिकीय उपयोग वाढला.



विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत विद्युत् विलेपनासह इतर विद्युत् रासायनिक प्रक्रियासाठी विजेचा स्त्रोत म्हणून मुख्यतः चलित्र-जनित्र संच वापरीत असत या संचात विजेचे यात्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे एक चलित्र व एक वा अधिक जनित्रे यांत्रिक रितीने युग्मित केलेली (जोडलेली) असतात. त्यामुळे एका उदग्माचा विद्युत् दाब दुसऱ्या इष्ट विद्युत् दाबामध्ये बदलता येतो. नंतर या संचाऐवजी एकदिश कारक वापरण्यात येऊ लागले आता विद्युत् विलेपनासाठी लागाणारा बहुतेक सर्व विद्युत् प्रवाह उच्च विद्युत्त दाबांच्या प्रत्यावर्ती (अलटसुलट दिशांत वहनाऱ्या) विद्युत् प्रवाहाचे एकदिश कारकादिशकारमार्फत एकदिश विद्युत् प्रवाहात रूपांतर करून मिळवितात.






सम्बन्धित प्रश्न



Comments Om on 23-11-2023

विद्युत विलेपन याची माहिती

Diksha Bhoir on 15-09-2023

Viduta vilepan ya uapakramachi prasatavana,karyapadhati,sadarikarn,mulymapna chi mahiti marathimadhay

Junne on 10-12-2021

विद्युत विलेपन माहिती


S.k suhani kodweti on 26-05-2021

Vidyut vilepn aakuruti

Akash on 17-04-2021

Bag ke kitne per hote he





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment