Vidyut ViLepan चा Vapar MaRaathi विद्युत विलेपन चा वापर मराठी

विद्युत विलेपन चा वापर मराठी



Pradeep Chawla on 20-10-2018

वस्तूच्या पृष्टभागाचे गुणधर्म, तिची परिमाणे किंवा दर्शनी रूप बदलण्यासाठी तिच्यावर विद्युत् प्रवाहाच्या मदतीने धातूचा मुलामा देण्याची प्रक्रिया. पृष्ठभाग आकर्षक वा गुळगुळीत करणे, गंजणे व झीज (अपघर्षण) यांना असणारा रोध सुधारणे, इष्ठ ते विद्युतीय (उदा., उच्च विद्युत् संवाहकता) व चुंबकीय गुणधर्म प्राप्त करून देणे, झिजलेल्या व अयोग्य भागांची परिमाणे सुधारणे यांकरिता मुख्यत्वे विद्युत् विलेपन करतात. प्रकाशकीय परावर्तनक्षमता वाढविणे, विषारीपणा कमी करणे इ. हेतूंनीही विद्युत् विलेपन कमी प्रमाणावर केले जाते. गृहोपयोगी उपकरणे, सायकल, मोटारगाडी इ. वाहनांचे काही दर्शनी भाग यांवरील क्रोमियमाचे विद्युत् विलेपन त्या वस्तू आकर्षक दिसाव्यात म्हणून करतात. हे विलेपन झीजरोधक व संक्षारणालाही (गंजण्याच्या क्रियेलाही) रोधक असते. काटे-चमच्यांवरील चांदीचे व दागदागिन्यांवरील सोन्याचे पातळ विद्युत् विलेपन हे त्या वस्तू सुंदर दिसण्यासाठी असते. विशिष्ट विद्युतीय गुणधर्म आणण्यासाठी बऱ्याचदा सोन्याचे विद्युत् विलेपन करतात (उदा., स्पर्शकांच्या रूपातील विद्युतीय संपर्क स्थाने). पर्म-ॲलॉय हे लोखंड आणि निकेल यांच्या मिश्रधातूचे व्यापारी नाव असून या मिश्रधातूच्या बाबतीत चुंबकीय गुणधर्म सर्वांत महत्त्वाचे असतात. तांब्याच्या तांरावर या मिश्रधातूचे विद्युत् विलेपन करतात. आणि संगणकातील माहिती साठविण्यासाठी त्यांचा वापर करतात. बादल्या, पिंपे, डबे इत्यादींचा पत्रा, तसेच नट, बोल्ट यांच्यावरील जस्तलेपन गंजरोधक असते.







सम्बन्धित प्रश्न



Comments Dinesh on 06-10-2021

Gold ki silver k upper plating karate ke process

Bala on 08-12-2019

विद्युत विलेपन उपक्रम मराठी

सुलतान on 06-02-2019

Vidyut vilepan acha dainandin Jagannathpur Adhik mahiti in Marathi






नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment