विविध पक्षांची माहिती

Vividh पक्षांची Mahiti

GkExams on 25-11-2018

पक्षी हे दोन पायांवर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशीय जीव आहेत. जीवशास्त्रानुसार पक्ष्यांची व्याख्या फेदर्ड बायपेड अशी होते. याचा अर्थ पिसे असलेले दोन पायांचे प्राणी. पक्ष्यांचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. ही क्षमता पक्ष्यांना इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. पेंग्विन व शहामृग असे फारच थोडके पक्षी वगळता इतर सर्व पक्ष्यांना उडता येते. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पिसे. सर्व पक्ष्यांना पिसे, चोच व चार कप्याचे हृदय असते. हृदयाच्या चार कप्यांमुळे पक्षी उष्ण रक्ताचे आहेत. पिसांच्या व चोचीच्या रचनेमुळे पक्षी वजनाने अतिशय हलके असतात. पिसे त्यांचे थंडीपासून सं‍रक्षण करतात व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उडण्याची शक्ती देतात.1 चोच , 2 डोके, 3 पापणी, 4 बुब्बुळ, 5 Mantle, 6 Lesser coverts, 7 Scapulars, 8 Median coverts, 9 Tertials, 10 Rump, 11 Primaries, 12 बूड, 13 जांघ, 14 Tibio-tarsal articulation, 15 Tarsus, 16 पाय, 17 नडगी, 18 पोट, 19 Flanks, 20 छाती, 21 गळा, 22 Wattle

पक्ष्यांचे शरीराचे तापमान 38° ते 44° इतके असते व ते साधारणपणे सस्तन प्राण्यांपेक्षा थोडेच जास्तच असते. त्यांची पिसे ही उत्तम उष्णतारोधकाचे काम करतात, त्यामुळे त्यांना शरीराचे तापमान कायम ठेवणे सोपे जाते. पिसांचा उपयोग थंड प्रदेशात अतिशय चांगला होतो व जर खाणे पिणे व्यवस्थित मिळाल्यास बाहेरील तापमान कमी असतानाही अतिशय निवांतपणे जीवन कडक थंडीतही व्यतीत करतात. परंतु याच उष्णतारोधक पिसांचा त्यांना उष्ण वातावरणात तोटा होण्याची शक्यता असते. पक्ष्यांची हालचाल इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा जास्त असते त्यामुळे त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर उष्णतादेखील निर्माण होते. सस्तन प्राण्यांमध्ये घाम आणणार्‍या स्वेद ग्रंथी असतात. त्या तापमान नियंत्रणाचे काम करतात. पक्ष्यांना अश्या स्वेद ग्रंथी नसतात. यामुळे उष्ण तापमानात हालचालीमुळे त्यांना ताप येउन मृत्यू ओढावण्याची शक्यता झाली असती. परंतु, निसर्गाने त्यांना फुफ्फुसांमध्ये हवेचे फुगे दिले आहेत. त्यांमुळे पक्ष्यांचे जादा उष्णता निर्मूलनाचे काम पटकन होते.


पक्ष्यांची पिसे विविधरंगी असतात. पक्ष्याला शरीराच्या विविध भागांवर अनेक रंगाची पिसे असतात. हे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसर्‍या जातीच्या पक्ष्याहून वेगळे करतात. नर-मादीचे रंगही वेगळे असतात. सामान्यतः पक्ष्यांमध्ये नर अधिक सुंदर असतो.


कुठल्याही पक्ष्याला तीन प्रकारची पिसे असतात.

 1. बाह्य पिसे- ही पिसे सर्वांत बाहेरची असतात.यांना काँटूर पिसे अथवा पेने असे म्हणतात. याच पिसांचे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसर्‍या जातीपासून वेगळे ठरवतात. यांत साधारणपणे शेपटीची पिसे, उड्डाणांची पिसे व इतर बाह्य पिसे यांचा समावेश होतो.
 2. अंतर्बाह्य पिसे- या पिसांना प्ल्युमुले असे म्हणतात. ही पिसे लवचीक असतात व बाह्य पिसांखाली दडलेली असतात.
 3. अंतर्गत पिसे- ही पिसे सर्वांत आतमध्ये असतात व केसांच्या लवीप्रमाणे दिसतात. जोपर्यंत वरची पिसे आहेत तोवर ही पिसे दिसत नाहीत. ही पिसे उड्डाणात भाग घेत नाहीत.
 4. पक्षांना हृदयाचे केवळ 3 भाग असतात.

पंखांची रचना व उडणे

वेगवेगळे खाद्य मिळविण्यासाठीच्या उडतानाच्या हालचालींना अनुरूप अशी पक्षांच्या पंखांची रचना असते.

 1. एकाच ठिकाणी पंख न हालविता तरंगणे
 2. जलद झेप
 3. पंखाची थोडी उघडझाप करून हवेत तरंगणे
 4. हवेत तरंगताना मधेच पंखांची जलद फडफड
 5. पंखांची जलद फडफड करून जलद उड्डाण
 6. भरारी मारत असतांना मधेच पंख मिटणे
 7. कमी उंचीवर असताना पंखांची अतिजलद फडफड
 8. सरळ उड्डाण व जलद फडफड

चोच

पक्ष्यांच्या चोचींचे उपयोगानुसार विविध प्रकार -


1) मासे पकडण्यासाठी दातऱ्या असलेली.


2) दलदल किंवा चिखलातून अन्न गाळून घेण्यासाठी.


3) पाणी/चिखलातील अन्न शोधण्यासाठी.


4) लाकूड तासण्यासाठी.


5) फुलातील मध खाण्यासाठी .


6) बिया/कठीण कवचाची फळे फोडून खाण्यासाठी.


7) मास चिरण्यासाठी व फाडून खाण्यासाठी.


8) कापण्यासाठी.

विविध जाती व कुळे

जगात पक्ष्यांच्या साधारणपणे एकूण 8,600 जाती आहेत. उपजाती व स्थानिक बदल लक्षात घेतल्यास हा आकडा 30,000 च्यावर जाईल. त्यापैकी सुमारे 265 जाती नामशेष झाल्या असाव्यात.

वर्तन

बहुतांशी पक्षी हे दिनचर आहेत. फारच थोडे पक्षी हे निशाचर असतात. घुबडांमधील बहुतांशी जाती निशाचर आहेत. तसेच रात्रबगळा, टिटवी हे काही पक्षी निशाचर आहेत.

खाद्य

Feeding adaptations in beaks

पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते. फुलांतील मकरंद, फळे, लहान रोपे, बिया, छोटे प्राणी, साप, व विविध प्रकारचे किडे पक्षी खातात. काही शिकारी पक्षी वगळता किडे हे बहुतांशी पक्ष्यांचे आवडते अन्न आहे. किंबहुना किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीच पक्ष्यांचा जन्म झाला आहे असे मानण्यात येते. पक्ष्यांना दात नसल्याने ते चोचीने खाद्य प्रथम जितके लहान आकारात तोडता येईल तितके तोडतात व लगेच गिळतात. चर्वणाची पुढील प्रक्रिया पोटात पार पडते .शेवाळ् हे महत्ववाचे अन्न आहे..

स्थलांतर

ठरल्या वेळी एका मुलखातून दुसऱ्या मुलुखात स्थलांतर करायचे व नंतर नियमितपणे परतायचे हे पक्ष्यांच्या स्थलांतराचे खास लक्षण आहे. उडण्याच्या वरदानामुळे पक्षी इतर प्राण्यांपेक्षा जास्त लांबवर स्थलांतर करतात. पक्ष्यांचे स्थलांतरास अनेक कारणे असतात त्यातील कारणे खालीलप्रमाणे :-

 1. अन्नाची उपलब्धता -
 2. हवामान- थंड हवामान सोसण्याची क्षमता- पक्ष्यांची थंडी सोसण्याची क्षमता चांगली असते तरी युरोप, सायबेरियातील पक्षी येथील अतिकडक हिवाळा आवाक्याबाहेरचा असतो. म्हणून या भागातील पक्षी दक्षिणेकडील उबदार प्रदेशात म्हणजे, उत्तर अफ्रिका, मध्यपूर्व इराण, भारतीय उपखंडात व आग्नेय अशियात स्थलांतर करतात. युरोप व सायबेरियातील उन्हाळ्यामध्ये या भागात खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते व पक्षी पुन्हा सायबेरिया व युरोपात स्थलांतर करतात.
 3. जनुकीय सवयी- लक्षावधी वर्षांची स्थलांतराची सवय यामुळे बहुतांशी स्थलांतरित पक्ष्यांच्या जातींमध्ये जन्मतः स्थलांतराचे ज्ञान असते. - उदा; पेरू व चिली देशातील काही पक्षी, जनुकीय सवयींमुळे अन्न उपलब्ध नसलेल्या भागातही स्थलांतर करतात.
 4. सुरक्षितता - शिकाऱ्यांपासून सुरक्षितता
 5. पिल्लांच्या प्रशिक्षणासाठी
 6. उदाहरणार्थ: ककू-हे उत्तर प्रदेशातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येतात. ऑगस्टमध्ये दक्षिण भारताकडे स्थलांतर करतात.

पक्ष्यांचे महत्त्व

पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, बीजप्रसार होतो, निसर्गाची सुंदरता वाढते. सकाळी सकाळी पक्ष्यांचे सुमधुर आवाजाने आपण ताजेतवाने होतो.

शेतकऱ्यांचे मित्र

साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या कोंबड्या, शेळ्या असे अनेक प्राणी शेतकऱ्याचे मित्र असतात. सर्व पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात अशी एक गैरसमजूत आहे. काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सारपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात.


पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी कॅरोलविना पॅराकीट या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पीक उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या. सायंकाळच्या वेळी शेतामध्ये आपल्यला पक्ष्याचे थवे बघायला मिळतात. ते बघून मन प्रसन्ना होते.

पुस्तक

शेतकऱ्यांच्या 'मित्रां'वर डॉ. राजू कसंबे यांनी 'शेतातील पक्षी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

भारतीय पक्षी

पक्ष्यांच्या 8500 पैकी भारतात एकूण 1200 जातीचे पक्षी आढळतात. स्थानिक जातींप्रमाणेच स्थलांतरित जातींचीही संख्या पुष्कळ आहे. कावळा, कबूतर व चिमणी हे भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे पक्षी आहेत. भारतात आढळणार्‍या पक्ष्यांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठी-इंग्रजीत आहेत. त्यांपैकी काही ही :-

 • निसर्गाचे मित्र (दैनिक सकाळमध्ये आठवड्यातून एकदा असे सतत तीन वर्षे प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह; लेखक मिलिंद गुप्ते)
 • महाराष्ट्रातील 100 सामान्य पक्षी (मोफत ई-पुस्तक)(लेखक - डॉ. राजू कसंबे)
 • पक्षीजगत (लेखक - सचिन मेन)
 • पक्षिकोश (लेखक - मारुती चितमपल्ली)
 • पक्षीही सुस्वरें (लेखक - डॉ. सतीश पांडे)
 • पक्षांचे स्थलांतर लेखक - डॉ. सतीश पांडे)
 • पक्षी - आपले सख्खे शेजारी - किरण पुरंदरे
 • पक्षी - पाणथळीतले – किरण पुरंदरे
 • शेतातील पक्षी (मोफत ई-पुस्तक)(डॉ. राजू कसंबे)
 • A Pictorial guide to the Birds of the Indian Subcontinent ( इंग्रजी; लेखक - डॉ. सलीम अली आणि एस. डिलॉन रिप्ले)
 • Birds of Maharashtra (इंग्रजी; लेखक - डॉ. सतीश पांडे, प्रमोद देशपांडे आणि निरंजन संत)
 • Birds of Lonavala Khandala (इंग्रजी; लेखक - डॉ. सतीश पांडे)
 • Birds of Southern India (Helm Field Guides) (इंग्रजी; लेखक - रिचर्ड ग्रिमेट आणि टिम इन्स्किप)
 • Birds of Sri Lanka (Helm Field Guides) (इंग्रजी; लेखक - दीपल वराकगोडा, कॅरोल इन्स्किप, टिम इन्स्किप आणि एकजण)

पक्षी निरीक्षण

पक्षीनिरीक्षण हा अतिशय आनंददायक छंद आहे. त्याची सुरुवात करतानाच्या काही मुलभूत गोष्टींचा येथे उहापोह केलेला आहे.


पक्षी निरीक्षण कोठे करावे


पक्षीनिरीक्षणासाठी जंगलात जावे लागते असे नाही. आपल्या घराजवळशहरी बगिच्यात,रहदारीच्या रस्त्यावर सुद्धा पक्षी असतात. अर्थात प्रत्येक ठिकाणी त्यांची विविधता कमी अधिक प्रमाणात असते. त्यामळे आपणास जमेल तसे पक्षीनिरीक्षणास सरुवात करता येते.खूप दूरच्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यास आपल्या परिसरातील मोजक्या पक्ष्यांची वर्तणूक अधिक सखोल निरीक्षणे नोंदवून ठेवावीत. त्यामुळे आपल्याला पक्ष्यांच्या जीवनात डोकावूनबघता येईल. कुठल्याही गावाच्या, खेड्याच्या बाहेर असलेले माळरानझुडूपी जंगल, नदी नाले कितीतरी प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास असते. अशा ठिकाणी पक्षीनिरीक्षणाला गेल्यास वेळ सत्कारणी लागतो.


पक्षी निरीक्षणाला कधी जावे


बहुतेक प्रजातीचे पक्षी (दिवाचार) सकाळी व सायंकाळी जास्त क्रियाशील असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी पक्षी निरीक्षणाला सल्यास जास्त गतिविधि बघायला मिळते. पक्ष्यांचे गायन, उदा. दयाळ (Oriental Magpie Robin ), नाचण (Fantail), भूकस्तूर (Grounthrush), शामा (Shama), कोकीळ ऐकायचे असतील तर मात्र सूर्योदयापूर्वी इच्छित स्थळी पोचने पाहिजे. काही पक्षी मात्र सायंकाळी व रात्री कार्यशील (निशाचर) असतात, उदा. घुबड, पिंगळारातवा, करवानक (Stone-Curlew or Thick-knee). हे पक्षी बघायचे असतील, त्यांचे आवाज ऐकायचे असतील मात्र सायंकाळी अथवा रात्री बाहेर पडायला हवे. हिवाळ्यात आपल्या देशात अनेक प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात व उन्हाळ्यात अनेक स्थानिक पक्षी वीण करतात. त्यामुळे तिन्ही ऋतू पक्षी निरीक्षण करायला चांगले असतात.

Comments निष्कर्ष on 22-04-2021

निष्कर्ष

Ganesh Kale on 04-02-2020

Morache avadte khadayआप यहाँ पर विविध gk, पक्षांची question answers, general knowledge, विविध सामान्य ज्ञान, पक्षांची questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment