माझे महाविद्यालय निबंध

माझे Mahavidyalaya Nibandh

Pradeep Chawla on 12-05-2019

‘‘घराजवळच्या ‘डेव्हिड ससून’मध्ये असलेली वंचित मुलं मी पाहत होते. तिथे

गेले आणि कायमची तिथली होऊन गेले. आई-वडील नसलेली, देवदासींची, व्यसनी

व्यक्तींची मुलं, रस्ता हेच घर असणारी अशी अनेक मुलं.. मायेची पाखर हवी

असणारी.. त्यांनीच मला जगणं शिकवलं, ही मुलं म्हणजे माझं विद्यापीठ आहे,’’

सांगताहेत गेली ‘एकलव्य न्यास’ संस्थेच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देऊन

स्वत:च्या पायावर उभं करणाऱ्या रेणू गावस्कर.
आपण ज्याला ‘टर्निग पॉइंट’

म्हणतो, तो खरंच तसा असतो की सावकाशपणे आयुष्य बदलवून टाकणारी प्रक्रिया

असते? मागे वळून बघताना, ज्या कामाशी मी जोडली गेले, प्रतिकूलतेशी

सातत्यानं झुंजणाऱ्या ज्या व्यक्तींशी जवळीक झाली, त्या कामाकडे, त्या

माणसाकडे बघताना मला असं वाटतं की, एखादा टर्निग पॉइंट येतोही माणसांच्या

आयुष्यात. ती एखाद्या वेगळ्या जगाकडे ओढली जातात, पण त्यानंतर घडत जाणारी

प्रक्रिया व त्यातून मिळणारं सहज शिक्षण अगदी आतून बदल घडवून आणतात,

व्यक्तीच्या आयुष्यात!
साधारण तेहतीस-चौतीस वर्षांपूर्वी सहा

महिन्यांच्या कालावधीत माझ्या आई-वडिलांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाला.

तेव्हा मी पंचविशी गाठली होती. वडिलांचा मृत्यू कर्करोगानं झाला व तो

सर्वस्वी अनपेक्षित होता. आईचा शेवट मात्र आमच्या घराचं दार कित्येक र्वष

ठोठावत होता. आई पंधरा वर्षांहूनही अधिक काळ अंथरुणाला खिळून होती व ती

गेली तर निदान भोगत असलेल्या यातनांचा शेवट होईल, असं डॉक्टरांसह सर्वानाच

वाटत होतं. असं असलं तरीही आई-वडील गेल्यावर मला धक्का तर बसलाच आणि एकटंही

वाटलं खूप. आपल्याला कोणी नाही, असं वाटून दु:खी झाले मी.
यातून एक

विचारप्रक्रिया सुरू झाली. या दिवसात माझं वाचन अनेक दिशांनी चाललं होतं.

वाचनाचा, खासकरून आत्मचरित्रात्मक पुस्तकांच्या केलेल्या वाचनाचा मला

चांगलाच फायदा झाला. आजही तो होतो आहे. ज्याला ‘बिटवीन द लाइन’ म्हणतात, ते

वाचन कसं करावं हे पुस्तकच शिकवतात आपल्याला. घरातून मिळणारं कमालीचं

उत्तेजन, चांगलं वाचन व आई-वडिलांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी या

तिघांनीही आपल्या भवतालाकडे बघण्याची, नुसतं बघण्याची नव्हे तर त्याचं

निरीक्षण करून, त्याच्याशी जोडून घेण्याची एक उत्तम संधी मला दिली. यातलं

माझं श्रेय इतकंच की ती संधी मी घेतली.
त्या वेळी (30 वर्षांपूर्वी) मी

मुंबईत राहत होते. माटुंगा रेल्वे स्थानकाच्या समोर असलेली ‘डेव्हिड ससून

इंडस्ट्रियल स्कूल’ ही संस्था आमच्या घराच्या जवळ होती. जाता-येता

खिडकीच्या गजांना धरून बाहेरच्या जगाकडे बघणारी व संस्थेच्या चार भिंतींत

बंदिस्त असलेली मुलं नेहमी दिसत असत व त्या मुलांना बघताना मन अस्वस्थ होऊन

जाई. या बंदिस्त, उंच भिंती असलेल्या, भलं मोठं तुरुंगसदृश दार असलेल्या

संस्थेत मुलांना बंद का करत असतील, असा व तद्नुषंगिक अनेक प्रश्न सतत मनात

डोकवायला लागले व एक दिवस त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मी संस्थेत गेले व

तिथलीच होऊन गेले.
या भल्यामोठय़ा देशात दारिद्रय़, विषमता, पालकांची

व्यसनाधीनता यामुळे मुलाचं बालपण हरवत असणार हे माहीत होतं. आता मी ते

प्रत्यक्ष बघत होते. दहा-बारा वर्षांची मुलं घरच्या हिंसाचाराला,

दारिद्रय़ाला कंटाळून घरातून पळून मुंबईनामक महानगरात येत होती. हरवून जात

होती, तर कधी पोलिसांपर्यंत पोचत होती. शेवटी पोलिसांनी बाल न्यायालयापुढे

उभं केल्यावर वयाप्रमाणे विविध काळापर्यंत संस्थेत राहत होती.
ही माझी

खऱ्या अर्थानं शाळा, विद्यापीठ काही म्हणा! भीषण सत्य मला बघायला मिळालं.

कुठून कुठून केवळ पोट भरायला आलेली मुलं. त्यांच्याशी माझे वीस

वर्षांपर्यंत अव्याहत धागे जुळले.
त्यानंतर हे माझं छोटंसं जग विस्तारित

होत गेलं. ‘एकलव्य न्यास’ या संस्थेच्या रूपाने. त्यात कधी आई-वडील नसलेली

मुलं आली. (अनाथ हा शब्द मी कटाक्षानं टाळते आहे. त्यातलं बिच्चारेपण

नकोसं वाटतं). देवदासींची, व्यसनी व्यक्तींची मुलं आली व अक्षरश: रस्ता हेच

घर असणारी मुलंही आली. आमचं असं एक मोठं घर बनलं. प्रत्येक यशस्वी

पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. इथं मला प्रत्येक असहाय मुलामागे

एक तेवढीच असहाय आई दिसत होती. त्या बाईचं हिमोग्लोबिन चिंता वाटावी किंवा

भीती वाटावी इतकं कमी होतं. तरीही ना गर्भारपण वा बाळंतपण यांच्या चक्रातून

ती सुटू शकत होती की नवऱ्याच्या मारापासून स्वत:चा बचाव करू शकत होती.

देहविक्रयाच्या खाईत लोटल्या गेलेल्या स्त्रियांचे प्रश्न तर त्याहून वेगळे

होते.
मुलं आणि स्त्रिया व त्यांची टोकाची वंचितता बघताना मला फार

अस्वस्थ वाटायचं. अस्वस्थ वाटतं आणि अस्वस्थ वाटत राहील. आयुष्यातील अगदी

साध्यात साध्या सुंदर क्षणाला वंचित झालेली ही माणसं त्यांना हे दुर्मीळ

आनंदाचे क्षण मिळवून देण्यासाठी मनाचा दृढनिश्चय कधी झाला कळलंच नाही.

त्यांच्या जगाचाच एक भाग बनून गेले आणि माझ्या घराच्या संकुचित भिंती

विस्तारत गेल्या.. आज आठवतात असे काही प्रसंग ज्यामुळे या मुलांचं जगणं

माझं होत गेलं.. मी मोठी होत गेले..
आमच्या संस्थेतल्या मुलांना

ख्रिसमस पार्टीचं आमंत्रण आलं तशी मुलं आनंदानं अगदी फुलून आली. तसं बघायला

जाता सामाजिक संस्थांमधील मुलांना अनेक ठिकाणी बोलावलं जातं. दिवाळी,

नवरात्र, गणपती, एक ना दोन, समारंभांना, मेजवान्यांना जायची संधी खास करून

महानगरांमधून मिळत असते. या मुलांचं बरंच काही हिरावलं गेलंय. ही जाणीव

माणसांना असते, पण तरीही ख्रिसमस पार्टी मुलांना खूप आवडते. याचं सगळ्यात

महत्त्वाचं कारण म्हणजे तिथं उपस्थित असलेला सांताक्लॉज. लाल-पांढऱ्या

वेशातला, दाढी असलेला, नाचरी, थिरकती पावलं टाकीत मुलांपाशी येणारा व

त्यांना वेगवेगळ्या भेटी देणारा सांताक्लॉज मुलांना फार फार प्रिय असतो. तो

रात्रीच येतो. ख्रिसमस ट्रीला अडकवलेल्या मोज्यात भेटवस्तू ठेवतो हे

त्यांना अगदी खरं खरं वाटतं. कधी जायचं, काय करायचं याचे बेत रचले जाऊ

लागले..
ख्रिसमस पार्टीहून मुलं आली.. आणि तिथं काय घडलं, खेळ कोणते

होते, खायला काय मिळालं हे सांगण्याची अगदी अहमहमिका सुरू झाली. त्यातच

कोणीतरी मुलांनी हे सगळं लिहावं असा बूट काढला. एरवी लिहिण्याचा भारी

कंटाळा असणाऱ्या मुलांनी या वेळी मात्र लिहिण्याची कल्पना एकदम उचलून धरली व

तासा-दोन तासांतच निबंधांची भेंडोळी घेऊन मुलं समोर हजर झाली.
मुलं

आपापले निबंध हौसेनं वाचून दाखवीत होती आणि आम्ही सारे जण ऐकत होतो.

स्तब्धपणे! निबंध वाचून संपले. मुलांचं कौतुक झालं व मुलं पांगली. त्याच

क्षणी आम्ही सगळ्या मोठय़ांनी (वयानं) एकमेकांकडे पाहिलं. आम्हा सर्वानाच एक

गोष्ट जाणवली होती एवढं निश्चित. सर्व निबंधांमध्ये एका बाबीचा उल्लेख

विस्तारानं झाला होता. सगळ्या मुलांनी लिहिलं होतं की, या वर्षी प्रथमच

ख्रिसमस पार्टीला अंध, मूक-बधिर आणि शारीरिकदृष्टय़ा विकलांग मुलं आली होती.

त्यातल्या अंध मुलांना ख्रिसमस ट्री व त्यावर लटकणारे दिवे, आरास बघता येत

नव्हती. मूक-बधिर मुलांना गाणी ऐकू येत नव्हती, त्यामुळे त्यांना नृत्याचा

ताल पकडता येत नव्हता, ते गाणी म्हणूही शकत नव्हते. कुबडय़ा घेऊन नाचायचा

प्रयत्न करणारी एक मुलगी तर पडली व तिला चांगलंच खरचटलं वगैरे वगैरे वगैरे.
मुलांनी

हे सगळं तर लिहिलं होतंच, पण त्याचसोबत एक वाक्यही प्रत्येकाच्या निबंधात

होतंच. ते म्हणजे मुलांना ते बघताना अतिशय वाईट वाटलं होतं. (याला एकही

अपवाद नव्हता) पण हे वाईट वाटणं केवळ भावनेपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं.

प्रत्येकानं आपापल्या परीनं त्या मुलांना समारंभात मदत करण्याचा प्रयत्न

केला होता. उदा. एकानं आपल्या हातातले सगळे फुगे त्यातल्या अंध मुलाला बहाल

केले होते. दुसऱ्यानं ऐकू न शकणाऱ्या मुलाला हात धरून नाचायला शिकवलं

होतं. एका मुलीनं तर नाचताना पडलेल्या त्या मुलीची सोबत करणं पसंत केलं

होतं.. मुलांनी ते सगळं लिहिलं होतं. त्यांचा भवतालाशी इतका जवळचा संबंध

होता, त्या भवतालातली सुखं-दु:खं त्यांना इतकी हलवून जात होती, हे समजून

घेताना आम्ही गलबलून गेलो.
शारीरिकदृष्टय़ा विकलांग असणाऱ्या मुलांसाठी

इतकी खोल संवेदना बाळगणाऱ्या या मुलांच्या वाटय़ाला आलेलं सामाजिक वास्तव

किती भीषण होतं! आपले पालक कोण याचं उत्तर माहीत नसलेली, माहीत असलं तरी

त्यांच्याविषयी (खास करून आईविषयी, तुझी आई काय करते अशासारखा प्रश्न) कोणी

काही विचारलं तर लाजेनं मान खाली घालावी लागणारी, व्यसनाधीन वडिलांमुळे

पावलोपावली अपमानांचा सामना करणारी ही मुलं! सामाजिक संदर्भातील केवढी मोठी

वंचना त्यांच्या वाटय़ाला आली होती व तरीही त्यांच्या हृदयात एक निर्मळ

प्रेमाचा झरा वाहत होता. इतर मुलांपाशी जे नाही ते त्यांना द्यावं असं

त्यांना मनापासून वाटत होतं. इतर मुलांचं दु:ख भिडावं त्यातून कृती घडावी

एवढी संवेदनशीलता त्यांच्यापाशी होती.
यातला कळीचा प्रश्न एवढाच आहे

की, ही संवेदनशीलता समाज मुलांशी असलेल्या वेगवेगळ्या नात्यातून जपतो आहे

का? मोठी माणसं मुलांशी अनेक नात्यांनी जोडलेली असतात. कधी ती मुलांचे

शिक्षक असतात, कधी पालक (आई-वडील), कधी आजी- आजोबा, तर कधी मित्र. या

सगळ्या नात्यांना आपण खऱ्या अर्थानं न्याय देतो आहोत, मुलांनी दाखवलेल्या

संवेदनशीलतेला जपतो आहोत का, असा प्रश्न जर आपण स्वत:ला विचारला तर खरच

किती जणांना याचं उत्तर होकारार्थी देता येईल?
हा कळीचा मुद्दा मला फार

महत्त्वाचा वाटतो. शिवाय हा केवळ भावनिक मुद्दा नसून तो शैक्षणिक आहे, असं

मला ठामपणे वाटतं. मुलं संवेदनक्षम तर असतातच पण त्यांना छोटी-मोठी का

होईना, मोठय़ांनी जबाबदारी सोपवावी असं वाटतं. पण कोणती जबाबदारी येते

त्यांच्या वाटय़ाला?
आमच्या संस्थेत येणारी कितीतरी मुलं रस्त्यावर तासचे

तास उभी राहून फुलं विकत होती, गजरे विकत होती, प्रसंगी भीक मागत होती.

उन्हातान्हाची, पावसापाण्याची पर्वा न करता ही मुलं काम करत होती. त्याच

वेळी उच्च, कनिष्ठ मध्यम वर्गातली मुलं काय करत असतात? त्यांच्यावर मार्क

मिळवण्याची एकमेव जबाबदारी सोपवली गेलेली असते. त्यांनी आपल्या आजूबाजूला

जे काही चाललं आहे, त्याकडे लक्ष देऊ नये, केवळ अभ्यास करावा, घोकंपट्टी

करावी, जे समजत नाही ते देखील पाठ करावं आणि परीक्षेत तेच उतरवून मार्क

मिळवावेत.
मग दोन्ही वर्गातील मुलांची काय अपेक्षा असते मोठय़ांकडून?

एकमेकांना जराही स्पर्श न करणारी ही जगं, एकमेकांसमोर येतात तेव्हा किती

भयंकर स्थिती होते त्यांची? आपला परस्परांशी काही संबंध आहे, याचा

थांगपत्ता नसणारी ही मुलं गोंधळून जातात व बहुतेक वेळा वास्तवापासून पळ

काढतात.
मुलांच्या जगातील या छोटय़ा छोटय़ा अपेक्षांतून, मागण्यांतून

मोठय़ा माणसांना खूप शिकण्यासारखं असतं. निदान मला तरी याच माध्यमातून मी

काही शिकले असं वाटतं. काही वर्षांपूर्वी देवदासींच्या मुलांच्या एका शाळेत

जायला लागले तेव्हा त्यांचं आणि माझं जग यांना जोडून कसं घ्यावं हेच मला

समजेना. त्याच्या जगातील वंचितता किती भीषण होती. ती मुलं स्वत:विषयी,

त्यांच्या जगाविषयी काहीच सांगू शकत नसत. मग आपण आपल्या जगाविषयी काय

सांगणार त्यांना? त्यांना छान वाटावं, त्यांच्या मनातील स्वप्रतिमा उजळ

व्हावी यासाठी काय करावं आपण, असे विचार मनात यायला लागले आणि एकाएकी

युक्ती सुचली. पत्ते शोधण्याच्या बाबतीत माझं ज्ञान अत्यंत तोकडं आहे, या

गोष्टीचा वापर करून घेत, त्यांच्या गल्लीबोळातून मला मुख्य रस्त्यावर आणून

सोडण्याचं काम त्यांच्यावर सोपवलं आणि आमच्या नात्याची गुंफण एकदम पक्की

झाली. अगदी पहिली-दुसरीतली मुलंदेखील माझा हात धरून मला मुख्य रस्त्यावर

आणून सोडत. नीट जाल ना, घरी पोचाल ना, असं परत परत विचारत आणि मगच जड

पावलांनी आपल्या घराकडे त्यांचे मोहरे वळत.संबंधित बातम्या
 • अपराधीपणाच्या भावनेनेच अमानुषता थांबेल..
 • प्रसिद्ध लेखक, रंगकर्मी मुरलीधर खैरनार यांचे निधन
 • लेखक, प्रकाशक आणि जी. एस. टी.!
 • शिक्षण हक्काप्रमाणे मुलांसाठी खेळण्याचा हक्क हवा- रेणू गावसकर
 • भवताल आणि ‘भूमि’का
 • साहित्यिकांनी राजकारण्यांचे अनुकरण करू नये- शरद पवार
 • अपराधीपणाच्या भावनेनेच अमानुषता थांबेल..
 • एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास ही

  पुण्यातील स्वयंसेवी संस्था 2002 मध्ये नोंदणीकृत झाली असून वेश्यांची

  मुले, व्यसनाधीन पालकांची तसेच एचआयव्हीबाधित पालकांच्या मुलांसाठी काम

  करणारी संस्था आहे. या मुलांमध्ये उज्ज्वल भविष्याबाबतचा आत्मविश्वास

  निर्माण करण्यासाठीचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे. वर उल्लेख केलेली

  बहुतेक मुले झोपडपट्टीत राहणारी, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शाळा सोडून

  अल्पवयातच कमावती झालेली असतात. त्यामुळे या मुलांचे वैयक्तिक आयुष्य

  वैफल्यग्रस्त असते. त्यांच्यात आयुष्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन विकसित

  व्हावा,यासाठी एकलव्य न्यास प्रयत्नशील आहे. सेतू शाळा,परिपूर्ण आहार

  योजना, स्नेहाधार, तंत्रशिक्षणाच्या कार्यशाळा असे अनेक उपक्रम संस्थेतर्फे

  राबवले जातात. मुलांच्या सर्वागीण वाढीसाठी, त्यांच्या समुपदेशावरही

  संस्था काम करते. भविष्यात सर्व अद्ययावत शैक्षणिक सुविधांनी सज्ज असणारी

  निवासी शाळा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आह

जबाबदारीच्या जाणिवेचा मुद्दा तसा नेहमीचाच, पण तो थोडासा पुढे नेला तर

काय दिसतं बघा! आपल्यावर कोणीतरी, काहीतरी सोपवतंय याचा अर्थच आपण कोणाला

तरी हवेसे आहोत असं वाटणं. एखाद्या दृष्टिक्षेपातून, हलक्या स्पर्शातून,

एखाद्या गोड शब्दातून आपल्याला हे करता येतं, पण कित्येकदा माणसांच्या

लक्षातच येत नाही. परिणामी अनेकांची हृदयं प्रेमाच्या अभावानं रिकामी

राहतात व त्यात सुडासारख्या, द्वेषासारख्या नकारात्मक भावनांची

प्रतिष्ठापना कधी होते हे कोणालाच समजत नाही.
या जाणिवांतून मी माझ्या

परीनं बदलत गेले. अगदी छोटे, छोटे बदल! मात्र त्याची परिणामकारकता फार

सकारात्मक होती. बरेच श्रोते असलेल्या सभागृहात व्यासपीठावर एकाच ठिकाणी

(तेही वक्त्याचं दर्शन दुमीळ करणारा लाकडी ठोकळा समोर असणार) उभं राहून

श्रोत्यांशी संवाद करणं मी थांबवलं. श्रोत्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी

संवाद साधत विषयाला पुढं नेण्याचा प्रयत्न सुरू केला व तेही नाही जमलं तर

निदान व्यासपीठावर फेऱ्या मारत बोलू लागले. हे करत असताना समोर बसलेल्या

प्रत्येक व्यक्तीशी नजरानजर होईल याची खबरदारी घ्यायला सुरुवात केली. याला

फार सुंदर प्रतिसाद मिळाला.
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भात

शेवटच्या पायरीवर असणाऱ्या मुलांची स्थिती फार भयानक असते. साद-प्रतिसादाची

भावनिक गुंतवणूक जर योग्य वेळी झाली नाही तर आज पौगंडावस्थेतल्या

मुलांमधील ज्या प्रकारच्या गुन्हेगारी/आत्मघातकी प्रवृत्तींचा सामना

समाजाला करावा लागतो आहे, तो अपरिहार्य ठरतो. वयात येणाऱ्या मुलांमधील

आत्महत्यांचं प्रमाण कितीतरी पटीनं वाढलंय, याला अगदी क्षुल्लककारण पुरतं.

परीक्षेत मिळालेले कमी मार्क, मुलीनं दिलेल्या नकारानं झालेला प्रेमभंग,

मित्रांशी झालेली भांडणं इत्यादी. थोडय़ाफार फरकानं हीच कारणं, मारामाऱ्या,

खूनखराबा किंवा वाढती (कमालीची) व्यसनाधीनता यांना लागू पडतात. याचं

मानसशास्त्रीय विश्लेषण करू जाता, या सगळ्या घटना प्रामुख्यानं बालपणातील

वंचिततेकडेच बोट दाखवतात. बटरड्र रसेल या जगप्रसिद्ध विचारवंतानं आपल्या

‘ऑन एज्युकेशन’ या बहुमूल्य पुस्तकात खेळाचं मुलांच्या जीवनात असलेलं

अद्वितीय वर्णन करताना असं म्हटलंय की, लहानपणी खेळाला वंचित झालेल्या

व्यक्तींना निराशा लवकर जखडते व त्यांच्यात जीवनाविषयी उदासीन प्रवृत्ती

बळावून, त्यांच्या मनात आत्मघातकी विचार प्रकर्षांनं येतात.
हे विवेचन

मनाला इतकं स्पर्शून गेलं की, परीक्षा कितीही जवळ येवोत, शाळांचा केवढाही

रेटा आमच्या मुलांच्या मागे असो, सायंकाळची वेळ ही खेळाची वेळ हे आम्ही

नक्की ठरवलं व पाळलंसुद्धा!
गोष्टी व गाणी यातूनही माणसांच्या

स्वत्वाला खास जागेपण येईल, असं खूप काही करता येतं. एका बालगीताच्या

माध्यमातून ते कसं साध्य झालं याची एक गमतीदार गोष्ट सांगते. मुंबईच्या

सुप्रसिद्ध गायिका श्रीमती वर्षां भावे यांनी ‘माझ्या केसात झाल्या उवा,

उवा,’ असं एक गमतीदार बडबडगीत मला शिकवलं. त्यातली एक ओळ ‘तुम्ही असं

करा..’ असं बालचमूला उद्देशून म्हटलं आहे. या ओळीचा पुनरुच्चार करीत मी

प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मुलांकडे हसून बघायला सुरुवात केली. ज्याच्याकडे

बघितलं जातं, त्या प्रत्येक मुलाला ही ओळ आपल्यालाच उद्देशून म्हटली आहे,

असा भास होतो. ताबडतोबीनं या मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात, बसण्याची

पद्धत बदलते व इतर मुलंही आता आपल्याकडे कधी बघितलं जातं, याची वाट बघायला

लागतात. एकंदरीत गाण्याचा कार्यक्रम आनंदाचा, सृजनाचा आनंद निर्माण करतात.
लेखाच्या

शेवटी एका विद्यार्थ्यांचे आभार मानले नाहीत, तर लेखाचा हा व्याप अर्धवट

राहील. रोहित नावाचा एक अतिशय हुशार, संवेदनशील मुलगा माझ्याकडे

इंग्रजीच्या अभ्यासासाठी येत असे. त्यानं एकदा त्याची शिक्षकांकडून असलेली

छोटी अपेक्षा बोलून दाखविली होती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षकांनी

पुस्तक उघडण्यापूर्वी एकदा तरी सर्व मुलांकडे हसून बघितलं पाहिजे व मगच

शिकवायला सुरुवात केली पाहिजे. त्याची ही अपेक्षा ऐकताना मला रुईया

महाविद्यालयात आम्हाला संस्कृत शिकवणाऱ्या महाशब्देसरांची आठवण होत होती.

वर्गात आल्यावर ते आम्हा विद्यार्थ्यांकडे चष्म्याच्या वरून बघत म्हणत असत,

‘माय डीअर स्टुडंट’.. माझ्या या गुरूंना, रोहित नावाच्या विद्यार्थ्यांला

व त्यांनी दिलेल्या शिकवणुकीला सलाम!Comments Mahavidyalaya par nibandh on 20-01-2021

Mahavidyalaya par nibandh

Kapale Komal kisan on 07-01-2020

आमचे कनिषठ महाविदयालमआप यहाँ पर माझे gk, महाविद्यालय question answers, निबंध general knowledge, माझे सामान्य ज्ञान, महाविद्यालय questions in hindi, निबंध notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment