Dugdh Sahakari Sanstha MaRaathi माहिती दुग्ध सहकारी संस्था मराठी माहिती

दुग्ध सहकारी संस्था मराठी माहिती



GkExams on 10-12-2018


शेतीपूरक परंपरागत व्यवसाय

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो.


आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी 300 मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून 45% तर म्हशीकडून 52% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या 1 लिटर दुधातून 600 किलो कॅलरीज, तर म्हशींच्या 1 लिटर दुधापासून 1000 किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात.

संगोपन

ओलीताखालच 1 हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान 5-10 दुभत्या गाई-म्हशी असाव्यात. त्यांच्या संगोपनासाठी सर्व सोयी उपलब्ध असाव्यात. उदा. पिण्याचे पाणी, लाइट, वाहतुकीचा रस्ता, गोठा, शहर 10-20 कि.मी अंतरावर असावं. उपलब्ध क्षेत्राला हुकमी पाणी पुरवठयाची सोय असावी. नजीक पशुवैद्यकीय दवाखाना असावा. या किमान बाबी दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक आहेत.

दुधाळ गाई आणि म्हशीं


फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी दुधाळ गाईची आणि म्हशींची निवड करावी. दुधाळ गायींची खास वैशिष्टये असतात. त्या वैशिष्ट्यांच्या गाई खरेदी कराव्या. त्याचप्रमाणे म्हशीही निवडाव्यात. दुग्ध्व्याव्सायाच्या दृष्टीने एका वितात गाईने साधारणपणे 3600 लिटर दुध दिलं पाहिजे. म्हशीने 2500 लिटर दुध दिलं तर दुग्ध व्यवसाय फायदेशीर होतो. दुग्धव्यवसायासाठी नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या विटाच्या गाई किंवा म्हशी निवडाव्या. त्यांचं वय 3 ते 4 वर्षाच असावं. त्या वर्षाला एक वेत देणाऱ्या असाव्यात. निरोगी असाव्यात. गुग्ध व्याव्सायासाठी जर्सी, होल्स्तीन-फ्रिजीयन, देवणी, गिर, सिंधी, थारपारकर, या गाई पाळाव्यात. तर दिल्ली, मुऱ्हा, पंढरपुरी, जाफराबादी, या म्हशी पाळाव्यात.

आदर्श गोठा


गाई-म्हशीसाठीचा गोठा आदर्श असावा. गाई-म्हशींची संख्या 16 पर्यंत असेल तर एकेरी पद्धतीचा गोठा असावा. आणि 16 पेक्षा जास्त संख्या असेल तर दुहेरी गोठा असावा. तोंडाकडे तोंड,अगर शेपटीकडे शेपटी आणि मध्ये दोन मीटर रुंदीचा रस्ता अशी रचना असावी. शेपटीकडे शेपटी म्हणजे tail to tail हि रचना चांगली असते. तोंड खिडकी कडे असल्याने हवा मिळते. संसर्गजण्य रोग होण्याचा धोका नसतो. दुध काढणं सोयीचं होतं. गोठ्याची जमीन सिमेंटकोब्याची असावी. मुत्र वाहण्यासाठी शेपटीच्या दिशेने नाळी असावी. गोठ्याची उंची 14 ते 15 फुट असावी. 8 फुट भिंत आणि 4 फुट खिडकी ठेवावी. गाई-म्हशीला 1.5 ते 1.7 मीटर लांब आणि 1 ते 1.2 मीटर रुंद अशी गोठ्यात जागा असावी. भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा. गाई-म्हशींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या रोज 3% वाळलेला आणि हिरवा चार असावा. प्रत्येक लिटर दुधापाठीमागे 300 ते 400 ग्राम पशुखाद्य, तर 50 ते 100 ग्राम क्षारमिश्रण देणे महत्वाचं आहे. अ, ब, क, आणि ई जीवनसत्वासाठी हिरवा चारा दिलं गेलाच पाहिजे. म्हणजे दुधात घनपदार्थ (एसएनएफ) म्हणजेच जास्त फॅट मिळते. अलीकडे जैविक दुधनिर्मितीला महत्व प्राप्त झालेले आहे.


गाई-म्हशींना घटसर्प, फऱ्या, फाशी, ब्रुसेलोसीस हे जीवाणूजन्य आजार, तर देवी, बुळकांडी, लाल्याखुरकूत, रेबीज, डेंग्यू, हे विषानुजान्य रोग, गोचीड आणि जंत हे परोपजीवी रोग आढळतात. त्यासाठी लसीकरण करून घ्यावे म्हणजे जनावराचं आरोग्य चांगलं राहतं.




सम्बन्धित प्रश्न



Comments swara on 23-02-2021

Sahkari dugdh vavsay

Tushar Tadam on 30-12-2019

Dugdh sahakari sanstha

Vaishali on 18-12-2019

Sahkari sanstha ke fayde


VITTHALSING KACHRUSING SINGAL on 15-12-2019

Dud sahkari bav





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment