खाण्याचा सोडा उपयोग

खाण्याचा Soda Upyog

GkExams on 14-01-2019

सोडियम बाय कार्बोनेट अथवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे याचे इंग्रजी रासायनिक नाव आहे. हे एक लवण म्हणजे एक प्रकारचे मीठ आहे. यास मराठीमध्ये खाण्याचा सोडा असेही म्हणतात. तसेच यास बेकिंग सोडा, सोडा बायकार्ब किंवा बाय कार्ब असेही म्हंटले जाते. खाण्याचा सोडा अल्कली गुणधर्माचा असतो. याचे रासायनिक सुत्र NaHCO3 असे आहे. हे पांढऱ्या भुकटीच्या स्वरुपात अथवा पांढऱ्या स्फटिक स्वरुपात पण आढळते. सोड्याला 80 सेल्सियस तापमानाच्या उष्णता दिल्यास तो विघटन पावतो आणि त्यातून कार्बन डाय ऑक्साईडवायू अतिशय बुडबुड्याच्या स्वरुपात वेगळा होऊ लागतो. तसेच सोडा आम्लाच्या संपर्कात तो आला की रासायनिक क्रिया घडूनही कार्बन डाय ऑक्साइडचे बुडबुडे तयार होतात. हा ढोकळयासारख्या अन्न पदार्थात वापरला जातो. ढोकळ्याला जाळी पडते कारण त्या छिद्रातून कार्बन डाय ऑक्साईड वायू निघून गेलेला असतो. यामुळे ढोकळा फुगतो आणि हलका होतो. वायू सुटा होण्याची क्रिया तळताना घडल्याने पदार्थ खुसखुशीत होतात.Comments

आप यहाँ पर खाण्याचा gk, सोडा question answers, general knowledge, खाण्याचा सामान्य ज्ञान, सोडा questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment