भारतातील लघु उद्योग

भारतातील Laghu Udyog

Gk Exams at  2020-10-15

GkExams on 10-01-2019

आज लघु आणि मध्यम उद्योग हे भारताच्या आर्थिक प्रगतीचे आघाडीचे शिलेदार आहेत. दरवर्षी सरासरी दहा टक्क्यांनी लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र वाढते आहे. यात मॅन्युफॅक्चरिंग (वस्तूंचे उत्पादन), इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा उभारणी), सेवा पुरवणारे उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग उद्योग, रासायनिक उद्योग आणि आयटी (इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी) यांचा मोठा वाटा आहे. रोजगार निर्मितीत जवळ जवळ चाळीस टक्के वाटा लघु आणि मध्यम उद्योगांचा आहे. भारतात पंचेचाळीस टक्के मालाचे उत्पादन लघु आणि मध्यम उद्योगांत होते. मालाची निर्यात करण्यात चाळीस टक्के वाटा आणि बँकेकडून मिळणाऱ्या कर्जात सोळा टक्के वाटा, असे काही ठळक मुद्दे लघु आणि मध्यम उद्योगांच्या बाबतीत लक्षात घेण्याजोगे आहेत.


शाळेत जिगरी दोस्त असलेले दोन मित्र सुदर्शन आणि नयन खूप वर्षांनी एके दिवशी भेटले. सुदर्शनने घरच्या कापड उद्योगात जम बसवला होता, तर नयनने परदेशात जाऊन उच्च शिक्षण झाल्यावर स्वत:चा उद्योग सुरू केला होता. गप्पा साहजिकच आपापल्या उद्योगाचा हालहवाल कसा आहे व पुढे काय ह्यावर सुरू झाल्या...


सुदर्शन : “अरे, काय सांगू सध्या मार्केट डाऊन आहे, लोकं ऑनलाईन शॉपिंग करतात. त्यामुळे दुकानात जाऊन खरेदीचे प्रमाण खूप कमी होते आहे. कळत नाहीये काय करावं ते? आज आमची या शहरात पाच दुकानं आहेत, अजून दोन जागा हेरून ठेवल्या आहेत, पण दुकानं आहे तेवढीच ठेवावी की वाढवावी हे ठरवताना जड जातेय. एकदा वाटते की आपणही सोशल मिडिया मार्केटिंग करून बघावे.’’


नयन : “हो, खरंय तुझं, माझ्याही समोर अशीच परिस्थिती आहे. एकीकडे सगळ्या कॉस्ट वाढत आहेत. आणि प्रॉफिट मार्जिन मात्र कमी कमी होत आहे. आहेत त्या ग्राहकाच्या सगळ्या अपेक्षा पुऱ्या करता करता, नवीन ग्राहकाचा शोध घ्यायला फुरसत मिळत नाही आणि त्यामुळे नवीन ऑर्डर येत नाहीत. कधी कधी असं वाटतं की, MS झाल्यावर सरळ नोकरी धरायला हवी होती.’’


दोन मित्रांमधील हा संवाद काय सांगतो? दोघांनाही त्यांच्या उद्योगाच्या भविष्याची चिंता आहे. सुदर्शन मार्ग शोधायचा प्रयत्न करतो आहे, तर नयनने परिस्थितीपुढे हार मानली आहे.


जो थांबला तो संपला


स्वत: केलेले काम आणि त्याबदल्यात मिळणारे मूल्य (आर्थिक, सामाजिक इ.) सर्वसामान्य माणसाला जगरहाटीत टिकून राहण्यास गरजेचे असते. काहीतरी करत राहणे ही माणसाची मुलभूत गरज आहे. फार खोलात न जाता असे म्हणता येईल की, व्यापार करणे म्हणजे बाजारात आधीपासून अस्तित्वात असलेली, उपलब्ध असलेली वस्तू, सेवा इ. अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे. उदा. दुकानांमधून होणारी मालाची खरेदी-विक्री आणि त्यातून नफा मिळवणे. तर बाजारात नसलेली वस्तू, कल्पना किंवा सेवा बाजारात आणणे आणि त्यासाठी ग्राहक वर्ग निर्माण करणे म्हणजे उद्योगाला अस्तित्वात आणणे. उदाहरण द्यायचे झाले तर भारतात बिग बाजार सारखे शॉपिंग मॉल येण्याआधी अमेरिकेत किंवा परदेशात बऱ्याचदा आधीपासून मॉल अस्तित्वात होते. असे मॉल भारतात प्रचलित करणे हे आव्हान होते, पण ती कल्पना मात्र नवीन नव्हती. याउलट अॅपलच्या iPadचे उदाहरण सर्वतोपरी ज्ञात आहे की, ज्यामुळे ज्याला जे गाणे हवे ते ऐकता येऊ लागले. एखाद दुसऱ्या गाण्यासाठी कॅसेट किंवा सीडी विकत न घेता, आवडीची गाणी iPad मध्ये अपलोड करून कधीही, कुठेही ऐकता येऊ लागली. त्यामुळे असे म्हणता येईल की व्यापार आणि उद्योजकता यात मुख्य फरक हा आहे की, व्यापार म्हणजे बाजारात उपलब्ध वस्तू, कल्पना किंवा सेवा इ. चा विस्तार करणे, तर उद्योजकता म्हणजे नवीन कल्पना, वस्तू किंवा सेवा अस्तित्वात आणणे. व्यापार असो अथवा उद्योग, दोन्हींचे अंतिम ध्येय नफा हेच असते, हा दोन्हीतील सारखेपणा. (प्रस्तुत लेखात ‘ना नफा – ना तोटा’ या तत्वावर आधारित सामाजिक उद्योजकता हा विषय विचारात घेतलेला नाही.)


आज लघु आणि मध्यम उद्योग हे भारताच्या आर्थिक प्रगतीचे आघाडीचे शिलेदार आहेत. दरवर्षी सरासरी दहा टक्क्यांनी लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र वाढते आहे. यात मॅन्युफॅक्चरिंग (वस्तूंचे उत्पादन), इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा उभारणी), सेवा पुरवणारे उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग उद्योग, रासायनिक उद्योग आणि आयटी (इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी) यांचा मोठा वाटा आहे. रोजगार निर्मितीत जवळ जवळ चाळीस टक्के वाटा लघु आणि मध्यम उद्योगांचा आहे. भारतात पंचेचाळीस टक्के मालाचे उत्पादन लघु आणि मध्यम उद्योगांत होते. मालाची निर्यात करण्यात चाळीस टक्के वाटा आणि बँकेकडून मिळणाऱ्या कर्जात सोळा टक्के वाटा, असे काही ठळक मुद्दे लघु आणि मध्यम उद्योगांच्या बाबतीत लक्षात घेण्याजोगे आहेत. हे आकडे आशादायी असले तरी काही थोडकेच उद्योग दुसऱ्या पिढीपर्यंत टिकून राहतात किंवा पुढे प्रगती करतात. जगातील उद्योगांपैकी 96% उद्योग सुरू झाल्यावर पहिल्या दहा वर्षाचा टप्पाही गाठू शकत नाहीत. याची सारी कारणं शोधायची म्हंटली तर ते महासागरातील मोती वेचण्यासारखे होईल. कितीही मोती वेचले तरी खूप शिल्लक असतील, नजरेआड राहतील. मग या कारणांमध्ये गुंतून न पडता लघु आणि मध्यम उद्योग वाढतील, प्रगती करतील अशी काही जडीबुटी आहे का? कुठला राजमार्ग आहे का?


उद्योग प्रगती का करत नाहीत : परिस्थिती पूरक नाही की आत्मपरीक्षणाचा अभाव?


दहा वर्षाचा टप्पा गाठू न शकलेल्या उद्योगांना सुरू करताना, आपला उद्योग बंद पडेल किंवा करावा लागेल असा विचार उद्योजकांच्या मनात येत नाही. पण 96% उद्योग मात्र पहिल्या दहा वर्षात बंद पडतात हे मात्र खरे आहे. उद्योगाच्या केंद्रस्थानी स्वत: उद्योजक असतो. त्याच्या/तिच्या धडाडीमुळे उद्योग अस्तित्वात येतो. पण कधी-कधी ही धडाडी फार काळ टिकत नाही आणि उद्योगाची नाव हेलकावे खाऊ लागते. मग उद्योगांतर्गत कारणे जसे की, कामाला माणस मिळत नाहीत, ऑर्डर नाही, नफा होत नाही. आणि बाहेरील कारणे म्हणजे सरकार काही करत नाही, मंदी आहे, ग्राहक पैसे वेळेवर देत नाही इ. इ. चर्चिली जातात. कधीतरी एखादे नवीन तंत्रज्ञान अचानक बाजारात येते व काही उद्योग त्या लाटेत वाहून जातात. अश्या सतत बदलत्या काळात उद्योगाला टिकवून ठेवायचे आणि वाढवायचे हे आव्हान पेलण्यासाठी उद्योजकाला वेळोवेळी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. खाली असलेल्या आलेखात आपण कुठे आहोत हे उद्योजकाने ओळखले तर पुढे काय करायचे हे स्पष्ट होऊ शकते.सोबत दर्शविलेल्या आलेखात आपण कुठे आहोत हे ओळखणे उद्योजकाला सहज शक्य आहे. आपण कुठे आहोत हे लक्षात आल्यावर आता पुढे काय हा प्रश्न सहाजिकच उपस्थित होतो.


कमी इच्छा – कमी ज्ञान = या गटात असलेल्या उद्योजकाने स्वत:ला विचारणे की, ‘माझी प्रगती व्हावी अशी मला इच्छा का नाही? माझा उद्योग वाढवण्याचे उत्तरदायित्व कोणाचे आहे? माझे की इतर कोणाचे? मला कमी माहिती आहे, माझे या क्षेत्रातील ज्ञान कमी आहे म्हणून माझी प्रगती होत नाही का?’ ज्ञान कमी असल्यास ते मिळवण्याचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. पण इच्छा नसेल तर मात्र उद्योजकाची परिस्थिती पाण्याजवळ नेलेल्या घोड्यासारखी असेल, तळ्यात पाणी आहे पण घोडा पाणी पित नाही.


अधिक इच्छा – कमी ज्ञान = उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात किंवा आहे त्या उद्योगात नवीन काहीतरी करताना उद्योजक या गटात असू शकतो. इथे इच्छा जबरदस्त आहे, त्यामुळे ज्ञान मिळवण्याची धडपड एवढीच काय ती करायची. मार्ग अनेक आहेत, त्या क्षेत्रातील किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीकडून माहिती, मार्गदर्शन घेता येते. अनेक संस्थांचे अहवाल, माहिती पत्रक, पुस्तकं, इंटरनेट इ. भरपूर माहितीस्त्रोत आज सहज उपलब्ध आहेत. त्या विषयाचे, क्षेत्राचे ज्ञान कमी करून बघणे, त्यात काय अडचणी आल्या, काय सुधारणा करता येईल हे जाणून अनुभवातून ज्ञान मिळवणे, हा पर्याय आहे. या गटातील उद्योजकाला दिशा सापडली की प्रवास सुकर असतो, कारण आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी असते.


कमी इच्छा – अधिक ज्ञान = खूप माहिती, ज्ञान असणेही कधीतरी तोट्याचे ठरते. इंग्रजीत ज्याला ‘Analysis-Paralysis’ म्हणतात तसे. काही करण्याआधीच पुढे घडू शकणाऱ्या गोष्टींची काळजी करत काही आज समोर असलेली संधी काही सोडून देतात. ज्ञानार्जन करण्यात बराच वेळ जातो आणि गोष्टी, सिस्टिम्स बरोबर काम करणारी लोकं ‘Perfect’ असावीत या अपेक्षेत तिथेच अडकून पडतात. ह्यांना, आज आहोत तिथून पुढे जाऊ आणि जाता जाता शिकू, ज्ञान मिळवू असा धक्का देणे गरजेचे असते. Analysis चा उपयोग Paralysis साठी न करता Analysis Leading to Action असा व्हावा.


अधिक इच्छा – अधिक ज्ञान = या गटातील उद्योजकाला बाह्य प्रेरणेची गरज नसते. गरज असते ती फक्त एखाद्या गुरूची. उद्योजकाच्या कल्पना, विचार योग्य दिशेने होत आहेत ना, हे सांगणारी अनुभवी व्यक्ती उद्योजकाला ‘युक्तीच्या चार गोष्टी’ सांगते. गुरूला अनुभवातून आलेले शहाणपण जर शिष्याला कामी आले तर त्यात वावगे काय? होकायंत्र सोबत असेल तर आपल्याला ज्या दिशेला जायचे त्या दिशेला जहाज वळवता येते.


उद्योगाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर या चार पैकी कुठल्याही एका गटात उद्योजक असू शकतो. महत्त्वाचे हे आहे की उद्योजक जर कुठेतरी अडकत असेल, तर आपण वरीलपैकी कुठल्या गटात आहोत हे उद्योजकाने तपासून बघितले पाहिजे आणि त्यानुसार गाडी रुळावर आणली पाहिजे. सुज्ञ उद्योजकाने भूतकाळात मिळालेल्या यश अथवा अपयशाच्या अनुभवावर वर्तमानात विसंबून न राहता, भविष्यात बाजार कसा असेल, ग्राहक कोण असेल, त्यांच्या गरजा काय असतील हे ओळखून आजपासून त्यावर विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. सन 1932 साली अटलांटिक समुद्र एकटीने पार करणारी पहिली महिला वैमानिक अमेलिया एरहार्टने म्हंटल आहे, “The Most Effective Way To Do It, Is To Do It.’’ एखादी गोष्ट करून बघण्याचा प्रभावी मार्ग ती करून बघणे हा आहे. उद्योजकांना नक्कीच हे लागू पडते!

Comments Vishal nigade on 30-12-2019

Cattle feed biness

सागर on 12-05-2019

भारत का सबसे बड़ा लघु उद्योग कोनसा है

Raj Bhagwan Patil on 12-05-2019

Indias largest laghu udyogआप यहाँ पर भारतातील gk, उद्योग question answers, general knowledge, भारतातील सामान्य ज्ञान, उद्योग questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment