GramPanchayat Avishwas ठराव माहिती ग्रामपंचायत अविश्वास ठराव माहिती

ग्रामपंचायत अविश्वास ठराव माहिती



Pradeep Chawla on 12-05-2019

अविश्वास ठराव संमत झाल्याबरोबर गावच्या सरपंच किंवा उपसरपंचाला पद सोडावे लागणार आहे. अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर सात दिवसानंतर अधिकारपद संपुष्टात येण्याची तरतूद मुंबई ग्रामपंचायत अधिनियमात होती. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या अधिनियमात सुधारणा करण्यात आल्या आहेत. कायद्यातील नव्या सुधारणेनुसार एका वर्षात सहाऐवजी चार ग्रामसभा घ्याव्या लागतील.



मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये काही सुधारणा करण्याची गरज वारंवार व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कलम ७ (१), कलम ७ (५), कलम ७ (११), कलम ३५ मध्ये सुधारणेला मान्याता देण्यात आली. कलम ३५ मधील सुधारणेनुसार अविश्वास ठराव मंजूर झाल्याबरोबर सरपंच किंवा उपसरपंचाला त्याच दिवशी पद सोडावे लागेल. यापूवीर् सात दिवसानंतर अधिकारपद संपुष्टात येत होते. ठरावाच्या कायदेशीरपणाबद्दल सात दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल करता येईल. या अपिलावर जिल्हाधिकाऱ्यांनी ३० दिवसांत निर्णय घेण्याचे बंंधन घालण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची तरतूद वगळण्यात आली असून, रिक्तपद ३० दिवसांच्या आत भरावे लागेल.







ग्रामसभेबद्दलच्या तरतुदीमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. सध्याच्या एका वर्षात सहा ग्रामसभा घ्याव्या लागतात. पण ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वर्षात चार ग्रामसभा घेण्याच्या सुधारणेला मान्यता देण्यात आली आहे. गावातील महिलांच्या सभेतील शिफारशी ग्रामसभेसमोर ठेवाव्यात. प्रत्येक ग्रामसभेपूर्वी वॉर्डसभा बोलावून, त्यात वॉर्डाचा विकास व वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांची निवड करावी. या शिफारसी मान्यतेसाठी ग्रामसभेसमोर ठेवाव्यात. नव्या सुधारणेनुसार ग्रामसभेचे दप्तर सांभाळ्यात होणाऱ्या दिरंगाईवर चाप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्रामसभेचे सर्व दस्ताऐवज सुरक्षित जतन करण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवकांवर टाकण्यात आली आहे. दस्ताऐवजात फेरफार किंवा गहाळ झाल्यास सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात होणार आहे.




सम्बन्धित प्रश्न



Comments Sachin Chougule on 02-09-2022

11 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सरपंचावर अविश्वास ठरावासाठी किती सदस्य लागतात.
सरपंच हे महिला आहे,.( सामान्य )

शिवाजी बोबडे on 12-06-2022

रमाई घरकुलयोजना लाभार्थी निवड

सुभाष पाराजी शिंदे on 18-11-2021

9 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सरपंचावर अविश्वास ठरावासाठी किती सदस्य लागतात


रामचंद्र तूरे on 18-07-2021

मुझे ग्रामपंचायत की औरसे मासिक ठराव मे धंदा करणे के लीऐ जगह दि गयी है लेकिन उसके दो महीने बाद नगरपचांयत हो गयी अब मुझे उस जगह की कर रसीद देना है लेकिन वह आधिकारी नही ले रहे अब मै का करू जवाब दीजिये


Parmeshwar on 18-03-2021

9 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सरपंचावर अविश्वास ठरावासाठी किती सदस्य लागतात

सुर्या on 22-11-2020

७ ग्रामपंचायत सदस्य मे से अविश्वास के लिए कितने सदस्य चाहीए

V.j.gohil on 21-09-2020

Tharav parkiya no jankari


પટેલ નિમૅલ on 05-04-2020

અવિસ્વાસ દરખાસ્ત પર સ્ટે મળી શકે





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment