BailGadi माहिती MaRaathi बैलगाडी माहिती मराठी

बैलगाडी माहिती मराठी



GkExams on 02-10-2022


बैलगाडी माहिती मराठी : कृषिप्रधान देशांत शेतमालाची शेतातून घरापर्यंत, शहरातील बाजारपेठेत, तसेच बाजारपेठेतुन गुदामे, रेल्वे व बस स्थानके आणि बंदरे यापर्यंत, तसेच दुकानांतून ग्राहकाच्या घरापर्यंत लहान प्रमाणात कमी अंतरापर्यंतच्या मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारे बैलासारख्या प्राण्याच्या शक्तीद्वारे ओढले जाणारे वाहन म्हणजे बैलगाडी होय.


बैलगाडीचा उपयोग खेड्यांतून अद्यापही माणसांची ने-आण करण्यासाठी काही प्रमाणात करण्यात येतो. त्याचप्रमाणे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खते, अवजारे, इ. ची बाजारपेठेतुन शेतकऱ्याच्या घरापर्यंत, तसेच शेतापर्यंत वाहतूक करण्यासाठीही बैलगाडीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यांशिवाय करमणुकीकरिता शर्यतीसाठीही बैलगाडीचा वापर करण्यात येतो. भारतासारख्या देशातील रस्त्यांचे स्वरूप, प्रकार, रूंदी, चढ-उतार, आदी बाबींच्या दृष्टीने पाहता बैलगाडीसारखे अन्य पर्यायी वाहन नाही. प्रादेशिक पसिस्थिती व उपलब्धता यांनुसार हे वाहन ओढण्यासाठी बैल, रेडे, उंट, खेचरे, घोडे, आदी प्राण्यांचा वापर करण्यात येतो तथापि जास्त करून बैलांचाच वापर त्यासाठी करण्यात येतो.


भारतासारख्या देशात रेल्वेमार्ग व चांगले रस्ते पुरेसे नाहीत त्यामुळे ग्रामीण भागात वाहतुकीसाठी रेल्वे, मोटार, ट्रॅक्टर, आदींचा म्हणावा तसा वापर होत नाही. कच्च्या रस्त्यांवर, दुर्गम भागातील चढ-उताराच्या वेड्यावाकड्या कच्च्या रस्त्यांवर, तसेच शेतातून बैलगाउीखेरीज वाहतुकीसाठी दुसारा पर्याय नाही. अशा भागांत व रस्त्यांवर पावसाळ्यात बैलगाडींखेरीज अन्य साधनांचा उपयोग करणे शक्य होत नाही.


यांत्रिक वाहनांवरील गुंतवणूक, बिघाड, दुरूस्तीचा खर्च, आवाज, धूर प्रदुषण इ. चा बैलगाडीच्या बाबतीत त्रास उद्‌भवत नाही. तिची दुरूस्ती आदी बाबी स्थानिक पातळीवर सहज होऊ शकतात. खनिज तेलाची समस्या, त्याचा अपुरा पुरवठा व त्यांच्या वाढत्या किंमती यामुळे सध्या बैलगाडीला परत खुप महत्व येऊ लागले आहे.


भारतात 1980 मध्ये बैलगाड्यांची संख्या सु. 1,30 कोटी इतकी होती व त्या खेचण्यासाठी एकूण गुंतवणूक (बैलाच्या किंमतीसह) सु. 30 अब्ज रूपयांची असून त्यातमूध सु. 41 कोटी टन मालाची वाहतूक केली जाते. याउलट रेल्वेत सु. 50 अब्ज रूपयाची आणि मालमोटार वाहतुकीत सु.25 अब्ज रूप्यांची गंतवनूक असून त्यामधून अनुक्रमे सु. 23 कोटी टन मालाची वाहतुक होते.


बैल गाडीतील गुंतवणूक पूर्णतः खाजगी स्वरूपाची आह. मालमोटार वाहतुकीमुळे सु. 2 कोटी लोकांना रोजगार मिहतो. एका बैलामुळे सु. 1/2 अश्वशक्ती एवढी उर्जा मिळते. मात्र बैलगाडीची मालवाहतुकीची मर्यादा सु.8-16 किमि. एवढी असूनही ग्रामीन भागातील सु. 95टक्के मालाची वाहतूक बैलगाड्यतुन केली जाते.


Source : vishwakosh.marathi.gov.in




सम्बन्धित प्रश्न



Comments अदिती on 07-10-2022

बैलगाडीची सफर निबंध /माहिती सांगा

Gandhi chalval on 12-02-2020

Gandhi chalval





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment