पाऊडर Coating MaRaathi माहिती पावडर कोटिंग मराठी माहिती

पावडर कोटिंग मराठी माहिती

Pradeep Chawla on 20-09-2018


विडेकर यांचे प्राथमिक शिक्षण गावी सारणी येथे झाले. माध्यमिक शिक्षण भाऊजी वसंत औसेकर यांच्याकडे नेताजी सुभाष विद्यालय पाथरी (परभणी) येथे पूर्ण केले. सहा भाऊ आणि दोन बहिणींचे असे त्यांचे कुटुंब. वडील देविदास विडेकर सारणीत किराणा दुकान चालवायचे. आई सरस्वतीबाई गृहिणी. उद्योजक होण्याचे बाळकडू त्यांना वडिलांच्या व्यवसायातून मिळाले. मात्र, आई-वडिलांचे देहावसान झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली.





मोठ्या भावाचे दुकान, मधल्या भावाच्या नोकरीसाठी प्रयत्न आणि कुटुंबात डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलेले विडेकर एकटेच. त्यामुळे साहजिकचकरिअर, नोकरी, धंदापाणी याविषयी त्यांच्याकडेच सगळे जण सल्ला घेत. शिक्षण घेतानाच परभणीला नवजीवन टायर्स कंपनीमध्ये केवळ सहाशे रुपये महिन्यावर त्यांनी नोकरी सुरू केली. लातूरला पूरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये रितसर डिप्लोमा व नंतर बी. ई. झाल्यावर 1991मध्ये त्यांनी प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार औरंगाबाद गाठले. येथे त्यांनी बॉम्बे फोर्जिंग चिकलठाणात तीन वर्षे, श्री. गणेश फोर्जिंग मुंबई येथे दीड वर्षे नोकरी केली. पुढे औरंगाबादलाच इलिगंट कोटिंग वाळूज येथे अशोक काळे यांच्याकडे मार्गदर्शन लाभले. पावडर कोट‌िंग आणि त्या संबंधी आवड निर्माण झाली. पॅरामाउंंट इंडस्ट्रिजमध्ये 4 वर्षे नोकरी केली. आठ वर्षांच्या नोकरीच्या अनुभवात तीन फॅक्टरीमध्ये पावडर कोटिंगचे युनिट उभारण्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे एण्डयुरन्सने लगेच संधी दिली. 1999 ते 2010पर्यंत त्यांनी पुन्हा नोकरी केली. या वीस वर्षांच्या अनुभवावर आपण स्वत:च फॅक्टरी का सुरू करू नये, असा विचार 43-44 व्या वर्षी मनात आला. वीस वर्षांतील नोकरीत मारून-मुटकून जगणे, कमाल मर्यादेत आयुष्य काढणे, सातत्याने संधीची वाट पाहण्याचा त्यांना कंटाळा आला होतो.शेवटी त्यांनी 2011मध्ये 14 लाखांचे वार्षिक पॅकेज असलेली नोकरी सोडली आणि रंग एंटरप्राइज‌ेसद्वारे पावडर कोटिंग मटेरिअल सप्लायर्सचा व्यवसाय सुरू केला.
2012मध्ये केवळ 2 जणांना नोकरी देत 40 हजारांची गुंतवणूक करत त्यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. चार वर्षांत त्यांची उलाढाल सुमारे दीड कोटीपर्यंत गेली आहे. 2012मध्ये प्रे-साई इंडस्ट्रिज नावाने वाळूज येथे स्वत:ची जागा घेऊन पावडर कोटिंगच्याच मॅन्युफॅक्चरिंगचे युनिट सुरू केले. मेरीगोल्ड, निर्माणगोल्ड, बडवे पेंटिंग्ज, व्हिडिओकॉन, आकार टूल्स, पॅरामाउंट आदी कंपन्यांची व्हेंडरशिप मिळाली. तीनचाकी, चारचाकी गाड्यांसह व्हिडिओकॉनच्या डिश टीव्हीच्या छत्रा, फ्रीज व इतर अप्लायन्सना पावडर कोटिंग करण्याचे काम मिळाले. या दोन कंपन्यांनी पाच वर्षांत चांगलीच बाजी मारली. त्यानंतर प्रेयस एंटरप्राइजेस नावाने त्यांनी तिसरी कंपनी स्थापन केली. या कामी नागेश पैठणकर, संतोष उंबरकर यांनी आपल्याला सातत्याने आर्थिक आणि मानसिक मदत केल्याचे विडेकर सांगतात. आज‌ एका कंपनीद्वारे डिलरशिप दुसऱ्या व तिसऱ्या कंपनीद्वारे मॅन्युफॅक्चरिंग करत तिन्ही कंपन्यांचा टर्न ओव्हर 3 कोटींपर्यंत गेला. 30 जणांना रोजगार मिळाला. त्यांच्या कंपनीत बर्जर पावडर, रॅपिड कोट मेक पावडर, कमपेंट टचअप स्प्रे, ईटीपी आणि एसटीपी प्लांट आदींचे काम चालते.
दुचाकी- चारचाकी गाडयांचे स्टँड, बोनेट, ब्रेकपासून विविध अपलायन्सच्या पावडर कोटिंगला त्यांचाच हात असतो, सध्या त्यांनी पावडर कोटिंग प्रोडक्शनवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. विडेकर सांगतात, ‘फॅक्टरी सांभाळताना, काम करताना चिडचिड होते. अनेकदा नैराश्य येते. स्वत:ची फॅक्टरी टाकण्यापेक्षा नोकरीच केली असती, तर बरे झाले असते अशीही भावना येते. मात्र, हे विचार कापरासारखे हवेत विरून जातात. याचे कारण म्हणजे घरच्या लोकांनी आणि विशेषत: पत्नी सुलोचनाने दिलेली साथ. फॅक्टरी व डिलरशीपच्या कामात आलेले नैराश्य व त्यातून आलेली चिडचिडीचा दुष्परिणाम घरतल्यांवर होतो. हे त्यांनी खूप समजून घेतले आहे. आज तीन कंपनींचा मालक असताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवत जेवढे जमेल तेवढे करायचा प्रयत्न सुरू आहे. या कामात अनेक हितचिंतक, मार्गदर्शक भेटले. तुम्हाला ज्या क्षेत्रात उद्योग करायचा आहे, त्या क्षेत्रातील प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचे ज्ञान मिळवा. किमान दोन ते तीन वर्षे तरी नोकरी करून अनुभवी व्हा. त्यानंतर उद्योजक होण्यासाठी झोकून द्या. आधुनिक मशिनरी, टेक्नॉलॉजीचा वापर आणि कुशल मनुष्यबळ विकसित करणे यावर भविष्यात भर द्या. कुठल्याही कामाची लाज न बाळगता काम करण्याची तयारी ठेवावी. फॅक्टरीत झाडू जरी मारावा लागला, तरी ती फॅक्टरी तुमची असते. कोणीही उद्योजक किंवा व्यावसायिक होऊ शकत नाही. त्यासाठी ‘स्पार्क’ असावा लागतो. पावडर कोट‌िंग आणि मॅन्युफॅक्चरिंग यात खूप स्पर्धा आहे. यात मेहनत आहे. काम चोख केले, तर बरकत येते. इथे तुम्हाला कामातूनच स्वतःला सिद्ध करावे लागते. कोणीही गॉडफादर नसतो,’ विडेकरांचे हे अनुभव लाखमोलाचे.
आपल्या यशाचे गमक उलगडताना ते म्हणाले, ‘अचूक काम, जिद्द, ऑर्डर पूर्ण करण्याची हातोटीतून उद्योगाला चालना मिळाली. संधीचे सोने करण्याची आवड व संस्कार कामी आले. आज वाटते की वयाच्या 42 व्या वर्षी घेतलेली रिस्क अगोदरच घ्यायला हवी होती. तरीही हरकत नाही. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. वेळोवेळी बँकांनी दिलेली साथ, कंपन्यांच्या ऑर्डर पूर्ण करताना 22-22 तास काम करण्याची तयारी. आता कंपनीत सुधारणा करून उलाढाल वाढवायची आहे.
मेहनत, चिकाटीच्या जोरावर उद्योग जगतात यशस्वी होता येते. सतत नवे करण्याचा ध्यास हवा. कितीही संकटे आली, तरी हार मानू नका. कामगारांपासून कच्च्या मालाचे पुरवठादार, व्यापारी, वितरक यांच्याशी सलोख्याचे संबंध हे यशाचे गमक आहे,’ विडेकरांच्या हे बोल नक्कीच प्रेरणादायी आहेत. यशाच्या रंगाचे दुसरे नाव म्हणजेच ‘पांडुरंग.’ विडेकरांनी आपल्या स्वप्नांचे रंग घामात आणि अथक कष्टात मिसळले. अन् त्यातूनच एक उद्योजक घडला. हे इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

Advertisements


Advertisements


Comments Vishal fasale on 20-03-2024

पावडर कोटिंग, टेफ्लॉन कोटिंग करतात त्या ठिकाणांना भेट देऊन प्रक्रियेची माहिती मिळवा व वर्गात सादर करा.

Dainik shakar kachare on 22-02-2024

पावडर कोटिंग स्पे पेंटिंग अशी कामे जेथे होतात त्या ठिकाणास भेट दया व माहितीची नोंद ठेवा

Nitin prabhakar kshirsagar on 12-12-2023

Tablet कोटींग म्हणजे काय

Advertisements

पावडर कोंटिग चे गुणधर्म on 12-04-2023

पावडर कोंटिग चे गुणधर्म in मराठी

janhvi sadgir on 02-12-2022

pavadar koting kese banate he

Kimaya anil sonone on 10-10-2022

पावडर कोटिंग ,टेफ्लाॅन कोटिंग माहिती आणि स्टिकर्स उपक्रम

Suraj on 13-09-2022

पावडर कोटिंग टेफ्लॉन कोटिंग याची माहिती आणि स्टिकर्स उपक्रम

Advertisements

पावडर कोटीग on 23-02-2022

पावडर कोटींचे

Anesh bhau Pawar on 31-01-2022

Powder koting ka karatat

मराठी में अनुवाद इसे करे on 22-01-2022

मराठी में अनुवाद करें

श्रावणी on 03-11-2021

निष्कर्ष काय आहे

शोभा on 18-02-2021

पावडर कोटिग कयो कि जाती है?

Advertisements

Sameer Sameer on 24-12-2020

Powder coating prakriya mahit marathi

श्रावणी on 29-09-2020

प्रस्तावना काय आहे

Vaishnavi Ganesh namavali on 07-02-2020

Powder coating vishay Marathi mahiti Chitra


Advertisements

आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity


इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।