Pashupalan MaRaathi माहिती पशुपालन मराठी माहिती

पशुपालन मराठी माहिती

GkExams on 27-04-2022


पशुपालन मराठी माहिती : पशुपालन (animal husbandry in marathi) व शेती हे एकमेकांना पूरक आहेत. खरं पाहिलं तर, पशुपालनाशिवाय शेतजमिनीची सुपीकता टिकविता येत नाही. रासायनिक खतांनी शेतजमिनी नापीक होत चालल्या आहेत. हेक्टरी उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच, पिकांमध्ये रासायनिक पदार्थ जे मानवप्राण्यांना धोकादायक आहेत, ते वाढत चालले आहेत. तसेच वनस्पतींची रोगांविरुद्धची प्रतिकारकशक्ती कमी होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची तणनाशके, कीडनाशके (बुरशी, जीवाणू, विषाणूरोधक रसायने) यांचा वापर वाढला आहे.


भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत अनेक जातींच्या चार पायांचे पशू (animal husbandry department) आहेत. या पशूंमध्ये रवंथ करणारे पशू- यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, उंट तसेच 1-2 पोटकप्पे असलेले गाढव, डुक्कर, मिथुन, याक इत्यादींचा समावेश होतो. या पशूंपासून मिळणारे मल, मूत्र, हाडे, पोटातील अन्न या सर्वाचा उपयोग सेंद्रिय खते म्हणजे वनस्पतींचे अन् न म्हणून होतो.


वनस्पती, झाडेझुडुपे, रोपे इत्यादींपासून मिळणारा पालापाचोळा हा सहजासहजी कुजत नाही. त्याच्यापासून जर चांगले कसदार खत मिळवायचे असेल, तर त्याबरोबर काही जैविक पदार्थ असले पाहिजेत. त्यांचा या पालापाचोळ्याशी संबंध आला पाहिजे. जीवाणू, काही बुरशी, एकपेशीय जीव हे जैविक पदार्थ पशूंच्या मलमूत्रात भरपूर प्रमाणात असतात. हे जीव पालापाचोळ्याला चांगल्या प्रकारे कुजवितात.


पशूंच्या मलमूत्राचा दुहेरी उपयोग आहे. यापासून बायोगॅस (गोबरगॅस) तयार करता येतो. वायू मिळविल्यानंतर जो काही चोथा उरतो, तो कंपोस्ट खत तयार करायला उपयोगी पडतो. प्रत्येक पशूच्या मलमूत्रात नत्र, पालाश, स्फुरद कमी-जास्त प्रमाणात असतात. मलमूत्रात असणाऱ्या विविध जीवाणूंमुळे ते जैविक खत म्हणूनही वापरता येते.


म्हणूनच शेतजमिनीतून येणाऱ्या, मानवाला न पचणाऱ्या वनस्पतीजन्य बाबी पशूंच्या पोटात गेल्यावर त्यावर प्रक्रिया होते. तयार झालेले पदार्थ पुन्हा निसर्गाकडे जातात. त्याची व्यवस्थित विल्हेवाट लागते व वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत होते. तसेच हवेतील दूषित वायू वनस्पती शोषून घेऊन ‘ग्लोबल वॉर्मिंग’ कमी करण्यास हातभार लावते.


शेतक-यांनी आपल्या जनावरांना :




शासकीय दवाखान्यामधून वेळोवेळी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. गोचिड, जंतनिर्मूलन औषधे तसेच इतर रोगप्रतिबंधात्मक लसी येथील शासकीय दवाखान्यात उपलब्ध असतात. ऋतूनुसार आवश्यक लसीकरण शेतक-यांनी वेळीच करून घेणे आवश्यक आहे. तसेच जनावरांना होणा-या डासांच्या प्रादूर्भावामुळे होणा-या जखमा, गोठय़ांची स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याचा वापर आदी गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.


मोकाट जनावरांची संख्या पाहता मोकाट जनावरे न सोडणे जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. काही आजारांवर आपल्या देशामध्ये रोगप्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. परंतु रोगप्रतिकारक लसीकरण वर्षातून किमान दोन वेळा लसीकरण करणे आवश्यक आहे.


स्थलांतर, हवामान यामुळे उद्भवणा-या समस्या निवारणासाठी, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंमध्ये शेतक-यांनी जनावरांची योग्य प्रकारे लसीकरण, योग्य आहार यांची काळजी घेऊन योग्य निगा राखली पाहिजे. त्याचबरोबर भारत सरकार गरीब व दुर्गम भागातील शेतक-यांसाठी जे नवनवीन उपक्रम, योजना राबवित आहे, त्यांची योग्य माहिती घेऊन आपला सर्वागीण विकास साधला पाहिजे.


Source : loksatta

Advertisements


Advertisements


Comments Prachi Kalyan Shinde on 01-04-2022

No comments

Aarushi deshmukh on 21-01-2020

Pashupalan ke bareme Marathi mahiti


Advertisements

आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity


इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।

अपना जवाब या सवाल नीचे दिये गए बॉक्स में लिखें।