कोयना धरण पाणी साठा
कोयना धरण पाणी साठा : मोसमी पावसाच्या अडखळत प्रवासाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी वरदायिनी असणाऱ्या कोयना येथील शिवसागर धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यांवर आहे. यंदा कोयनेतून मोठय़ा प्रमाणात वीज निर्मिती करूनही पावसाळय़ाच्या सुरुवातीस प्रथमच समाधानकारक साठा शिल्लक आहे.
मात्र यापुढे आवश्यक असलेली वीज निर्मिती, सिंचन योजनांचा विचार करता पाऊस वेळेवर आणि योग्य प्रमाणात न झाल्यास काही अडचणी निर्माण होऊ शकतात असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, कोयनेखालोखाल पश्चिम महाराष्ट्रातील मोठय़ा असलेल्या चांदोली धरणातील पाणी साठाही 33 टक्क्यांवर आहे.
जलसाठय़ांची ही माहिती जलसंपदा विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. कोयना हे महाराष्ट्रातील एक मोठे धरण आहे. 105.25 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणावर राज्याची वीज निर्मिती सोबतच मोठय़ा प्रदेशाचे सिंचन आणि अनेक पाणी योजनाही अवलंबून आहेत. गेल्या वर्षी झालेल्या मोठय़ा पावसामुळे हे धरण अल्पावधीतच शंभर टक्के भरले होते. या पाण्याच्या जोरावर यंदा धरणातून उच्चांकी वीजनिर्मिती करण्याबरोबरच पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसा पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे.
पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून धरणातून पावसाळय़ात तब्बल 47 टीएमसी पाणी विनावापर सोडण्यात आले. तर, पुढे वर्षभरात सिंचनासाठी 22 टीएमसी आणि वीज निर्मितीसाठी 82 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. यंदा राज्याला मोठी वीज टंचाई जाणवत असल्याने कोयनेतील वीज निर्मितीही वाढवण्यात आली होती. यातून 2020-21 च्या तुलनेत 20 टक्क्यांहून अधिक वीज निर्मिती झाली.
वर्षभरातील या वापरानंतर सध्या कोयना जलाशयात साडेएकवीस टीएमसी (20.42 टक्के) जलसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा काही महिने पुरेल एवढा आहे. मात्र राज्यातील वीज टंचाई लक्षात घेता यापुढे इथे वीज निर्मिती, सिंचन योजनांसाठी पाण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, कोयने खालोखाल पश्चिम महाराष्ट्रातील मोठय़ा असलेल्या चांदोली धरणातील पाणीसाठाही 33 टक्क्यांवर आला आहे. कृष्णा खोऱ्यातील अन्य धरणांतील पाणीसाठा टक्क्यांमध्ये पुढीलप्रमाणे तर कंसात धरणाची साठवणक्षमता टी.एम.सी.मध्ये पुढीलप्रमाणे.
धोम 5.24 (13.50), कन्हेर 3.03 (10.10), दूधगंगा 8.16 (25.40), राधानगरी 2.85 (8.36), तुळशी 1.73 (3.47), कासारी 0.65 (2.77), पाटगांव 1.33 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 5.47 (9.97), तारळी 2.53 (5.85) असा पाणीसाठा आहे. तर कर्नाटकातील अलमट्टीमध्ये 47.18 (123) असा पाणीसाठा आहे.
Source - loksatta
आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें
Culture
Current affairs
International Relations
Security and Defence
Social Issues
English Antonyms
English Language
English Related Words
English Vocabulary
Ethics and Values
Geography
Geography - india
Geography -physical
Geography-world
River
Gk
GK in Hindi (Samanya Gyan)
Hindi language
History
History - ancient
History - medieval
History - modern
History-world
Age
Aptitude- Ratio
Aptitude-hindi
Aptitude-Number System
Aptitude-speed and distance
Aptitude-Time and works
Area
Art and Culture
Average
Decimal
Geometry
Interest
L.C.M.and H.C.F
Mixture
Number systems
Partnership
Percentage
Pipe and Tanki
Profit and loss
Ratio
Series
Simplification
Time and distance
Train
Trigonometry
Volume
Work and time
Biology
Chemistry
Science
Science and Technology
Chattishgarh
Delhi
Gujarat
Haryana
Jharkhand
Jharkhand GK
Madhya Pradesh
Maharashtra
Rajasthan
States
Uttar Pradesh
Uttarakhand
Bihar
Computer Knowledge
Economy
Indian culture
Physics
Polity
इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।