विमान माहिती

Viman माहिती

GkExams on 14-02-2019

विषय प्रवेश

विमान हे आजच्या जगातील एक महत्त्वाचे जलद दळणवळणाचे साधन बनले आहे. प्रवासी, माल, युध्दसाहित्य इत्यादींची वाहतूक करण्यासाठी विमानाचा परिणामकारक वापर करता येतो. विमान आकाशात उडण्यासाठी व आकाशात उतरण्यासाठी विमानतळाचा वापर होतो.

ओळख

विमानाची ढोबळ रूपरेषा, विमानाचे धड, पंख आणि शेपूट अशी विभागता येते. धडामध्ये प्रवासी, माल, तथा युद्धसाहित्य, तसेच वैमानिक कक्ष, इंधन, नियंत्रणसाधने असतात. पंखांचा मुख्य उपयोग तरंगणे, उड्डाण, वळणे यासाठी होतो. शेपूट मुख्यतः वळण्यासाठी वापरले जाते.

बोइंग 777 प्रवासी विमान

उडण्याचे तत्त्व

विमानाच्या पंखांचा आकार विशिष्ठ प्रकारचा (Aerofoil) असतो. विमानाने जमीनीवर धावताना वेग घेतला की पंखांखालील हवेचादाब पंखांवरील हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो आणि विमान हवेत उडू लागते.

इतिहास

पौराणिक काळापासून विविध देवतांची उडती वाहने, रामायणातील प्रसिद्ध 'पुष्पक' विमान असे विविध उल्लेख प्राचीन भारतीय इतिहासात सापडतात.


आधुनिक इतिहासात ऑरविल आणि विलबर राईट बंधूंनी यशस्वी रित्या विमान आकाशात उडवले. त्यांच्या आधी व नंतरही विमानोड्डाणाचे अनेक प्रयोग झाले. त्यातूनच आजच्या रूपातील विमानाची निर्मिती झाली.

विमानांचे वर्गीकरण

विमानांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते.

सेस्ना जातीचे पाण्यावर उतरणारे विमान

उपयोगानुसार:

 • प्रवासी विमान
 • मालवाहू विमान
 • लढाऊ विमान

संरचनेनुसार:

 • पंखयुक्त (फिक्स्ड विंग)
 • शिरचक्रयुक्त (रोटेटिंग विंग)
 • (गायरो?)

वेगानुसार:

 • स्वनातीत (सुपर सॉनिक)

शक्तीस्रोतानुसार:

 • दट्ट्यायंत्र (प्रॉपेलर)
 • उष्णवायुझोतयंत्र (जेट)

उड्डाणतत्त्वानुसार:

 • हवेपेक्षा जड (नेहमीचे विमान)
 • हवेपेक्षा हलके (वायुफुगा)
Comments Aaba koli on 07-05-2021

Viman talavar H. Ka lihilela asto

तिकिट रद्द केल्यास किती %दंड द्यावे लागते on 12-05-2019

तिकिट रद्द केल्यास किती %दंड द्यावे लागतेआप यहाँ पर विमान gk, question answers, general knowledge, विमान सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment