भाग बाजाराची माहिती

Bhag बाजाराची Mahiti

GkExams on 18-11-2018


शेअर बाजार : विविध कंपन्यांचे समभाग, ऋणपत्रे, रोखे, पतपत्रे इत्यादींची खरेदी-विक्री करणारे व्यापारी संकूल. वित्तीय बाजारात विविध पतपत्रांद्वारे भांडवल-गुंतवणूक व भांडवल-उभारणी होत असते. कर्ज व भांडवलाच्या अल्पकालीन गरजांसाठी नाणेबाजाराची मदत घ्यावी लागते. दीर्घकालीन भांडवल-उभारणी आणि भांडवली गुंतवणुकींसाठी भांडवल-बाजाराची मदत घेतली जाते. शेअरबाजाराचा विकास व विस्तार हा आर्थिक विकासाचा निर्देशक मानला जातो. ज्यांच्याकडे अतिरिक्त उत्पन्न अथवा बचती आहेत, ते लोक शेअरबाजारात गुंतवणूक करतात व भांडवल-उभारणी होत राहते.


शेअरबाजारात प्रामुख्याने विविध कंपन्यांचे समभाग, ऋणपत्रे, रोखे, सरकारी पतपत्रे यांची खरेदी-विक्री होत असली, तरी समभागांचीच उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते. शेअर-दलाल, वित्तीय संस्था, बँका, बिगर-बँकिंग संस्था, म्यूच्युअल फंड, परदेशी वित्तीय संस्था अशा सर्वांचा शेअरबाजारातील उलाढालीत कमीजास्त सहभाग असतो. सामान्य गुंतवणूकदार दलालांमार्फत शेअरची खरेदी-विक्री करतो. शेअर्सच्या खरेदी-विक्रीत समभागांचे (इक्विटी शेअर) प्रमाण सर्वांत जास्त आहे.


समभागांची दर्शनी किंमत सामान्यतः रु. दहा इतकी ठेवली जाते; तथापि काही समभाग रु. एक, रु. पाच, रु. शंभर अशा दर्शनी किंमतींचेही असू शकतात. शेअर हे निरंतर भांडवल आहे. एखाद्यास आपले शेअरमधील भांडवल परत करून रोख रक्कम उभी करायची असेल, तर त्याने आपले समभाग शेअरबाजारात विकावयाचे असतात. शेअरबाजारात विविध ऋणपत्रांचेदेखील व्यवहार होतात. असुरक्षित-सुरक्षित, अपरिवर्तनीय-परिवर्तनीय-भागशः परिवर्तनीय, अविमोचनीय-विमोचनीय, शून्य व्याज-तरते व्याज इ. प्रकारची ऋणपत्रे बाजारात असतात.Comments trupti on 15-10-2020

bhag bajaratil ----- hey mukhya vyakti ahe ???आप यहाँ पर बाजाराची gk, question answers, general knowledge, बाजाराची सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment