भारतातील कापड उद्योग

भारतातील कापड Udyog

GkExams on 27-12-2018


कापड उद्योग : नैसर्गिक अगर कृत्रिम तंतूच्या (धाग्यांच्या) सुतापासून मागावर अगर यांत्रिक सुया वापरून कापड तयार केले जाते. तंतू त्याच्या जाडीच्या मानाने अनेकपट लांब असल्यामुळे त्यापासून सूत कातणे व कापड विणणे या क्रिया साध्य झाल्या आहेत. एक सेंमी.पेक्षा कमी लांब अशा तंतूंपासून सूत कातता येत नाही. जाड तंतूंपासून जाडेभरडे व बारीक तंतूंपासून तलम कापड निर्माण होते. पिंजणे, कातणे, पिळणे, विणणे, आणि रासायनिक प्रक्रिया करणे या सर्व अवस्थांमध्ये तंतू टिकाव धरील इतकी ताकद त्यात असावी लागते.शक्ती, लवचिकपणा, चकाकी, मऊपणा, उबदारपणा, टिकाऊपणा या गुणधर्मांवर तंतूची (म्हणजे पर्यायाने कापडाची) प्रत व किंमत अवलंबून असतात. कृत्रिम (मानवनिर्मित) तंतूचा छेद वर्तुळाकार असतो व लांबी पूर्वनियोजित असते. अशा तंतूचे इतर काही गुणधर्मही योजिल्याप्रमाणे असू शकतात. कापूस, लोकर, रेशीम, फ्लॅक्स, सण (गोणपाटाचे तंतू) इ. नैसर्गिक तंतूंमध्ये प्रत्येकात काही विशिष्ट गुणधर्म असतात. कोणत्याही एका नैसर्गिक तंतूपासून `आदर्श' (सर्व गुणांनी युक्त) कापड निर्माण होऊ शकत नसल्यामुळे कृत्रिम तंतूंवर वैज्ञानिकांचे लक्ष केंद्रित झाले, परंतु आजपर्यंत तरी आदर्श तंतू निर्मिणे शक्य झालेले नाही. सर्वगुणसंपन्न असा एकही तंतुप्रकार नैसर्गिक अगर कृत्रिम गटांमध्ये उपलब्ध झालेला नसल्यामुळे कापूस, लोकर इ. पाणी शोषून घेणारे तंतू व नायलॉन, रेयॉन, अॅक्रिलिक वगैरे कृत्रिम तंतू यांचे मिश्रण करून मिश्रतंतू तयार करण्यात आले. हवेतील जलांशामधून प्रत्येक तंतू कमीअधिक प्रमाणात बाष्प शोषून घेतो. लोकर व रेशीम सर्वांत जास्त प्रमाणात पाणी सामावून घेतात तर नायलॉन, अॅक्रिलिक इ. कृत्रिम तंतू पाण्याचा फारच कमी अंश सामावू शकतात. ज्या कपड्यात घामाचे शोषण जास्त होते ते कपडे लवकर खराब होतात.जलशोषण आणि जलरोधन या दोन्ही गुणधर्मांचा समन्वय साधणारा तसेच इतर सर्व दृष्टींनी उपयुक्त असा तंतू निर्माण करण्याचा मानवाचा सतत प्रयत्न चालू आहे. उन्हाळ्यात सुती (कापसापासून तयार केलेल्या) कापडाचा गारवा, थंडीत लोकरीची ऊब, कापसाची स्वच्छता इ. उत्तमोत्तम गुणधर्म एकाच तंतूमध्ये असावे यासाठी संशोधन चालू आहे. टेरिकॉट, टेरिव्हिस्कोज, टेरिवूल, टेरिफ्लॅक्स इ. संमिश्र तंतू या संशोधनातूनच निर्माण झाले आहेत.इतिहास : आदिमानवाच्या प्रगतीचा टप्पा पाणवठ्याच्या जवळ निवास करण्यापर्यंत आला त्याच सुमारास निरनिराळ्या उपलबध तंतूपासून सूत व सुतापासून कापड बनविणे ही कल्पना मूर्त स्वरूप घेऊ लागली. कृत्रिम धाग्यांच्या शोधापूर्वी सु. सात हजार वर्षे फ्लॅक्स, लोकर, कापूस व रेशीम हे चारच प्रकारचे तंतू मानवाला ज्ञात होते. अतिपूर्वेकडील देशांत प्राचीन कापडाचे अवशेष व तत्संबंधित काही उपकरणांचे भाग आढळून आले आहेत. यावरून तिकडील देशांत कापड उद्योग प्रथम उदयास आला असावा असा तर्क केला जातो. चिनी लोकांनी रेशमाच्या किड्यांची जोपासना करून त्यांच्या कोषांपासून सूत व सुतापासून कापड तयार करण्यास प्रथम सुरूवात केली. इ. स. तिसऱ्या शतकात जपानमध्ये व चौथ्या शतकात भारतात रेशीम उत्पादनास प्रारंभ झाला. मोहें-जो-दडो येथील उत्खननात असे आढळून आले आहे की, सिंधू नदीभोवतालच्या प्रदेशात इ. स. पू. सु. 3000 वर्षापूर्वी कपाशीची लागवड झाली असावी. ईशान्य आफ्रिकेमधील नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इ. स. पू. 5000 वर्षापूर्वी फ्लॅक्सच्या कापडाचे कापड विणकाम झाले असावे, असा पुरावा उपलब्ध झाला आहे. ईजिप्तमध्ये इ. स. पू. पहिल्या शतकातील कापडाचे काही अवशेष संशोधकांना आढळून आले आहेत; त्याचप्रमाणे सिरिया देशातील ग्रीक लोकांच्या थडग्यांमध्ये लोकरीचे कापड, रंगवलेले कापड व भरतकामाचे नमुने सापडले आहेत. त्यावरून हा उद्योग त्या देशांमध्येही इ. स. पू. चौथ्या आणि तिसऱ्या शतकामध्ये चालू असला पाहिजे असे दिसते. अलेक्झांडर यांच्या इ. स. पू. 327 मधील भारतावरील स्वारीनंतर कापसाचा प्रसार उत्तर आफ्रिकेत विशेषतः ईजिप्तमध्ये झाला.इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात, साधारण 211 सालामध्ये, इराण व सिरिया या देशांत रेशमी धाग्याचे प्रथम उत्पादन झाले असावे. रेशमी किड्यांची मोठ्या प्रमाणावर जोपासना करून रेशमी कापड निर्माण करण्याचा मान बायझॅंटिन प्रदेशास दिला पाहिजे. हा उद्योग तेथे 976-1025 या कालखंडात उर्जितावस्थेत आला. सिसली बेटात जर असलेले रेशमी कापड 1134-81 या कालात तयार झाले. स्पेनमध्ये अंदाजे 771 सालात कापड विणकाम चालू झाले व 996 ते 1021 या कालात कापड उद्योगात तेथे पुष्कळ सुधारणा झाली. अकराव्या शतकात व्हेनिस येथील कापड उद्योग भरभराटीत होता.इसवी सनाच्या बाराव्या व तेराव्या शतकांमध्ये कापड उद्योगाचे लोण उत्तर इटली व फ्रान्स या प्रदेशांत पोहोचले व तेथे रेशमी कापड बनविण्याचा छोट्या गिरण्या निघाल्या. पंधराव्या शतकापर्यंत तर फ्लॉरेन्स विभागातील उत्पादकांनी रेशमी कापडाच्या निर्यातीपर्यंत मजल मारली. इराण व तुर्कस्तान या देशांतील कारागिरांनी चौदाव्या शतकामध्ये रेशीम व जर या धाग्यांपासून कापड विणण्याचा धंदा प्रस्थापित केला. वास्को द गामा यांनी 1497 मध्ये भारतास जाण्याचा नवीन समुद्रमार्ग शोधून काढल्यावर कापड उद्योगास मोठी चालना मिळाली. तुलनात्मक दृष्टीने कापड उद्योग इंग्लंडमध्ये जरा उशीरानेच, म्हणजे सोळाव्या शतकानंतरच, सुरू झाला. सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत इंग्लंडमध्ये कापडाची आयात होत असे. पुढे अठराव्या शतकात मात्र स्पिटालफील्डस शहराच्या आसपास इंग्रज उत्पादकांनी रेशमी कापड विणण्याचे कारखाने उभारले. यूरोपीय देशांच्या मानाने अमेरिकेत कापड उद्योग जरा उशीरानेच जाऊन पोहोचला. 1705 मध्ये अमेरिकेत कापड विणण्याचा धंदा प्रथम सुरू झाला. या धंद्याची प्रगती मात्र तेथे झपाट्याने झाली.इसवी सनाच्या अठराव्या शतकात औद्योगिक क्रांतीच्या वेळी कापड उद्योगाचा पायासुद्धा यूरोपात घातला गेला. विशेषत: इंग्लंडमध्ये यांत्रिकीकरणाचे युग सुरू झाले व त्याबरोबरच सूतमागाचेही यांत्रिकीकरण सुरू झाले. त्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचा शोध इंग्लंडमध्येच लागला. उदा., कताई साधन, कताई यंत्र, धावता धोटा इत्यादी. व्हिटनी (1761-1825) ह्या अमेरिकन संशोधकांनी याच सुमारास रूईपासून सोप्या पद्धतीने सरकी वेगळी करण्याचे (रेचाई) यंत्र शोधून काढून एक महत्वाची कामगिरी केली.अमेरिकेतील पहिली कापड गिरणी अठराव्या शतकात सुरू झाली. एकोणिसाव्या शतकात अर्थात यूरोपातील औद्योगिक क्रांतीनंतर यूरोपात व अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कापड गिरण्या सुरू झाल्या. यूरोपमध्ये हा उद्योग एवढा फोफावला याचे कारण म्हणजे वसाहतींमधून स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळणारा कच्चा माल हे होय. परिणामत: यूरोपीय देशांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अनेक वसाहती खूप प्रमाणात कापूस पिकवू लागल्या व आपला कापूस यूरोपमध्ये पाठवू लागल्या. वसाहतवादी देश त्याच कापसाचे आपल्या गिरण्यांमध्ये कापड निर्माण करून त्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देशांनाच विकू लागले. इंग्लंडमध्ये कापसाची लागवड नाममात्रही होत नसताना कापड उद्योगातील तो एक अग्रगण्य देश बनला. मॅंचेस्टर हे शहर तेथील कापड गिरण्यांच्या धुरामुळे अक्षरश: `काळे' झाले, एवढ्या कापड गिरण्या तेथे निघाल्या.औद्योगिक क्रांती : सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत सूत कातणे, कापड विणणे इ. क्रिया हातानेच केल्या जात असत. लिओनार्दो दा व्हिंची यांनी चाकाच्या संतत गतीचा उपयोग करून चातीच्या डोक्यावर बसविण्याच्या व धाग्याला पीळ देणाऱ्या आणि कांडीवर सूत गुंडाळणाऱ्या साधनाचा म्हणजे `फिरती' चा (फ्लायरचा) 1516 साली प्रथम शोध लावला. 1773 मध्ये जॉन के या यंत्रज्ञांनी धावत्या धोट्याचा शोध लावला व त्यामुळे विणकाम जलद होऊ लागले. पण मग सुताचाच पुरवठा अपुरा पडू लागला. रिचर्ड आर्कराईट (1769) आणि सॅम्युएल क्रॉम्पटन (1779) यांनी अनुक्रमे वॉटर फ्रेम (जलशक्तीवर चालणारे सूतकताईचे यंत्र) व म्यूल (सूत कताईचे व काढलेले सूत चातीवर गुंडाळण्याचे यंत्र) या यंत्रांची निर्मिती केल्यामुळे सूतकताईत व सूत पुरवठ्यात सुधारणा झाली.त्यानंतरच्या काळात पिंजणे व विंचरणे या कृतींसाठीही सुधारलेली यंत्रे बनविली गेली. 1780-1820 या काळात पूर्वी ज्या ज्या क्रिया हाताने कराव्या लागत त्या सर्व यंत्रांच्या साहाय्याने साधण्यात यश मिळाले. याच सुमारास यांत्रिक मागही तयार झाला. सुरूवातीसुरूवातीस या सुधारलेल्या मागाचा उपयोग स्वस्त किंमतीचा कापूस व लोकर यांचे कापड बनविण्याकडेच होई. मागावर निरनिराळ्या आकृती विणण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री झोझेफ मारी जकार्ड (झाकार) या फ्रेंच शास्त्रज्ञांनी 1834 मध्ये तयार केली. त्यामुळे सुती व रेशमी कापड आकर्षक आकृतींमध्ये मागावर निघू लागले.Comments Nilkanth Mahajan on 08-10-2021

कापड उद्योग निष्कर्ष

मनिषा on 19-09-2021

कापड कंपनी भारतात कोणी उभारली ?

दिक्षा on 19-09-2021

भारतात कापड कंपनी कोणी उभारली?

गौरी on 05-08-2021

भारतातील प्रसिद्ध कापडासाठी ठिकाणे आणिक कापडाचे प्रकारLabels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment