वैज्ञानिक दृष्टिकोण in marathi

Vaigyanik Drishtikonn in marathi

GkExams on 18-11-2018

वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे काय ?*
~~~~~~~~~~~~~~~~~~

*कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण.* अशी एकदम साधी-सोपी व्याख्या करता येईल.किंवा असंही म्हणता येईल की, जेवढा पुरावा उपलब्ध आहे,तेवढाच विश्वास ठेवणे.एखादी गोष्ट सत्य आहे का नाही यासाठी *वैज्ञानिक दृष्टिकोण "निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग." या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे.*


1) वैज्ञानिक दृष्टिकोण शब्दप्रामाण्य म्हणजे कुणी एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे,हे नाकारतो. वैज्ञानिक दृष्टिकोण ग्रन्थप्रामाण्य म्हणजे कुणाच्या तरी पुस्तकात लिहलंय म्हणून ते चिकित्सा न करता स्वीकारणे नाकरतो..


2) चमत्काराचा दावा करणे हे लोकांना मूर्खात काढण्याचं प्रभावी साधन आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. चमत्कार करणारे बदमाश असतात,त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात,आणि याला विरोध न करणारे भ्याड असतात.चमत्करामागे हातचलाखी वा विज्ञान यापैकी काहीतरी एक असते.


3) जगात सुष्ट शक्तिमुळे चांगले आणि दुष्ट शक्तिमुळे वाईट घडते असे अजिबात होत नाही. जे काही घडते त्यामागे निश्चितच कारण असते, आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याच आधारे शोधता येते.


4) आजवर झालेली माणसाची प्रगती केवळ 'विज्ञानाच्या' आधारे झालेली आहे. विज्ञान नेहमीच नम्र असते, ते नवनवीन बदलांना आत्मसात करतं. धर्माप्रमाने ते अंतिम सत्याचा दावा अजिबात करत नाही.


5) मानवाचा आजवरचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे.विज्ञानामुळे झालेले बदल धर्माला काळाच्या ओघात स्वीकारावे लागले आहेत. *आजवर धर्माने एकही मानवी प्रगतीसाठी नविन शोध लावलेला नाही.*


6) *वैज्ञानिक दृष्टिकोण आत्मसात करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छद्म विज्ञानापासून (pseudo science) सावध राहिले पाहिजे.* छद्म विज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वास्तु शास्त्र, जोतिष शास्त्र..


7) आज समाजात अनेक गोष्टी 'यामागे विज्ञान आहे' अस सांगून जनसामान्यांच्या माथी थोपवल्या जातात. त्या गोष्टीत नक्की विज्ञान आहे का, हे "वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे तपासता येते.विज्ञानाला आज सगळ्या गोष्टींची कारणे माहित नाहीत,पण ती कारणे वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या आधारेच समजू शकतात.


8) आपल्या जीवनात आज जे जे काही घडतं,त्यामागे पूर्व संचित आहे,नियती आहे,नशीब आहे,पूर्वजन्मीच पाप आहे.
असं समजणे हा पळपुटेपणा आहे.
कष्टाला पर्याय नाही, हे वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो.


9) आत्मा-परमात्मा,जन्म-मृत्यु,प्रारब्ध-संचित-नशीब-मोक्ष यांची मांडणी अनेक धर्मानी, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. व्यक्तिपरत्वे हा गोंधळ बदलू शकतो. *वैज्ञानिक दृष्टिकोन हे सारा फसवेपणा नाकारतो. जे विज्ञानाच्या कसोटीवर टिकते, ते ते खरं..असं वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो.*


10) *धर्माशिवाय माणसाच्या विवेकातून नीती निर्माण होऊ शकते,असे वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो.*


पंडित नेहरू वैज्ञानिक दृष्टिकोणाचे महत्व सांगताना लोकसभेत म्हणाले होते की...


"Scientific Temperament is a Process of Thinking,Method of Action,Search of Truth,Way of Life,Spirit of Free Man."

Comments

आप यहाँ पर वैज्ञानिक gk, दृष्टिकोण question answers, marathi general knowledge, वैज्ञानिक सामान्य ज्ञान, दृष्टिकोण questions in hindi, marathi notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment