अभियंता दिवस मराठी भाषण

Abhiyanta Diwas MaRaathi Bhashann

GkExams on 22-11-2018

आज 15 सप्टेंबर..आज अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो.


याचे कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे.
जन्म.15 सप्टेंबर 1861


मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच.पण घरची हलाखीची होती.त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले.व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले.तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन B.A. केले.आता त्यांना तांत्रिक शिक्षणाची लागली.


गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसुरुच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त केली ती साधीसुधी नाहीतर सक्करपासून थेट दावणगेरी पर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम क्रमांकात.या दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन 1884 मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा.स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले. 1907 साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली.


एखादा असता तर निवांत आयुष्य जगला असता.पण नियतिला त्यांच्या कडून अजून काही भव्य दिव्य करून घ्यायचे होते.त्यांची कीर्ती ऐकुन हैद्राबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशैष सल्लागार म्हणुन पद दिले. येथे त्यांनौ हैद्राबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधुन शहर पूरमुक्त केलेच पण त्यामुळे त्या शहराचा कायापालट होऊ शकला. म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर.दिली व त्यांनी ती स्विकारली. म्हैसुरला ते 1926 पर्यंत राहिले.त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली.काही काळ ते दिवाणही होते.या व्यतिरिक्त उद्योग सिंचन शेती या क्षेत्रातही मौलिक योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळुन पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टिम ही त्यांचीच देणगी देशाला.

म्हैसुरचे पद सोडल्यानंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग,अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले.समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सर्वोच्च बहुमान केला. मा. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे 14 एप्रिल 1962 रोजी निधन झालेComments

आप यहाँ पर अभियंता gk, दिवस question answers, मराठी general knowledge, भाषण सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment