वन्य प्राणी व निसर्गाची ओळख

Vanya Prani Wa निसर्गाची ओळखPradeep Chawla on 29-10-2018


वन्यजीवांचे संरक्षण काळाची गरज

वन व वन्यप्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. वन्यजीव व्यवस्थापनाचा कायम स्थानिक जनतेशी, लोकप्रतिनिधी आणि अशासकीय संस्थांशी संबंध येतो. त्यादृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक ए.के.मिश्रा यांच्याशी महान्यूजने वन्यजीव सप्ताहच्या पार्श्वभूमीवर केलेली ही बातचीत


जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्यघटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते.
वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात वाघ हा या जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे.
व्याघ्र प्रकल्पासाठी घोषीत केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार असलेले, डोंगराळ तसेच घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. तथापि, त्यांची संख्या ही इतर अभयारण्य किंवा इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने वनविभागामार्फ़त प्रयत्न केले जाणार आहेत.
यामुळे या भागातील वाघांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी मदत होणार आहे.
या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांसाठी पोषक वातावरण तयार करुन, त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश असणार आहे.
व्याघ्र प्रकल्पात मानववस्ती नसलेल्या व मानवी वर्दळ नसलेल्या जंगल भागांचा विकास कोर क्षेत्र म्हणून केला जाणार आहे. त्या सभोवताली असलेल्या क्षेत्राला बफर म्हणून निश्चित केले जाणार आहे. जेणेकरुन तेथे राहणार्‍या लोकांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी कोर क्षेत्रावर अवलंबून न राहता, त्यांना त्यांच्या गरजा त्यांच्या गावातच भागविणे शक्य होणार आहे.
या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचे संनियंत्रण करणे, त्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्यांच्या अधिवासामध्ये सुधारणा करणे, कर्मचार्‍यांची क्षमता वाढविणे इत्यादी गोष्टींचा समावेश यात राहणार आहे.
सध्या मेळघाटात वाघांची संख्या ही साठच्या घरात आहे, असा अंदाज आहे. वाघांची संख्या
झपाटय़ाने कमी होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन 1972 पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत असलेली सर्व राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश आहे.

पर्यावरण संरक्षण : काळाची गरज


आजकालवेगळेच वातावरण अनुभवायला येते. पावसाळ्यात सुध्दा उकाडा जाणवतो. थंडीच्या दिवसात तर कडाक्याची थंडी केव्हा आली? केव्हा येणार? याची स्मृती जागवावी लागते. उन्हाळा हा बारमाही बाराखडीसारखा असतो. घाम आणि तहान ही तर नित्याचीच चिंता मानवी जीवनाला त्रस्त करीत असते, सतावीत असते, व्याकूळ करीत असते’’ (घामाला अपवाद अर्थात् वातानुकूल बंदिस्ती!) असे सूर, असे व्यथित सूर, असे प्रतिकूलतेचा कंठशोष करणारे सूर जीवन व्यथित करतात. कोणते बरे कारण असेल या व्याकूळतेला? मानवनिर्मित कृतघ्नतेला? जीवनाचे विधायक गणित हे परिश्रमाच्या बेरजेवर, दुष्टपणाच्या शुन्यातील वजाबाकीवर, संपन्नतेच्या गुणाकारावर आणि संकुचित वृत्तीच्या भागाकारावर अवलंबून असते. गणितातील जर ‘कॅलक्युरेटर’ कसाही हाताळला गेला तर, ‘अचूक उत्तराची’ अपेक्षा कशी बरे करावी?
सजीवांचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
वनराईचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
पाण्याच्या संचयाचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
नैसर्गिक संपत्तीचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
आपले पर्यावरण कशावर निर्भर आहे? निसर्ग नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर! मनुष्य ही परमेश्‍वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. योग्य-अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता, खरं म्हणजे पूर्ण क्षमता, मनुष्याच्या ठिकाणी असते. संवर्धन की संहार यावरच पर्यावरणाचे संरक्षण अधोरेखित झालेले असते. मनुष्याची सहिष्णू वृत्ती, स्वार्थाची चढती भाजणी अन् कनवाळूपणाची उतरती भाजणी यातून पर्यावरणाचे जतन कसे बरे होईल?
जतन करा, जतन करा
निसर्गाची हिरवी शाल जतन करा
जतन करा, जतन करा
अक्षय धनाचे जतन करा
जतन करा, जतन करा
समृद्धीचा संचय जतन
या काव्यांशाचा मतितार्थ लक्षात ठेवणे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. पर्यावरण संरक्षण कसे शक्य आहे? वृक्षतोड, जंगलांची सफाई, बेसुमार खनिज संपत्तीची लुट, कॉंक्रीटची तापदायक जंगले यावर जर अंकुश लावला तरच पर्यावरणाचे संरक्षण शक्य आहे. खरं म्हणजे ती काळाची गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मुलभूत गरजांना प्राधान्य देणारे, अग्रक्रम देणारे, भूषण ठरणारी मानवी वृत्ती पर्यावरणाला पूरक ठरणारी असते, प्रेरक ठरणारी असते, प्रेरणावर्धक ठरणारी असते. ‘निसर्गाचे संतुलन सान्निध्य’ ज्यावेळी बिघडते, तापदायक ठरते, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. याला कोण कारणीभूत?
आजकाल सर्व प्रकारची माध्यमे, पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे त्याबद्धल आपली मते आग्रहाने मांडीत असतात. विविध संघटना, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाला अनुकूल आणि हितदायक गोष्टींचा भावनिक आग्रह धरतात. मग तो आग्रह वृक्षसंवर्धनाचा असो, अनावश्यक वृक्षतोडीला पायबंद आणि प्रतिबंध करणारा ‘हट्टाग्रह अन् हक्काग्रह’ असो, डोंगरपठाराचे रूपांतर बिनशेतीत करण्याचा ‘सत्ताग्रहा’ला विरोध असो, केरकचर्‍याचे वैज्ञानिकदृष्ट्या आरोग्यवर्धक नियोजन असो, अनिर्बंध पाण्याचा अपव्यय असो, हवा प्रदुषणाची वाढती व्याप्ती असो! या प्रकारच्या सार्‍याच ‘सामाजिक समस्याच’ निकोप समाज व्यवस्थेला घातक ठरतात, दुषणावह ठरतात, तापदायक ठरतात, असं नाही कां आपल्याला वाटत?
हिरवेगार माळरान, हिरवी शाल पांघरलेली आपली मायभूमी, स्वच्छ जलाशये, मग त्या विहिरी असोत, तलाव वा नद्या असोत, पर्यावरणाला बाधक न ठरणारे खोदकाम असो, बांधकाम असो, याचा पुरस्कार ज्यावेळी समाजात होत असतो, त्यावेळी पर्यावरणाचे संतुलन अस्थिर, अस्वस्थ होत असते. याबद्धल कुणाचेही दुमत असू शकत नाही.trees photo
‘मनुष्याची कृतघ्नता’ मग ती विषम विचारांची असो, अवाजवी कृत्यांची असो, नैसर्गिक तत्त्वांना बाधा आणणारी असो, योग्य नियंत्रण न ठेवणारी आणि परिणाम म्हणून वेदनांना निमंत्रण देणारी वृत्ती असो-परिणाम ठरलेला- नाश! हे तत्व पर्यावरणालाही लागू पडणारे आहे. जलसाठ्याचा दुरूपयोग करून चालेल का? जंगलसंपत्तीचा जर विध्वंस केला तर पर्यावरणाचे संरक्षण कसे बरं करता येईल? खनिज उत्खनन निसर्ग नियमांचे उल्लंघन करून केले तर, पर्यावरणावर दुष्परिणाम ठरलेलाच असतो. विषारी द्रव्याची योग्य विल्हेवाट लावली, प्रदुषणमुक्त कारखान्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती, प्लास्टीकचा अल्प उपयोग अन् योग्य पर्यावरणपूरक नियंत्रण, कमी हवा प्रदुषण करणारी वाहने, झाडांची लागवड अन् योग्य निगा, पर्यावरणाला विशेष बाधा न आणणार्‍या कृत्रिम अडथळ्यांना प्रतिबंध, सौरशक्तीचा अधिकाधिक उपयोग इत्यादींकडे ज्यावेळी डोळस वृत्ती, अनुकूल वृत्ती दिसेल तीच काळाची गरज आहे. अन्यथा कोणते भीषण चित्र भविष्यात समाजात दिसेल याचा उहापोह करणारी या काव्यपंक्तीः-
trees photo
कॉंक्रिटची जंगले
ठरतील संहारक पाऊले
प्लास्टिकचा उपद्व्याप
देईल जनांना संताप
बेसुमार वृक्षतोड
देईल संहाराला जोड
विषारी द्रव्याचा ताप
होईल भितीचा बाप
अशाने होईल प्रदुषण
करील मानवांचे शोषण
हे जर टाळायचे असेल तर-
निसर्ग नियमांचे पालन करूया,
वृक्षवेलींचे संवर्धन करूया,
भयमुक्त, संहारमुक्त जीवन जगूया,
अन् पर्यावरणाचे रक्षण करूया.
सम्बन्धित प्रश्नComments

आप यहाँ पर वन्य gk, प्राणी question answers, निसर्गाची general knowledge, ओळख सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment