Vanya Jeev Sanrakhshan Kayda MaRaathi वन्य जीव संरक्षण कायदा मराठी

वन्य जीव संरक्षण कायदा मराठी



GkExams on 01-09-2022


वन्य जीव संरक्षण कायदा मराठी : भारतीय संस्कृतीत वन्यजीवांना असाधारण महत्त्व असले तरी वन्य श्वापदे आणि पक्ष्यांच्या शिकारीचा छंद हा येथील लोकजीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील कायद्यांचा पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिश्र स्वरूपाचा दिसतो. ब्रिटिश राजवटीत अनेक वन्य श्वापदांच्या शिकारीमागे मिळणाऱ्या बक्षिसीमुळे ‘शिकारीच्या खेळा’ला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र काही तत्कालीन कायदे वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात.


‘हत्ती जतन अधिनियम, 1879’ तसेच ‘वन्यपक्षी संरक्षण अधिनियम, 1887’ किंवा ‘सुधारित वन्यपक्षी आणि प्राणी संरक्षण अधिनियम, 1912’ यांकडे वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने केलेले प्रारंभीच्या काळातील प्रमुख कायदे म्हणून बघता येईल.


1935 साली जिम कॉर्बेट अभयारण्यासाठी लागू केलेला आणि सध्या ‘यू.पी. नॅशनल पार्क अधिनियम, 1935’ म्हणून प्रचलित असलेला भारतातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेला सर्वसमावेशक असा पहिला कायदा होता. ‘भारतीय वन अधिनियम, 1927’ या कायद्याद्वारे आरक्षित अथवा संरक्षित वने घोषित करण्यात आली, तसेच अभयारण्येदेखील जाहीर करण्यात आली. अर्थात, शिकारीच्या खेळासाठी वन्यजीव राखणे हाच प्राथमिक उद्देश या कायद्यांमागे होता.


स्वातंत्र्योत्तर काळात भारतात आधी मुबलक असलेल्या वन्यजीवांचे नामशेष होणे अधोरेखित झाल्याने राष्ट्रीय पातळीवर वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कायदा करणे आवश्यक झाले. भारतीय राज्यघटनेत केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या अधिकारांचे विभाजन केलेले आहे.


प्राणी आणि पक्षी यांविषयी कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारांच्या अखत्यारीत असल्याने केंद्र सरकारला या विषयावर कायदे करण्यासाठी दोन किंवा अधिक राज्य सरकारांची संमती आवश्यक होती. 11 राज्यांनी संमती दिल्यामुळे ‘वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972’ हा केंद्रीय कायदा संमत करणे शक्य झाले आणि संपूर्ण देशासाठी एक कायदा अस्तित्वात आला.


वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ‘भारतीय दंड विधान संहिता, 1860’, ‘फौजदारी प्रक्रिया संहिता, सीमा शुल्क अधिनियम, 1962’, ‘भारतीय वन अधिनियम, 1927’, ‘वनसंवर्धन अधिनियम, 1981’, ‘प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंध अधिनियम, 1960’, ‘जैवविविधता अधिनियम, 2002’ हे कायदे वन्यजीव (संरक्षण) कायद्यासाठी पूरक ठरतात.


तसेच भारतीय राज्यघटनेतील 42 व्या घटनादुरुस्तीचाही सकारात्मक परिणाम वन्यजीव संरक्षणाच्या आणि संवर्धनाच्या दृष्टीने झाला आहे. वन्यजीवांवर मानवाची मक्तेदारी आहे या विचारातून ब्रिटिशकाळात अस्तित्वात आलेल्या कायद्यांकडून वन्यजीवांच्या अधिकारांचा विचार करण्याकडे कायद्यांची झालेली वाटचाल प्रगतिशील असली, तरी स्वातंत्र्योत्तर काळातील कायद्यांचा मूळ ढाचा मानवकेंद्रितच आहे.


Source - Loksatta


Pradeep Chawla on 25-10-2018


Check link below -


https://bhasha.maharashtra.gov.in/pdf/KendraAdhiniyam/53-1972.pdf



सम्बन्धित प्रश्न



Comments हा on 01-04-2023

वन्य जीवाच्या संवर्धनासाठी करण्यात येणारे कायदे

Pramod on 06-02-2023

वन्यजीव संरक्षण कायदा के कलम 1972 के कलम 30 क्या है

Akshay on 17-02-2022

जंगली प्राण्यांचा शिकार केल्यास होणारी कार्यवाही


Samruddhi Sunil pandit on 29-09-2021

वन्यजीव संरक्षण

कृष्णा on 17-08-2021

वप्राणी व पक्षी यांच्या सवरक्षण व सवंर्धन बद्दल

माहिती हवी

S t bele on 21-01-2020

वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 20,19 काय आहे





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment