भारताचे Prakritik Vibhag भारताचे प्राकृतिक विभाग

भारताचे प्राकृतिक विभाग



GkExams on 28-02-2019


प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे केले जाते- उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील मदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, भारतीय किनारी मदानी प्रदेश, भारतीय बेटे.
उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश – हिमालय, भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. सिंधू नदी व ब्रह्मपुत्रा नदीच्या घळ्यांदरम्यान हिमालयाच्या तीन समांतर पर्वतरांगा असून त्यांना बहिर्वक्र आकार प्राप्त झाला आहे. हिमालय पर्वतप्रणाली गुंतागुंतीची असून हिमालयाच्या उत्पत्तीबाबत आणि उत्क्रांतीबाबत निरनिराळ्या भूशास्त्रज्ञांनी वेगवेगळी मते मांडली आहेत, मात्र हिमालयाची उत्पत्ती महाभूसन्नती टेथिस समुद्रापासून झाली आहे. हिमालयाच्या उत्पत्तीसंदर्भात मतांची विभागणी दोन भागांत करता येते-
0 भूसन्नतीद्वारे हिमालयाची उत्पत्ती आणि उत्क्रांती (Origin and Evolution of the Himalayas through Geosyncline )
0 भूपट्ट विवर्तनीद्वारे हिमालयाची उत्पत्ती आणि उत्क्रांती (Origin and Evolution of the Himalayas through Plate Tectonics)
हिमालय पर्वताच्या रांगा
0 शृंखला हिमालय (ट्रान्स हिमालय)- बृहद् हिमालयाच्या उत्तरेस शृंखला हिमालयाच्या रांगा आहेत. शृंखला हिमालयाचा विस्तार पश्चिम-पूर्व दिशेने असून त्याची सरासरी लांबी एक हजार किमी इतकी आहे. शृंखला हिमालयात खालील रांगांचा समावेश होतो- काराकोरम रांगा, लडाख रांगा, कैलास रांगा.
* काराकोरम रांगा- भारतातील सर्वात उत्तरेला असलेल्या या रांगांमुळे भारताची अफगाणिस्तान आणि चीनसोबत सरहद्द निर्माण होते. काराकोरमचा विस्तार पामीरपासून पूर्वेकडे गीलगिट नदीच्या पूर्वेला 800 किमी.पर्यंत आहे. जगातील सर्वात उंचीचे दोन क्रमांकाचे आणि भारतीय सरहद्दीमधील सर्वात उंच शिखर के-2 (गॉडविन ऑस्टीन) याच रांगेत आहे. जगातील काही मोठय़ा हिमनदीची निवासस्थाने या रांगेत आहेत. उदा. सियाचीन, बाल्टेरो, बायाफो, हिस्पर. काराकोरम रांगेत अत्यंत उंच शिखरे आहेत. काही शिखरांची उंची आठ हजार मीटरपेक्षा जास्त आहे.
* लडाख रांग- सिंधू नदी आणि तिची उपनदी श्योक यांच्या दरम्यान लडाख रांग आहे. लडाख रांगेची लांबी 300 किमी आणि सरासरी उंची 5800 मी. आहे.
* कैलास रांग – लडाख रांगेची शाखा पश्चिम तिबेटमध्ये कैलास रांग या नावाने परिचित आहे. सर्वात उंच शिखर कैलास आहे.
0 बृहद् हिमालय (Greater Himalaya)
वैशिष्टय़े- लेसर हिमालयाच्या (शिवालिक) उत्तरेकडे िभतीसारखी पसरलेली बृहद् हिमालयाची रांग आहे. बृहद् हिमालय हा मुख्य मध्यवर्ती प्रणोदामुळे (MCT- Main central Thrust) लेसर हिमालयापासून (शिवालिकपासून) वेगळा झाला आहे. बृहद् हिमालयाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या रांगेत जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. यातील बरीचशी शिखरे आठ हजार मी.पेक्षा जास्त आहे. या रांगेमध्ये जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट आहे. या रांगेतील अन्य शिखरे उतरत्या क्रमाने- एव्हरेस्ट, कांचनगंगा, मकालू, धवलगिरी, अन्नपूर्णा, नंदा देवी, कामेत, नामच्या बरवा, गुरला मंधता, बद्रीनाथ.
0 लेसर हिमालय / मध्य हिमालय (Lesser or Middle Himalaya)- मध्य हिमालयाला ‘हिमाचल हिमालय’ असेही संबोधले जाते. दक्षिणेकडील शिवालिक रांगा व उत्तरेकडील बृहद् हिमालय या दोघांना समांतर असा, लेसर हिमालय पसरलेला आहे. लेसर हिमालयाची रचना गुंतागुंतीची असून, या पर्वताची सरासरी उंची 3,500 ते पाच हजार मी. आहे.
लेसर हिमालयात पुढील रांगांचा समावेश होतो- पीरपंजाल, धौलाधर, मसुरी व नागतिब्बा, महाभारत.
* पीरपंजाल- काश्मीरमधील ही सर्वात लांब रांग असून हिचा विस्तार झेलमपासून ऊध्र्व बियास नदीपर्यंत सुमारे
400 किमीपर्यंतचा आहे. रावी नदीच्या आग्नेयकडे ही रांग पुढे धौलाधर म्हणून ओळखली जाते.
* धौलाधर रांग : पीरपंजाल रांग पूर्वेकडे धौलाधर या नावाने प्रसिद्ध आहे. ही रांग पुढे धर्मशाळा व सिमलामधून जाते.
* मसुरी, नागतिब्बा रांग : लेसर हिमालयाच्या पूर्वेकडे जाताना फक्त काही रांगाच स्पष्टपणे ओळखल्या जातात. यांत मसुरी आणि नाग तिब्बा या रांगांचा समावेश होतो.
* महाभारत रांग : मसुरी रांग पुढे नेपाळमध्ये महाभारत रांग म्हणून ओळखली जाते.
0 महत्त्वाच्या िखडी : पीरपंजाल, बिदिल िखड, गोलाबघर िखड, बनिहाल िखड.
0 महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे : लेसर हिमालयात सिमला (हिमाचल प्रदेश), मसुरी, राणीखेत, ननिताल, अल्मोडा (उत्तराखंड), दार्जििलग (प. बंगाल)
0 महत्त्वाच्या दऱ्या :
* काश्मीर दरी- पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे 135 किमी तर रूंदी सुमारे 80 किमी इतकी आहे.
* कांग्रा दरी- हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.
* कुलू दरी- रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.
* काठमांडू दरी – नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी आहे.
* शिवालिक रांगा / बाह्य हिमालय – हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग ही शिवालिक रांग आहे. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात. हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला. येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच डून (Doon) असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू-काश्मीर), शिवालिक रांगाच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.
0 हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण – बुरार्ड यांच्या मते, हिमालयाचे वर्गीकरण खालील प्रकारे करण्यात आले आहे – 1. पंजाब हिमालय 2. कुमाऊँ हिमालय 3. नेपाळ हिमालय 4. आसाम हिमालय.
* पंजाब हिमालय- सिंधू आणि सतलज नदी दरम्यान पंजाब हिमालयाचा भाग असून याची लांबी 560 किमी इतकी आहे.
* कुमाँऊ हिमालय – सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यान कुमाँऊ हिमालयाचा भाग असून याची लांबी 320 किमी इतकी आहे.
* नेपाळ हिमालय – काली नदी आणि तिस्ता नदी यांदरम्यान नेपाळ हिमालयाचा भाग असून याची लांबी 800 किमी इतकी आहे.
* आसाम हिमालय – तिस्ता नदी आणि दिहांग नदी यांच्यादरम्यान आसाम हिमालयाचा भाग असून यांची लांबी 720 किमी इतकी आहे.
* पूर्वाचल – पूर्वेकडे दिहांग घळई ओलांडल्यानंतर हिमालय पर्वतरांगा दक्षिणेकडे वक्राकार गतीने वळलेल्या दिसतात. उत्तर दक्षिणेकडे जाताना यांमुळे टेकडय़ांची एक मालिकाच तयार झाली आहे. यामध्ये पुढील उपविभागांचा समावेश होतो – पूर्व-नेफा, नागा रांगा, मणिपूर टेकडय़ा, उत्तर केचर टेकडय़ा, मिझो टेकडय़ा, त्रिपुरा टेकडय़ा.
* पूर्व-नेफा: यांमध्ये मिश्मी टेकडय़ा आणि पतकोई रांगा यांचा समावेश होतो.
* मिश्मी टेकडय़ा: मिश्मी टेकडय़ांमध्ये पूर्वाचलमधील सर्वात उंच रांगांचा समावेश होतो. येथील अनेक शिखरांची उंची 4500 मी. पेक्षा अधिक आहे.
* नागा रांगा: नागालँड आणि म्यानमार यांदरम्यान, नागा रांगा या जलविभाजक म्हणून कार्य करतात. नागा रांगांच्या पश्चिमेला कोहिमा टेकडय़ा आहेत.
* मणिपूर टेकडय़ा: भारत आणि म्यानमारच्या सरहद्दीला लागून मणिपूर टेकडय़ा आहेत. मणिपूर टेकडय़ांमध्ये लोकटॅक सरोवर आहे. लोकटॅक सरोवरात अभिकेंद्री नदीप्रणाली (Centripetal Drainage) आढळून येते.
0 हिमालयातील महत्त्वाच्या खिंडी
* अघिल खिंड: ही खिंड लडाख आणि चीनमधील सिक्यँग प्रांताला जोडते.
* बनिहाल खिंड: या खिंडीमुळे श्रीनगर-जम्मू शहरे जोडले जातात.
* पीरपंजाल खिंड: जम्मू आणि श्रीनगरला जोडणारी खिंड आहे.
* जोझिला खिंड: यामुळे श्रीनगर, कारगील, लेह प्रदेश जोडले जातात. डिसेंबर ते मेपर्यंत हिमवृष्टीमुळे ही खिंड बंद असते.
* बारा- लाच्या- ला: या खिंडीमुळे मनाली व लेह जोडले जातात.
* बुíझल खिंड: या खिंडीमुळे हिमाचल प्रदेश आणि लडाख हे जोडले जातात.
* रोहतांग खिंड: या खिंडीमुळे हिमाचल प्रदेशातील कुलू-लाहुल-स्पिती या दऱ्या परस्परांसोबत जोडल्या जातात.
* लि-पु लेक: उत्तराखंडातील पिढूर जिह्यात लि-पु खिंड आहे. या खिंडीतूनच मान सरोवराकडे यात्रेकरू जातात. या खिंडीमुळे उत्तराखंड तिबेटकडे जोडला गेला आहे.
* जे-लिपला खिंड: सिक्कीममधील या खिंडीमुळे सिक्कीम आणि तिबेटची राजधानी ल्हासा जोडले गेले आहेत.
* नथुला: भारत आणि चीनच्या सरहद्दीवर नथुला खिंड आहे. 1962च्या युद्धानंतर 2006मध्ये ही खिंड वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आली.



Comments Dhanashree on 09-02-2023

भारतातील नैऋत्य मान्सुनच्या काळातील हवामानाच्या स्थितीचे वर्णन

Nikhil Bhavsar on 26-12-2022

भारतातील प्राक्रतिक विभाग सांगून एका विषयी सविस्तर माहिती लिहा





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment