आय एस ओ मार्क 9000 माहिती

Aay S O Mark 9000 माहिती

Pradeep Chawla on 18-10-2018


आय. एस. ओ. ही एक गैर सरकारी संस्था आहे. जी 13 फेब्रुवारी 1947 ला स्थापन करण्यात आली. भारतामध्ये पूर्वी एखाद्या वस्तूबद्दल त्याची गुणवत्तेची खात्री पटविण्यासाठी आय. एस. ओ. चे म्हणजेच आताचे बी. एस. आय. चे मानांकन घेतले जाते. हे मानांकन उत्पादन / वस्तू यांच्याविषयी गुणवत्तेची खात्री देणारे म्हणून मानले जाते. तथापि, जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्था यामध्ध्ये देश पातळीवरील ही धोरणे काळाच्या कसोटीवर उतरणे शक्य नव्हते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेऊन 120 देशांनी एकत्र येऊन अशा मानंकानाबाबत एक प्रमाण (standard ) निश्चित केले. त्या आधारावर आय. एस. ओ. 9001, 14000, 18000, अशी विविध मानांकने ठरवण्यात आली. ही सर्व आंतरराष्ट्रीय मानांकने उत्पादित अस्तु अथवा सेवा यांच्या दर्जाविषयी नसून ती प्रक्रियेच्या प्रणाली व पद्दतीविषयी स्पष्ट करण्यात आली आहे.याचाच अर्थ एखाद्या उद्योग - व्यवसायात अथवा सेवा उद्योगात व्यवस्थापन पद्दत अथवा सेवा गुणवत्ता सांभाळताना आय. एस. ओ. मानांकन संस्थेने घालून दिलेल्या प्रमाणकानुसार त्या प्रक्रिया पध्दती अवलंबून त्या दर्जाप्रमाणे काम करता येते.
आय. एस. ओ.मध्ये पी. डी. सी. ए. सायकल स्पष्ट केलेले आहेत. यामध्ये नियोजन (plan), कार्यवाही (do), तपासणे (check), पूनार्कार्यवाही (act), यानुसार प्रत्येक कामाची प्रक्रिया सांभाळली जाते. उदाहरणादाखल अगदी आपली कुटुंब व्यवस्थासुद्धा आय. एस. ओ.प्रामाने असू शकते. यामध्ये गृहिणी उद्याच्या स्वयंपाकात काय असंव याचं नियोजन करते. त्या नियोजनाची यादी तयार करते. तयार झालेल्या यादीनुसार कार्यवाही व्हावी म्हणून खरेदी केली जाते. आणलेल्या वस्तूंची प्रक्रिया करून पदार्थ बनविले जातात. पदार्थांची गुणवत्ता तपासली जाते. कुटुंबातील व्यक्तींना ते पदार्थ पुरवून त्यांचे समाधान तपासले जाते. आवश्यकतेनुसार त्यात पुन्हा सुधारणा केल्या जातात व पुढील वेळेला नियाजन करताना झालेल्या चुका होणार नाहीत याची काळजी त्यामध्ये घेतली जाते. याचाच अर्थ छोट्या सुधारणा साधून कुटुंबातील प्रत्येक घटकांचे समाधान कस साधता येईल यासाठी गृहिणी प्रयत्नशील राहते. जर एखाद्या कुटुंबात गुणवत्ता सांभाळण्यासाठी या प्रक्रिया पध्दती अवलंबली जात असेल तर एखाद्या संस्थेत अथवा उद्योग घटकात अशा प्रक्रिया पद्धती अवलंबल्यास त्याचा फायदा कार्यालयीन कर्मचार्यांना तर होतीलच परंतु त्याचबरोबर 'ग्राहक हा राजा ' या ब्रीदवाक्यानुसार अंतिम ग्राहक हा 'संतुष्ट व समाधानी' होईल.

आंतरराष्ट्रीय मानांकनात गुणवत्ता धोरण (क्वालिटी पोलिसी) व दर्जा धोरणाबाबत ( क्वालिटी ओब्जेक्टीव) करण्याबाबत मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. सूचना या संस्थेच्या ध्येयाधोरानांशी सुसंगत असाव्या लागतात. तसेच त्या एस. एम. ए. आर. टी. (स्मार्ट) असल्या पाहिजेत.
एस-Specific - आपली ध्येयधोरणे स्पष्ट असायला हवीत.
एम-Measurable - जी ध्येयधोरणे ठरवली आहेत त्यांचे प्रत्यक्षात साध्य झाल्यानंतर ती मोजता आली पाहिजे . ए-Achievable - ती ध्येयधोरणे आपल्या संस्थेच्या आवाक्यातील असायला हवीत
आर-Realistic - हि ध्येयधोरणे काळाच्या कसोटीवर उतरायला हवीत.
टी-Time Bound - स्पष्ट केलेली ध्येय धोरणे किती कालावधीत सध्या करणार याविषयी स्पष्टता असायला हवी.
आणि असे smart धोरणे ठेऊन आपण आपल्या संस्थेचा विकास घडवून अनु शकतो.Comments Iso 9000 on 29-04-2020

आय. एस.ओ.9000 ही ही गुणवत्ता मानकांची मुख्य मालिका या अंतर्गत एकूण किती प्रमाण चिन्हे देण्यात आले?

Rakesh ovhal on 19-11-2019

Comments ke Ans kaha milenge ?

sauradh on 01-12-2018

iso mark मिळालेला दोन उदोगेल्या समुहाची माहीती

Shoheb Shaikh on 29-09-2018

Iso mark 9000 2 business information

gopal lohar on 12-07-2018

i s o mark 9000 मिळालेल्या दोन उद्योगसमूहांची माहितीLabels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment