ग्रामपंचायत योजना महाराष्ट्र 2016

GramPanchayat Yojana Maharashtra 2016

GkExams on 11-02-2019

योजनेचे स्वरुप माहिती
यात्रास्थळ विकास कार्यक्रमा अंतर्गत नाशिक जिल्हयातील क वर्ग दर्जा असणा-या यात्रा स्थळांच्या ठिकाणी यात्रेच्या वेळी येणा-या भाविकासाठी सोई सुविधा उपलब्ध करुन देणे यात भक्त निवास बांधणे,वाहनतळ बांधणे, स्त्री/पुरष शौचालय बांधणे, पाणी पुरवठा सोय, दिवाबत्ती सोय, संरक्षकभित बांधणे या कामांचा समावेश आहे.


योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
1) विहीत प्रपत्रात माहिती
2) प्रशासकिय मान्यता
3) तांत्रिक मान्यता
4) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे
5) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव
6) तीर्थक्षेत्र क वर्ग मान्यतेचा आदेश तीर्थक्षेत्राचा दर्जा
7) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील 7/12 उतारा अथवा नमुना 8 जागेचा उतारा जागा
8) जागा संस्थेची/ खाजगी मालकीची असल्यास 100 रुपयाचा स्टॅप पेपरवर सदरहु जागा ग्रा.प./जि.प. ला हस्तातंरीत करण्यात बाबतचे संबधितांचे संमतीपत्रक
9) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र
10) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा
11) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प. नाशिक कडे सादर करण्यात यावा.

ग्रामपंचायतींना जन सुविधा योजने अंतर्गत विशेष अनुदान


योजनेचे स्वरुप माहिती
जन सुविधा योजने अंतर्गत
(अ) ग्रामिण भागात दहन/ दफन भुमीची व्यवस्था करणे त्या सुस्थितीत ठेवणे व त्यांचे नियमन करणे यासाठी स्मशानभुमीवर हाती घ्यावयाची कामे दहन/दफन भुमी भुसंपादन,चबुत-यांचे बांधकाम,पोहोच रस्ता,गरजे नुसार कुंपन व भिती घालणे, विद्युतीकरण, आवश्यकते नुसार विद्युत दाहिनी, पाण्याची सोय, स्मृती उद्यान, स्मशान घाट जमिन सपाटीकरण व तळफरशी
(ब) ग्रामपंचायत भवन/ कार्यालय बांधकामे. यात ज्या गावांमध्ये ग्रा.प.इमारत नाही अश्या ठिकाणी सदर योजने अंतर्गत नवीन इमारत बांधकाम प्राधान्याने हाती घेण्यात यावे. या शिवाय जुन्या पडझड झालेल्या ग्रा.प. इमारतीची पुर्नरबांधणी अथवा विस्तार करणे,इमारती भोवती कुपंण घालणे, आवारामध्ये वृक्षारोपण करणे परिसर सुधारणा करणे


योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
1) या योजने अंतर्गत प्रत्येक कामास प्रशासकिय मान्यता ग्रामसभेच्या सहमती नंतर ग्रा.प. मार्फत घेण्यात यावी.
2) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.
3) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे
4) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव
5) सदर योजने अंतर्गत कामांची निवड जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येईल.
6) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील 7/12 उतारा अथवा नमुना 8 जागेचा उतारा जागा
7) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र
8) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा
9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प. नाशिक कडे सादर करण्यात यावा.

मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान पुरविणे


योजनेचे स्वरुप माहिती
मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत बाजारपेठ विकास, सार्वजनिक दिबाबत्तीची सोय,बागबगीचे, उद्याने तयार करणे, अभ्यासकेंद्र, गांवअंतर्गत रस्ते करणे व सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुमीगत नाल्याचे बांधकाम करणे


योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
1) या योजने अंतर्गत ग्रा.प. ने आराखडा तयार करुन त्यास ग्रामसभेची प्रशासकिय मान्यता घ्यावी. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांची प्रस्तावास मान्यता घेण्यात यावी.
2) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.
3) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे
4) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव
5) जिल्हयातील ग्रा.प.चा प्राधान्य क्रम ठरविण्याचा अधिकार जिल्हा नियोजन मंडळाकडे असेल ज्या ग्रा.प.ची लोकसंख्या 5000 च्या वर आहेत व ज्या ग्रामपंचायती पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेत सहभागी होवुन त्या योजनेच्या निकषाची पुर्तता केली असेल त्यामधुनच जिल्हा नियोजन मंडळ प्राधान्यक्रम ठरविल.
6) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील 7/12 उतारा अथवा नमुना 8 जागेचा उतारा जागा
7) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र
8) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा
9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प. नाशिक कडे सादर करण्यात यावा.

मा.लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामिण भागातील गावांतर्गत रस्ते गटारे व अन्य मुलभुत सुविधा पुरविणे


योजनेचे स्वरुप माहिती
मुलभुत सुविधा योजने अंतर्गत गावांतर्गत रस्ते, गटारे, पाऊसपाणी निचरा, दहनभुमी व दफनभुमीची सुधारणा करणे, संरक्षकभित ,ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, आठवढी बाजारासाठी सुविधा, गावांमध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी सुविधा, सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण करणे.


योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
1) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.
2) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे
3) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव
4) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील 7/12 उतारा अथवा नमुना 8 जागेचा उतारा जागा
5) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र
6) सदर योजने अंतर्गत काम सुचविणे बाबत लोक प्रतिनिधी यांचे शिफारस पत्र
7) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा
8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प. नाशिक कडे सादर करण्यात यावा.

पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना


महाराष्ट्र शासन,ग्रामविकास व जलसंधारण विभाग,शासन निर्णय क्र.व्हीपीएम/2610/ प्र.क्र.1 /पंरा-4 मंत्रालय दि.18 ऑगस्ट 2010


योजनेचे स्वरुप माहिती
लोकसहभागातून चांगल्या प्रकारच्या शासन सहकार्याने उच्च प्रतीच्या मुलभूत सुविधांचा हा कार्यक्रम आहे. पर्यावरणाचे संवर्धन,जतन व संरक्षण करणे, राज्य शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून समन्वय करणे, ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणे सुविधा निर्माण करणे इ. हा या योजनेचा उद्येश आहे.
ही एक अत्यंत महत्तवाची योजना असुन सर्वांनी यात सहभागी होणे गरजेचे आहे.

Comments

आप यहाँ पर ग्रामपंचायत gk, योजना question answers, महाराष्ट्र general knowledge, 2016 सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment