Shivaji MahaRaj Itihas MaRaathi pdf शिवाजी महाराज इतिहास मराठी pdf

शिवाजी महाराज इतिहास मराठी pdf



Pradeep Chawla on 12-05-2019

शिवाजी शहाजी भोसले

छत्रपती

Shivaji British Museum.jpg

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्र

Flag of the Maratha Empire.svg

मराठा साम्राज्य

अधिकारकाळ जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०

राज्याभिषेक जून ६, १६७४

राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,

सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत

आणि

उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून

दक्षिण भारतात तंजावरपर्यंत

राजधानी रायगड किल्ला

पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

जन्म फेब्रुवारी १९, १६३०

शिवनेरी किल्ला, पुणे

मृत्यू एप्रिल ३, १६८०

रायगड

उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले

वडील शहाजीराजे भोसले

आई जिजाबाई

पत्नी सईबाई,

सोयराबाई,

पुतळाबाई,

काशीबाई,

सकवारबाई

लक्ष्मीबाई

सगणाबाई

गुणवंतीबाई

राजघराणे भोसले

राजब्रीदवाक्य प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।

चलन होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन??)





छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.



महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.



शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.



अनुक्रमणिका



१ जन्म

१.१ कौटुंंबिक माहिती

१.२ वंशज

२ मार्गदर्शक

२.१ मावळ प्रांत

२.१.१ शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे

३ शिवाजी महाराजांचे सरसेनापती

४ स्वराज्य स्थापनेचा इतिहास

५ पहिली स्वारी - तोरणगडावर विजय

६ राजमुद्रा

७ शहाजीराजांना अटक

८ जावळी प्रकरण

९ पश्चिम घाटावर नियंत्रण

१० आदिलशाहीशी संघर्ष

११ अफझलखान प्रकरण

१२ प्रतापगडाची लढाई

१३ कोल्हापूरची लढाई

१४ सिद्दी जौहरचे आक्रमण

१५ पावनखिंडीतील लढाई

१६ पुरंदराचा तह

१७ मोगल साम्राज्याशी संघर्ष

१८ शाहिस्तेखान प्रकरण

१९ सुरतेची पहिली लूट

२० मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

२१ आग्य्राहून सुटका

२२ सर्वत्र विजयी घोडदौड

२३ राज्याभिषेक

२४ दक्षिण दिग्विजय

२५ शिवाजी जयंती

२५.१ इतिहास

२५.२ सण

२६ शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन

२७ साहित्यात व कलाकृतींमध्ये

२८ शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय

२९ शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके

३० पूर्वज

३१ संदर्भ

३२ बाह्य दुवे



जन्म

शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी



पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[१] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७((वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविली असते.

एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले.

कौटुंंबिक माहिती



शहाजीराजे (वडिल)



प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.



जिजाबाई (आई)



जिजाबाई व बाल शिवाजी



जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात.



पत्नी

सईबाई निंबाळकर

सोयराबाई मोहिते

पुतळाबाई पालकर

लक्ष्मीबाई विचारे

काशीबाई जाधव

सगणाबाई शिंदे

गुणवंतीबाई इंगळे

सकवारबाई गायकवाड



वंशज



मुलगे

छत्रपती संभाजी भोसले

छत्रपती राजारामराजे भोसले



मुली

अंबिकाबाई महाडीक

कमळाबाई (सकवारबाईची कन्या)

दीपाबाई

राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)

राणूबाई पाटकर

सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)



सुना

संभाजीच्या पत्नी येसूबाई

राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)

जानकीबाई

राजसबाई (पुत्र संभाजी - १६९८-१७६०)

अंबिकाबाई (सती गेली)

सगुणाबाई



नातवंडे

संभाजीचा मुलगा - शाहू

ताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजी

राजसबाईची मुले - दुसरा संभाजी



पतवंडे

ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.

दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)



मार्गदर्शक



लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.



जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.[२]

मावळ प्रांत



मुख्य पान: मावळ



छत्रपती शिवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला मावळ आणि खोर्‍यातील सैनिकांना मावळे म्हणत.





छत्रपती शिवाजी महाराज27.jpg

शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे



कान्होजी जेधे

बाजीप्रभू देशपांडे

मुरारबाजी देशपांडे

नेताजी पालकर

बाजी पासलकर

जिवा महाला : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.

तानाजी मालुसरे

हंबीरराव मोहिते



शिवाजी महाराजांचे सरसेनापती



नेताजी पालकर

प्रतापराव गुजर

हंबीरराव मोहिते

खंडेराव कदम



स्वराज्य स्थापनेचा इतिहास

शिवाजी महाराज





Wiki letter w.svg

कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.

अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पहिली स्वारी - तोरणगडावर विजय



इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

राजमुद्रा



छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-



संस्कृत :



चित्र:Rajmudra.jpg

राजमुद्रा



प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते



मराठी :



ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.



इंग्रजी :



The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon .It will be worshiped by the world it will shine only for well being of people.

शहाजीराजांना अटक



शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्‍यां बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.



शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.

जावळी प्रकरण



आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

पश्चिम घाटावर नियंत्रण



इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते.





Wiki letter w.svg

कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.

अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

आदिलशाहीशी संघर्ष





Wiki letter w.svg

कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.

अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अफझलखान प्रकरण

अफझलखान मृत्यू



आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.



शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली.



आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.

शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.



अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.

प्रतापगडाची लढाई



पहा प्रतापगडाची लढाई

कोल्हापूरची लढाई



पहा कोल्हापूरची लढाई

सिद्दी जौहरचे आक्रमण



अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.

पावनखिंडीतील लढाई



पहा पावनखिंडीतील लढाई

पावनखिंड स्मारक



पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील.



शिवाजीराजांना ते पटेना पण बाजीच्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.



शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.

पुरंदराचा तह



पहा पुरंदराचा तह

मोगल साम्राज्याशी संघर्ष



मोगल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.





Wiki letter w.svg

कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.

अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

शाहिस्तेखान प्रकरण



मोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.



एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मोगलांच्या आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला, तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा.



अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.

सुरतेची पहिली लूट



इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.



लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.

मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

पुरंदरचा तह



इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.

आग्य्राहून सुटका



इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.

शिवाजीराजे दिल्ली दरबारात



शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.



आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरे कडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.



यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

सर्वत्र विजयी घोडदौड



शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.

राज्याभिषेक

राज्याभिषेक



६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून करणकौस्तुभ नामक ग्रंथही लिहवून घेतला.





Wiki letter w.svg

कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.

अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

दक्षिण दिग्विजय





Wiki letter w.svg

कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.

अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

शिवाजी जयंती



मुख्य लेख: शिवाजी जयंती



इतिहास



भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.



ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरूषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.



तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.



आज ज्या ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात जुलियन दिनदर्शिका अधिकृत होती. जुलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (जुलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे जुलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. (४ आॅक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ आॅक्टोबर १५८२ येतो.). अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.



शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते. पहा : शिवाजीच्या जन्मतारखेचा वाद

सण



शिवाजीच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजीच्या जन्मतारखेबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १००च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.



भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली. त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली. इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.

शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन



ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records

डच ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records

छत्रपति शिवाजी महाराज (लेखक - दि.वि. काळे)

झुंज नियतीशी (अनुवादित, अनुवादक - इंद्रायणी चव्हाण, मूळ इंग्रजी - Challenging Destiny : Chhatrapati Shivaji - A Biography, लेखक - मेधा देशमुख-भास्करन)

डाग रजिस्टर- डच पत्रव्यवहार

श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष (इंद्रजित सावंत), (२०१७)

मराठा-स्वराज्य संस्थापक श्रीशिवाजी महाराज (१९३२) लेखक - चिंतामण विनायक वैद्य

राजा शिवछत्रपती (लेखक - ब.मो. पुरंदरे, १९६५)

छत्रपती शिवाजी महाराज प्रकाशन १९७० मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते (पूर्वार्ध व उत्तरार्ध,पृष्ठसंख्या १२००) लेखक: वासुदेव सीताराम बेंद्रे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी (बालवाङ्मय, श्रीकांत गोवंडे)

श्री राजा शिवछत्रपती-खंड १ २, (गजानन भास्कर मेहेंदळे)

शककर्ते शिवराय, खंद १ आणि २ (१९८२) लेखक - विजय देशमुख : (हिंदी अ्नुवादसुद्धा उपलब्ध)

शिवकालीन घोडदळ आणि युद्धनीती (डॉ. राम फाटक)

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ व २ : भारत इतिहास संशोधक मंडळ

शिवकालीन स्त्रियांचे अधिकार (नीलिमा भावे)

शिव छत्रपतींचे चरित्र (रघुनाथ विनायक हेरवाडकर)

शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध (३री आवृत्ती) (इंद्रजित सावंत?)

Shivaji - The Great Guerrilla (R..D. Palsokar)

Shivaji - ((सर यदुनाथ सरकार)

शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोळकर)

शिवाजी व शिवकाल (सर यदुनाथ सरकार मूळ इंग्रजी मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०)

शिवाजी द ग्रँड रिबेल (इंग्रजी, डेनिस किंकेड, १९३०), नवी आवृुत्ती - ‘द ग्रँड रिबेल : अ‍ॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ (२०१५)

शिवाजी निबंधावली खंड १ व २

शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (लेखक -प्रा. नामदेवराव जाधव)

क्षत्रियकुलावतंस छत्रपति श्रीशिवाजी महाराज ह्यांचे चरित्र (लेखक - कृष्णराव अर्जुन केळूसकर). हे शिवाजीचे मराठीतले १९०६ साली लिहिलेले पहिले चरित्र.

शिवाजी-निबंधावली भाग १ व २ : या ग्रंथात, श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अप्रत्यक्षपणे प्रकाश पाडणारे व शिवकालीन परिस्थितीचे वर्णन करणारे अनेक लेख संग्रहित केले आहेत.



या ग्रंथात पांडुरंग वामन काणे, शंकर दामोदर पेंडसे, गोविंद रामचंद्र राजोपाध्ये, रामकृष्ण परशुराम सबनीस, यशवंत खुशाल देशपांडे, वासुदेव आत्माराम देशप्रभू, जनार्दन सखाराम करंदीकर, महामहोपाध्याय रायबहादूर गौरीशंकर ओझा, शंकर वामन दांडेकर, श्रीक्रुष्ण व्यंकटेश पुणतांबेकर, भास्कर वामन भट, शिवराम काशीनाथ ओक, सुरेन्द्रनाथ सेन, पंडित वैद्यनाथन शास्त्री तसेच Sir Charles Malet अशा अनेक थोर इतिहास अभ्यासकांचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संबंधित विविध विषयांवरील लेख आहेत.



शिवाजीची कर्नाटक मोहीम (एम.एस. नरवणे)

शिवाजी जीवन आणि काळ (गजानन भास्कर मेहेंदळे)

Shivaji Maharaj the greatest (हेमंतराजे गायकवाड)

शिवाजी महाराजांचा पुरुषार्थ (श्रीपाद दामोदर सातवळेकर)

शिवाजी महाराजांची डायरी (नामदेवराव जाधव)

शिवाजी महारांची पत्रे(

शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (नामदेवराव जाधव)



साहित्यात व कलाकृतींमध्ये



मुख्य पान: छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं



विभागातील मजकूर ज्ञानकोशीय पुनर्लेखनासाठी छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं या मुख्य लेखात हलवला आहे. त्या लेखाचे काम झाल्यानंतर एक संक्षिप्त ज्ञानकोशीय उतारा या विभागात आणला जाईल. तोपर्यंत कृपया छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं या लेखात लेखन करण्यास प्राधान्य द्यावे.



शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय



काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे.

इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्‌समध्ये म्हटले आहे की शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात.

शिवाजीच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेन्च, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजीची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या ॲलेक्झांडर, हॅनिबल, ज्युलियस सीझर, सरटोरियस यांच्याशी केली आहे. पण या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. शिवाजी सर्वगुणसंपन्‍न होता. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. पाश्चात्त्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणाऱ्या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता द्वेष. लंपटपणा अशा अवगुणांपासून शिवाजीचे जीवन अलिप्त होते.



शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके



पुस्तकाचे नाव : शिवदिग्विजय (रचनाकाळ- इ.स. १८१८). टीकेचा तपशील :-



शिवाजीची पत्‍नी सोयराबाई हिने आपल्या पतीवर विषप्रयोग केला, आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.



पुस्तकाचे नाव : अनुपुराण. या काव्याचा कवी- परमानंदाचा नातू गोविंदा. काव्याचा रचनाकाळ- इ.स. १७४५. टीकेचा तपशील :-



शिवाजीची पत्‍नी सोयराबाई ही कलीची दूती असलेली राक्षसी होती. तिने केलेली सर्व कृत्ये स्वार्थापोटी केली होती. स्वाभिमान राखण्यासाठी व आपल्या शौर्याला वाट करून देण्यासाठी संभाजी मोगलांना मिळाला

’अनुपुराण’ विश्वासार्ह नसल्याचे जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई यांनी म्हटले आहे.

सोयराबाईचा सवतीमत्सर, राजकारणातील तिची लुडबूड, शिवाजी महाराजांचे नैराश्य व बायकोच्या तंत्राने वागण्याची प्रवृत्ती या ’अनुपुराणा’ने सांगितलेल्या गोष्टींचे पडसाद रणजित देसाईंनी लिहिलेल्या ’श्रीमान योगी’ या पुस्तकात पडले आहेत.



पुस्तकाचे नाव : डच संग्रहातील डाग रजिस्टर (इ.स. १८८० पृष्ठ क्रमांक ७२४ ते ७२९ पानांवरच्या २३-१०-१६८० च्या नोंदी). टीकेचा तपशील :-



गोवळकोंड्याहून आताच बातमी आली, की शिवाजीच्या दुसऱ्या बायकोने शिवाजीवर विषप्रयोग केला असावा आणि आणि तिचा लहान मुलगा राजाराम याला गादीवर बसविण्याचा घाट घातला होता. त्याला तुरुंगात टाकले आहे आणि थोरला मुलगा संभाजी राज्य करीत आहे.



पुस्तकाचे नाव : मनुचीने लिहिलेला ग्रंथ- ’स्टोरिया द मोगोर’ (खंड २ रा, पृष्ठ २३२). टीकेचा तपशील :-



संभाजीविरुद्ध अनेक अधिकाऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या, व शिवाजीस भीती पडली की त्या वेळीच थांबवल्या नाहीत तर राज्यातील प्रधान व अधिकारी बंड करतील. त्यामुळे शिवाजीने संभाजीस कैद करून एका किल्ल्यावर ठेवण्याचे ठरविले आणि धाकट्या मुलास आपल्यामागे राज्य देण्याचे निश्चित केले. पण संभाजीस आपल्या बापाच्या आज्ञांचा सुगावा लागला आणि त्याने वेळीच पलायन केले आणि आश्रयासाठी औरंगजेबाचा दरबार गाठला. घरच्या भांडणावर पडदा टाकण्यासाठी शिवाजीने संभाजीला मोगलांकडे पाठविले नव्हते.



मुंबईकर इंग्रजांच्या २८-४-१६८०च्या पत्रातील माहिती :-



शिवाजीच्या निधनाची निश्चित बातमी मिळाली. त्याला रक्ताची जोरात उलटी झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला.



’मासिरे आलमगीर’ या पर्शियन लेखातील माहिती :-



शिवाजी घोड्यावरून उतरला व अतिउष्णतेमुळे रक्ताची दोन वेळा उलटी झाल्याने तो मरण पावला.



इगेन वी या लेखकाच्या पुस्तकातील मजकूर :-



शहाजी हा निजामाच्या राज्याचा सेवक होता आणि त्याने पुणा परगणा दादोजी कोंडदेवावर सोपवून टाकला होता.

हे तर्कट कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. खरी गोष्ट अशी होती की कर्नाटकातील आदिलशाही अत्याचाराने शहाजी अत्यंत व्यथित झाला होता. आदिलशहा, निजामशाहा आणि मोगल यांच्याकडे त्याने नोकऱ्या पत्करल्या. पण अविवेकी लहरी सुलतानी दरबारांतील हिंदुद्वेषी खुनशी मुसलमान सरदार, जनानखान्यातील कपट कारस्थाने या सर्वांमुळे शहाजीच्या निष्ठेचे कुठेच मोल नव्हते. त्यामुळे त्याने शिवाजीला सह्याद्रीने वेढलेल्या महाराष्ट्रात पाठविले व त्याच्याकडून आपल्या हयातीतच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. शहाजीला याची किंमतही मोजावी लागली. इ.स. १६४८ व १६६३मध्ये त्याला दोनदा कैद भोगावी लागली. दोन्ही वेळा शहाजी कैदेतून सहीसलामत सुटला. मात्र आदिलशहाने सिद्दी जौहर, सिद्दी यातून, मसूद आणि बहलोलखान या सरदारांना जबर शिक्षा केल्या. शहाजीला अशी शिक्षा करण्याचे आदिलशहाला धाडस झाले नाही, कारण शिवाजी बळ एवढे वाढले होते की, मोगलांविरुद्ध लढण्यासाठी शिवाजीची मदत घेण्याचे आदिलशहाने ठरविले होते. असा तहही त्याने केला होता.



व्हलेंटाइन, ग्रॅन्ट डफ, जे स्कॉट या इंग्रज इतिहासकारांची पुस्तके : टीकेचा तपशील :-



अफझलखानाला शिवाजीने विश्वासघाताने मारले



बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार यांचे पुस्तक : टीकेचा तपशील :-



शिवाजी अक्षरशत्रू होता, त्याला मुळीच लिहिता वाचता येत नव्हते.

या इंग्रजी आणि बंगाली इतिहासकारांनी केलेल्या विधानांना वि.का. राजवाडे, शेजवलकर, सेतुमाधव पगडी, दत्तो वामन पोतदार आणि डॉ. बाळकृष्ण या नामवंत संशोधकांनी पुराव्यांसहित समर्पक उत्तरे देऊन अशा आक्षेपांतील फोलपणा सिद्ध केला आहे.



भारतात असकारितेची चळवळ चालू होती त्या काळातील इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रकट होणारी तत्कालीन भारतीय राजकारण्यांची मते :-



अफझुलखानाचा वध आणि सुरतेची लूट हे शिवाजीच्या हातून घडलेले अक्षम्य गुन्हे आहेत.

साहित्यसम्राट न.चिं. केळकरांनी असल्या विधानांचा खरपूस समाचार घेतला होता.



उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील सय्यद तफझुल दाऊद सईदखान नावाच्या वकिलाने इ.स. १९३५ साली ’रिअल शिवाजी’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यात एका डच पत्रातील उल्लेख छापून शिवाजीराजांची प्रतिमा डागाळेल अशा तर्‍हेची शिवाजीच्या कुटुंबातील स्त्रियांसंबंधांत खोटीनाटे बदनामीकारक विधाने केली होती. भालजी पेंढारकरांनी या विरुद्ध कोल्हापुरात बंड पुकारले होते. कोल्हापूर संस्थानचे दिवाण रावबहादूर डी,ए, सुर्वे यांनी या पुस्तकावर बंदी घातली आणि जनतेच्या रोषाला आवर घातला. सय्यदच्या या पुस्तकातील मजकुराचे खंडन डॉ.बाळकृष्ण यांनी त्यांच्या ’शिवाजी द ग्रेट’ या ग्रंथात केले आहे.

पंडित नेहरूंच्या ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात शिवाजी हा एक दरवडेखोर आणि लुटारू होता असे म्हटले आहे.



पूर्वज























मालोजीराजे भोसले



































































































जिजाबाई भोसले



शहाजीराजे भोसले



शरीफजीराजे भोसले







































































संभाजी शहाजी भोसले



शिवाजीराजे भोसले




सम्बन्धित प्रश्न



Comments ravi banduke on 11-02-2024

shivsji msharaj all information

Prathmesh on 10-02-2024

Muze Kdk Dikaho

Nikhil shingade on 03-02-2024

Sivaji maharaj ki how meny vifs


Vaishu on 30-01-2024

ADCA Full form

Vaishu on 30-01-2024

शिवाजी महाराजांचे शिकवणूक वर माहिती सांगा.

Kartik on 22-12-2023

शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँ साहेब चा वाटा

kajalthakare68@gmail.com on 08-10-2023

Shivaji maharaj sarv Dharm sambhav v jatiy ted


Pavanghole on 26-07-2023

हमारे दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे



Hemant on 08-12-2020

Shivaji Maharaj pahila kila kontua sali jikla

Anuj on 05-10-2021

Where is mounteverest

Pooja deshmane on 31-12-2021

Aho full form

Rushikeshdalve on 01-01-2022

Shivaji Maharaj mahiti


Sqndip on 15-01-2022

Whatsapp group

Dnyaneshwar sutar on 19-01-2022

Dnyaneshwar sutar

Kartik rathod on 11-02-2022

KAr

Poonam wayade on 12-02-2022

Agra sutka shivrayanchi kutniti nibandh

Shweta Nivas shendre on 13-04-2022

छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती

यश दम धर on 03-06-2022

शि


Mauli sonule on 12-09-2022

Shivaji maharaj ka Jane kb human tha

Ganesh on 12-09-2022

शिवाजी महाराज का पुरा नाम

Ritesh Savant on 15-10-2022

Nice

Satyam on 21-11-2022

Shivaji son name

Shrishail on 28-02-2023

शहाजी राज्यांच्या वडिलांचे नाव

Shrishail on 28-02-2023

शहाजी राज्यांच्या वडिलांचे नाव काय होत

Aditya Vibhute on 27-06-2023

पहिले पंतप्रधान कोण आहे



नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment