धर्मनिरपेक्षता मराठी निबंध

Dharmnirpekshta MaRaathi Nibandh

GkExams on 04-01-2019

धर्मनिरपेक्ष भारत! धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? सर्व धर्मांना समान वागणूक देणे, धर्माधर्मात कोणताही भेदभाव न करणे म्हणजेच धर्मनिरपेक्षता असा मी समजतो, पण काय खरच आपण धर्मनिरपेक्ष आहोत? आपली धर्मनिरपेक्षतेची नेमकी व्याख्या काय? काय एका धर्माच्या सुखासाठी दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता? कि, निवडणुकीत मते मिळवण्यासाठी एखाद्या विशिष्ट धर्माला सोयीसवलती देत बाकी धर्माच्या अधिकाराची किवा गुणवत्तेची पायमल्ली करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता काय?

माझ्या मते आपल्या देशात अजिबात धर्मनिरपेक्षता नाही, उलट जगात सगळ्यात या गोष्टीचा जर कोणी फायदा घेत असेल तो आपला देश. आपल्या घटनेने जरी आपल्याला धर्मनिरपेक्षता आणि अहिंसा असा संदेश दिला असला, तरी त्या थोर घटनाकारांच्या विचारांचा आपण आपल्याला हवा तसा सोयीस्कर अर्थ काढून किंबहुना घटनेचा आपल्याला हवा तसा वापर करून घेत असतो.
आपल्या देशाला जाती-धर्माचे राजकारण नवीन नाही, अजून खोलात जाऊन विचार केला तर, आपल्याकडे विकासाच्या मुद्यावर राजकीय युद्ध न खेळता, जाती-धर्माच्या नावावर राजकारण कारण जास्त सोप्प आहे. आणि तो पर्याय आपले राजकीय पक्ष अत्यंत यशस्वीपणे वापरतात. स्वताला धर्म निरपेक्ष म्हणवून घेणारे हे पक्षच सर्वाधिक प्रमाणात धार्मिक भावनांचे गलिच्छ राजकारण करत सत्ता उपभोगतात. खर सांगायचा तर आपल्या देशाचा सर्व राजकारण धर्म आणि जातिभेदाभोवती फिरत असत. आपल्या प्रत्येक नेत्याला एखाद्या विशिष्ट धर्माचे किवा जातीचे नेतृत्व म्हणूनच बघितलं जात, त्यामुळे आपल्याकडे राष्ट्र भावना, राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रीय विकास, राष्ट्र गौरव या गोष्टी दुय्यम ठरवून आरक्षण, सवलती, प्रादेशिक वाद या गोष्टींचा जास्त बोलबाला असतो. आणि त्याचमुळे हि राजकीय परिस्थिती इतकी भयानक होत चालली आहे कि, आज एकविसाव्या शतकातहि आपण हिंदू-मुस्लीम, ब्राम्हण-मराठा, उच्च कुळ-नीच कुळ अश्या गोष्टींमध्ये अडकून पडलो आहोत, आपल्या धर्मा बद्दल जातीबद्दल आदर असावा नव्हे तो असायलाच पाहिजे, पण तो आदर, अभिमान बाळगताना त्याचा फायदा या गलिच्छ राजकारणाला होत तर नाही ना याचाही विचार करायला हवा. नुसते आम्ही धर्मनिरपेक्ष, आम्ही सर्वांना समान वागणूक देतो हे दाखवण्यासाठी हिंदू धर्माचा हिंदुस्थानात तिरस्कार करून इतर धर्मापुढे लाळघोटेपणा करणे, हि चूक राजकीय पक्षांनी करू नये. त्यापेक्षा विकासाकडे लक्ष दिले तर त्याचा फायदा अधिक होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो धर्मनिरपेक्ष कोणीच असू शकत नाही, स्वधर्म बद्दल आदर असणे, प्रेम असणे हा मानवाचा नैसर्गिक गुणधर्म आहे, हा ज्यांचे मूळ एका विशिष्ट धर्माचे नसेल ते कधीच कोणत्या एका धर्माचा अभिमान बाळगू शकत नाहीत, त्याचा ओढा कायम भलतीकडेच असतो, असे लोक स्वतःला धर्मनिरपेक्ष दाखवायचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या भावनिक मुद्याला हात घालून आपला वापर करतात. हेच लोक सर्वाधिक धर्मांध असतात असं मला वाटतं, कारण त्यांचा धर्म सत्ता, पैसा आणि ताकद हेच असतं. त्यांच्या या खेळीला उत्तर देण्याची ताकद तुमच्या आमच्यात आहे. फक्त त्यासाठी हा वरवरचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाडून टाका. आणि स्वधर्मचा अभिमान ठेवा, म्हणजे या धर्मनिरपेक्षतावादी लोकांचे खोटेपणाचे बुरखे आपोआप गळून पडतील…
मी माझी मतं मांडायला घाबरत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जर खरं बोलायला घाबरत नसाल तर बिनधास्त तुमची पण प्रतिक्रिया द्या.Comments

आप यहाँ पर धर्मनिरपेक्षता gk, मराठी question answers, निबंध general knowledge, धर्मनिरपेक्षता सामान्य ज्ञान, मराठी questions in hindi, निबंध notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment