टुंड्रा प्रदेश मराठी

Tundra Pradesh MaRaathi

GkExams on 18-11-2018

तैगा : तैगा हा तुर्की–रशियन शब्द असून त्याचा अर्थ पाणथळ जागेतील सूचिपर्णी अरण्ये असा होतो. चिलीचा अगदी दक्षिणेकडील भाग व न्यूझीलंडच्या दक्षिण बेटातील अपवाद वगळता तैगा प्रदेश फक्त उत्तर गोलार्धात आढळून येतात. उत्तर अमेरिकेत तैगाचा विस्तार सु. 55° उ. ते 66° 30′ उ. अक्षांशापर्यंत आढळतो. यामध्ये अलास्का, कॅनडाचा सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापर्यंतचा व त्यापलीकडे लॅब्रॅडॉर व न्यू फाउंडलंडपर्यंतचा प्रदेश येतो, तर युरोप खंडात तैगाचा विस्तार 60° उ. ते 66° 30′ उ. असून त्यात नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे देश व युरेशियाचा काही भाग येतो. आशियाच्या उ. भागात 50°उ. अक्षांशापासूनच तैगा प्रदेशाला सुरूवात होऊन आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेस तो पसरलेला आढळतो. यात कॅमचॅटका द्वीपकल्पाचा समावेश होतो. (नकाशा मुख्य तैगा प्रदेश दर्शवितो).हवामान : अतिशीत हिवाळे, सोसाट्याचे वारे, हिमवृष्टी, बेताचा पाऊस व उन्हाळ्यातील दीर्घकाळ टिकणारे प्रकाशमान या सर्व गोष्टींचा तगातील वनस्पतींवर परिणाम होतो. खंडांतर्गत शीत व विषम हवामानाच्या प्रदेशात तैगातील वनस्पतींची वाढ होते. तैगा प्रदेशातील हिवाळे दीर्घकाळ टिकणारे (8 ते 9 महिने) व अतिथंड असतात. हिवाळ्यात तपमान गोठण बिंदूखाली –30° ते 40° से. पेक्षाही कमी असते. अशा ठिकाणी सूचिपर्णी वृक्षांखेरीज इतर वृक्ष तग धरू शकत नाहीत. येथील उन्हाळे लहान असून फक्त चारच महिने तपमान 6° से. वर असते. उन्हाळ्यात सु. 20 तासांपेक्षा जास्त काळ प्रकाश मिळतो व तो वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त ठरतो. या भागात वर्षभर थोडा थोडा पाऊस पडतो. तो सु. 30 ते 50 सेंमी. असतो. उन्हाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. हिवाळ्यात हिमवृष्टी होत असून वर्षभर सरासरी तपमान कमी असल्याने बाष्पीभवनाचा वेग अगदी कमी असतो. उन्हाळ्याच्या सुरूवातीस हे बर्फ वितळू लागते आणि पाणी जमिनीत मुरते. त्याचा उपयोग वनस्पतींना चांगलाच होतो. टुंड्रा प्रदेश मराठीवनस्पती : येथील हवामान सूचिपर्णी वृक्षांच्या वाढीस अनुकूल आहे. झाडांची पाने जाड, सुईसारखी अणकुचीदार, अरूंद व स्निग्ध असतात. यामुळे बाष्पोत्सर्जनावर नियंत्रण राखले जाऊन झाडातील पाणी कमी प्रमाणात शोषले जाते. झाडांची खोडे आतून नरम परंतु जाड सालीची असतात. त्यामुळे दहिवरापासून झाडांचे रक्षण होते. झाडांच्या फांद्या जमिनीकडे वाकलेल्या असतात. त्यायोगे हिवाळ्यात पडणारे हिम झाडावरून घसरून खाली पडते. झाड बुंध्याशी मोठे व शेंड्याकडे निमुळते होत गेलेले असते. निमुळत्या शेंड्यामुळे या प्रदेशातील सोसाट्याच्या वाऱ्यापासून झाडे उन्मळून न पडता उभी राहतात. झाडांची फळे शंकाकृती व टणक असतात. त्यावर हवेचा परिणाम मंद गतीने होतो. झाडांची मुळे जमिनीलगत पसरलेली आढळतात. त्यामुळे हिवाळा संपल्यानंतर जेव्हा पृष्ठभागावरील बर्फ वितळते तेव्हा झाडांना लगेच पाणी उपलब्ध होऊ शकते. हिवाळा संपताच वा थोडा प्रकाश मिळताच प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुरू होते.

Comments Niraj waghchaure on 29-12-2020

Tundra Pradeshtat vanaspati alpakal tikanare asate give reason

Netaji raut on 12-05-2019

Tundra pradesh kaha pe hai

रोहित राजकुमार ठेंगे on 12-05-2019

टुंड्रा आणि तैगा प्रदेशात वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे 1970 पासून या आगी लागण्याचा घटकांमध्ये किती वाढ झाली आहेआप यहाँ पर टुंड्रा gk, मराठी question answers, general knowledge, टुंड्रा सामान्य ज्ञान, मराठी questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment