Maharashtra Vidhaan Parishad उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती

महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती



GkExams on 14-11-2018


महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाऴकर, उपसभापती वसंतराव डावखरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह 11 सदस्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाल 7 जुलै 2016 रोजी पूर्ण होत आहे. या सदस्यांचे हे या कार्यकालातील शेवटचे अधिवेशन असल्याने आज विधान परिषद सभागृहात या सदस्यांना निरोप देण्यात आला.


या वेळी या सदस्यांविषयी आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत सातारा जिल्ह्याने नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा सातारा जिल्ह्याचे रामराजे नाईक-निंबाळकर हे सुपुत्र आहेत. त्यांनीदेखील आमदार, मंत्री, कृष्णा खोरे प्रकल्प आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे आणि जनतेचे जिव्हाळ्याचे नाते आहे. कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मा. सभापती रामराजे निंबाळकर आणि माझी 1995 साली एकाच वेळी विधानसभेवर निवड झाली, तेव्हापासून माझे आणि त्यांचे चांगले नाते आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधक यांच्यात मध्य साधत सभागृह सुरळीत चालविण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला.’ त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्व सदस्यांना झाला असून त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन सर्वांना मार्गदर्शन करावे अशी भावना यावेळी तटकरे यांनी व्यक्त केली.


उपसभापती वसंतराव डावखरे यांच्याविषयी बोलताना Sunil Tatkare म्हणाले, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सर्वाधिक काम पाहण्याची संधी वसंतराव डावखरे यांना मिळाली. त्यांच्या या अनुभवाचा फायदा सभागृहाला झाला. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबध आहेत. त्यामुळे जेव्हा केव्हा पेचप्रसंग निर्माण झाले तेव्हा त्यांनी मार्ग काढला आहे. त्यांच्या कामाचा व अनुभवाचा फायदा सभागृहाला व्हावा यासाठी त्यांनी पुन्हा एकदा सभागृहात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना, ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पक्षातर्फे वसंत डावखरे यांना उमेदवारी दिली असल्याची माहितीही सुनील तटकरे यांनी यावेळी दिली.


विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविषयी भावना व्यक्त करताना तटकरे पुढे म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याकडे लढाऊ वृत्ती, बाणेदारपणा आहे, आपली भूमिका अभ्यासू व आक्रमकपणे मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे. त्यांनी अल्पकाळातच विरोधी पक्षनेता म्हणून विधान परिषद सभागृहात व सभागृहाच्या बाहेर छाप पाडली. आक्रमकता व प्रभावी वक्तृत्वाद्वारे त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचे काम यशस्वीरीत्या केले.


ज्यावेळी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाची निवड करावी याच्या चर्चेसाठी आदरणीय पवारसाहेबांनी पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक बोलावली होती, त्या वेळी बैठकीस उपस्थित सर्व नेत्यांनी एकमताने धनंजय मुंडे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असे सुचवले होते, अशी आठवण त्यांनी जागवली. दाखवलेला विश्वास Dhananjay Munde यांनी सार्थ ठरविला असून पुन्हा एकदा त्यांनी सभागृहात येऊन जबाबदारी सांभाळावी, अशी अपेक्षाही तटकरे यांनी व्यक्त केली.


पक्षाचे सदस्य आमदार प्रकाश बिनसाळे यांच्याविषयी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, प्रकाश बिनसाळे यांना मुंबई, कोकणच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. या प्रश्नांना सभागृहात न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपली भूमिका त्यांनी नेमकी आणि प्रभावीपणे नेहमीच मांडली. त्यांचे राजकीय व सामाजिक काम यापुढेही चालू राहावे. त्यांनी पुन्हा सभागृहात यावे, अशा शुभेच्छा या वेळी तटकरे यांनी त्यांना दिल्या.


यावेळी कार्यकाल पूर्ण होत असलेले सदस्य ना. दिवाकर रावते, ना. सुभाष देसाई, आ. मुझफ्फर हुसेन, आ. विनायक मेटे, आ. विजय सावंत, आ. शोभाताई फडणवीस, आ. दिप्ती चौधरी यांच्याविषयीही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.⁠⁠




सम्बन्धित प्रश्न



Comments



नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment