Rahul Dravid MaRaathi माहिती राहुल द्रविड़ मराठी माहिती

राहुल द्रविड़ मराठी माहिती



GkExams on 28-12-2018


20 जून 1996 हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीयच म्हणावा लागेल. क्रिकेटच्या क्षितिजावर यानंतर बरीच वर्षे झळकत रहाणारे दोन तारे या दिवशीच आपली पहिली कसोटी खेळले. तेही क्रिकेटची पंढरी म्हटली गेलेल्या लॉर्डस मैदानावर! त्यांची नावं होती सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड!


हे दोघेही एकत्रच पदार्पण करत असले तरी त्यांची पार्श्वभूमी खूप वेगळी होती.


राजघराण्यातील गांगुलीला 1992 साली संघात 12 वा खेळाडू म्हणून स्थान मिळालं होतं, पण काही कारणामुळे तो बाहेर फेकला गेला आणि आता परत त्याला संधी मिळत होती. पण राहुल द्रविड मात्र देशांतर्गत क्रिकेटमधल्या दर्जेदार कामगिरीमुळे आणि भक्कम तंत्रामुळे जाणकाराच्या मनात आपल स्थान निर्माण करून संघात आला होता.


आपल्या पहिल्याच सामन्यात त्या लॉर्डसच्या खेळपट्टीवर 95 धावा काढून राहुलने आपल्या आगमनाची दमदार बातमी दिली. पण दुर्लक्षित केले जाण्याची सुरवातही इथूनच झाली. याच सामन्यात सौरभ गांगुलीने तडाखेबाज 133 धावा केल्या आणि त्यामुळे राहुलची खेळी झाकोळली गेली. आजही लॉर्डस टेस्ट म्हटली की लोकांना गांगुलीचे 133 आठवतात पण द्रविडचे 95 नाही आठवत.


हीच गोष्ट द्रविडच्या करिअरमध्ये वारंवार घडत राहिली.


भारताने मिळवलेला असाच एक अविस्मरणीय विजय म्हणजे कोलकाता टेस्ट! ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात तगड्या गोलंदाजी विरुद्ध द्रविडने 180 रन्स काढून भारताला फॉलोऑन नंतरही विजय मिळून देण्यात सिंहाचा वाट उचलला, पण इथेही व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने काढलेल्या 281 रन्स आणि हरभजनची गोलंदाजीच लोकांच्या लक्षात राहिली.


पण राहुल द्रविडने या गोष्टींकडे कधी लक्षच दिले नाही.

“संघासाठी आपलं 100 टक्के देणं” हे एकच काम तो इमाने इतबारे करत राहिला. मग ते संघाचा समतोल राखण्यासाठी 2003 च्या विश्वचषकात यष्टिरक्षण करणं असुदे नाहीतर 2012 च्या ऑस्ट्रेलियातील संघाच्या खराब प्रदर्शना नंतर वरिष्ठांनी निवृत्त व्हावे असा सूर निघाल्यावर सगळ्यात आधी निवृत्ती घोषित करणे असो.

राहुल द्रविडने संघाचाच विचार नेहमी पहिला केला.

सचिन तेंडूलकरचा समकालीन असल्यामुळे राहुल द्रविडचे महत्व कमी केले जाते. मात्र जर एकूणच क्रिकेटचा विचार केला, तर आकडेवारी सगळ सांगून जाते.

कसोटी क्रिकेटच्या जवळपास दीडशे वर्षांच्या मोठ्या इतिहासात राहुल द्रविडपेक्षा जास्त रन्स काढणारे फक्त 3 खेळाडू आहेत (त्यातील जॅक कॅलीस हा फक्त 1 धावेने पुढे आहे ). 164 सामन्यात 52.31 च्या सरासरीने 13288 धावा काढून राहुल द्रविड सर्वकालीन खेळाडूंमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे, तर शतकाच्या यादीत 36 शतके झळकावून तो 5 व्या स्थानी आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कठीण समजली जाणारी आणि अनेक दिग्गजांनी आपली छाप सोडलेली तिसऱ्या क्रमांकाची जागा राहुल द्रविडने आपलीशी केली होती.

राहुल द्रविडचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा भक्कम बचाव आणि संयम! षटका मागून षटके निर्धाव खेळण्यासाठी लागणारा संयम हेच त्याचं प्रमुख शस्त्र होतं.

पण नंतर हाच राहुल द्रविड एकदिवसीय सामन्यातही आपली आक्रमक फलंदाजी दाखू लागला.



rahul-dravid-marathipizza02


स्रोत


22 चेंडूत अर्धशतक करून त्याने आपण सर्वप्रकारच्या खेळात प्रवीण असल्याचे दाखवून दिले. कारकीर्दीच्या शेवटी शेवटी तर 20-20 सामन्यातही द्रविडच्या फलंदाजीची जादू चालू लागली होती.


एकदिवसीय सामन्यात राहुल द्रविडने बरीच वर्ष भारताच प्रतिनिधित्व केले. पण एकदिवसीय संघात तो स्थिरावला नाही. एक ते सात या सगळ्या स्थानांवर त्याला फलंदाजी करावी लागली. संघासाठी काहीही करणाऱ्या राहुल द्रविडने कधीच याची तक्रार केली नाही.

सचिनला 2007 च्या विश्वचषकात जेव्हा 4 थ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागले तेव्हा त्याने आपली नाराजी सरळ व्यक्त केली होती. पण सातव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागूनही कधीच राहुल द्रविडने तक्रार केली नाही.

कर्णधार पदाचा काटेरी मुकुटही त्याने काहीकाळ सांभाळला. पण मितभाषी द्रविडला ते ओझं जड जाऊ लागलं. त्याचा खेळ खालावू लागला. तेव्हा त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.



rahul-dravid-marathipizza03


स्रोत


2011 च्या इंग्लंड दौऱ्यात पूर्ण संघ ढेपाळत असताना एकटा राहुल द्रविड शतका मागून शतके मारत होता.




सम्बन्धित प्रश्न



Comments Sex kese kare on 19-09-2021

kese kare

shreyaj on 15-11-2020

facts about rahul dravid in Marathi





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment