नल दमयंती कथा मराठी

Nal Damyanti Katha MaRaathi

GkExams on 26-12-2018

दमयंती— विदर्भ देशच्या भीम राज्याची कन्या व नलाची स्त्री. तिनें आपल्या अद्वितीय सौंदर्याने सर्व सुंदर स्त्रियांचा गर्व हरण केला म्हणून तिला 'दमयंती' असे नांव पडले. एका सोन्याच्या वर्णाच्या हंसाकडून तिने नलराजाचे गुण ऐकले व त्या हंसामार्फत तिने आपले प्रेम नळाला कळविले. पुढें स्वयंवर होऊन त्यांत जमलेल्या इंद्र, अग्नि, यम, वरुण वगैरे देवांनांहि अव्हेरुन तिने नलाला वरिलें. पण त्यांना राज्यसौख्य फार वर्षे लाभलें नाही. कारण पुढें द्यूतामध्यें नळ आपलें सर्व ऐश्वर्य व राज्य हरला. त्यामुळें नल व दमयंती यांना एकेक वस्त्रानिशी वनांत जावे लागलें. या वनवासांतहि त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्यामुळें वैतागून नल दमयंतीला ती निजलेली असतां सोडून गेला. तेव्हां ती आपल्या बापाच्या घरी येऊन राहिली व नलाचा शोध न लागल्यामुळें तिच्या बापाने तिचें पुन्हां स्वयंवर करण्याचें जाहीर केलें. त्याच प्रसंगास नल परत येऊन त्यांचे पुढील आयुष्य पूर्ण सुखांत गेले.

अशा तर्‍हेची नलदमयंतीची मूळ कथा महाभारतांत (वनपर्व अध्याय 76) असून रघुनाथपंडिताचें मराठी 'नलदमयंती' आख्यान फार सुरस आहे. दमयंतीच्या दुसर्‍या स्वयंवराबद्दलचा वादविवाद रा. ब. चिंतामणराव वैद्य यांनी 'महाभारताचा उपसंहार' (पृष्ठ 207) यामध्यें केला आहे.Comments sindhy on 28-10-2020

मंत्र चाअर्थ मंत्र लेणत (नलदमयंतीआप यहाँ पर नल gk, दमयंती question answers, कथा general knowledge, मराठी सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment