Pune Shahar माहिती MaRaathi पुणे शहर माहिती मराठी

पुणे शहर माहिती मराठी



Pradeep Chawla on 24-10-2018


पुणे जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध

आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण प्रचलित आहे - पुणे तिथे काय उणे.

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा

इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून

ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर नैर्ऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे.









अनुक्रमणिका



  • 1शिक्षण
  • 2विशेष
  • 3ऐतिहासिक महत्त्वाचे
  • 4भूगोल
  • 5प्रसिद्ध व्यक्ती
  • 6उद्योगधंदे
  • 7ग्रंथालये
  • 8शेती
  • 9प्रेक्षणीय स्थळे

    • 9.1ऐतिहासिक
    • 9.2तालुक्यानुसार


  • 10तालुके
  • 11राजकीय संरचना
  • 12शेती
  • 13दळणवळण
  • 14संदर्भ आणि नोंदी






शिक्षण

जगप्रसिद्ध पुणे विद्यापीठ पुणे शहरात असून पुण्यास पूर्वेचे ऑक्सफर्ड असेही म्हणतात.



विशेष

अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्‍या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्‍याया संत ज्ञानेश्वर

महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला

अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय

सुगम भाषेत सांगणार्‍या संत तुकारामांची,

पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर

झाला होता.



संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आणि संत तुकारामांचा जन्म व त्यांची

साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून

एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला

पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या

पालख्या लाखो वारकर्‍यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान

करतात.



शिवाजीच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे

राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार्‍या अनेक

संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे

माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात

उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे

लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.



पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हटले जाते. परंतु पुणे

शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते.

प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील

मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे.शहरातील

प्रयास हि स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.



ऐतिहासिक महत्त्वाचे

हिंदवी

स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत

जागृत करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे

शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. 1630

(संदर्भ : शहर पुणे, खंड-2 , पृष्ठ 576) या दिवशी छत्रपती शिवाजी

महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. इ.स. 1641 पासून शिवाजी महाराज व जिजाबाई यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. खेड शिवापूर येथे व पुण्यातील लाल महाल

येथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इ.स. 1645 मध्ये महाराजांनी तोरणा

(तालुका- वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. 1645 ते

1648 या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील कोंढाणा, राजगड व पुरंदर हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले. पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, पुरंदर, भोर, मावळ, मुळशी व वेल्हे हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.



पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्वनाथ

यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी

प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या 1720 ते 1740 या काळातील

उज्ज्वल कारकीर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात 1731 मध्ये

शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात

भर टाकली. शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची

निर्मिती केली, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.



थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे

यांच्या काळात (इ.स.1740-1761- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर

हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण

विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली.

पुण्याच्या सुशोभीकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची

निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. कात्रज

तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी

पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईतील मुत्सद्दी राजकारणी नाना

फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. 1774 ते 1795 या

काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व

फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई

टिकवण्याचा प्रयत्‍न केला. पण 1800 साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर

पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. 1818 मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला. पुढील काळात, 1818मध्ये शनिवारवाड्यावर इंग्लंडचा युनियन जॅक फडकवला गेला.



भूगोल

पुणे जिल्ह्याच्या सीमा



  • उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा,
  • आग्नेयेस सोलापूर जिल्हा,
  • दक्षिणेला सातारा जिल्हा,
  • पश्चिमेला रायगड जिल्हा
  • वायव्येला ठाणे जिल्हा आहे.


पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. - भीमा नदी ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे. भीमेचा उगम भीमाशंकर (ता. खेड) येथे होतो.



इतर नद्या पुढीलप्रमाणे - इंद्रायणी नदी, कर्‍हा, कुकडी नदी, घोड नदी, नीरा, पवना नदी, मांडवी, मीना, भामा, मुठा नदी, मुळा नदी



पहा : जिल्हावार नद्या



प्रसिद्ध व्यक्ती









पुणे जिल्ह्याचा नकाशा






छत्रपती शिवाजी महाराज, पु.ल. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, शरद पवार, पद्मश्री डी.जी.केळकर, पं. भीमसेन जोशी, डॉक्टर अप्पासाहेब पवार.



उद्योगधंदे

महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे माहिती-तंत्रज्ञान संस्था एकटवल्या आहेत. पिंपरी चिंचवड ह्या पुण्याच्या जुळ्या शहरात बजाज, टेल्कोसह अनेक मोठे उद्योग आहेत. मुंबई

नंतर पुणे हे राज्यातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर आहे.

पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणाऱ्या महामार्गावरील

पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर

हे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात लोणी देवकर (इंदापूर),

आबी, उर्से, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, टाकवे, पिंपरी-चिंचवड, बारामती,

बेबडओहळ, भोसरी, रांजणगाव व हिंजवडी येथे बर्‍याच औद्योगिक वसाहती आहेत.



ग्रंथालये

पुणे

जिल्ह्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या 562 असून

त्यांशिवाय संस्थांची अनेक ग्रंथालये असून इतरही बरीच खासगी ग्रंथालये

आहेत.



शेती

जिल्ह्यात

तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (माती) आढळते.

पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपीकता वाढत जाते. पूर्वेकडील

बारामती व इंदापूर तालुक्यांतली प्रामुख्याने काळी आहे.



जिल्ह्यातील मुख्य पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.













































क्र.तपशीलक्षेत्र (हेक्टर्स)
1लागवडीखालील जमीन998522
2जिरायत756118
3बागायत242404












































क्र.हंगाममहत्त्वाचे पीक
1खरीपबाजरी, तांदूळ
2रब्बीगहू, हरभरा
3खरीप व रब्बीज्वारी





ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी

पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक

तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच मावळ तालुक्यातील इन्द्रायणी

तांदूळ प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यात एकूण 11 साखर कारखाने आहेत. त्यांची

सूची पुढे दिली आहे.





























































































































क्र.कारखान्याचे नावगाव, तालुका
1श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखानाशिरोली, जुन्नर
2संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखानाहिंजवडी, मुळशी
3राजगड सहकारी साखर कारखानानिगडे, भोर
4घोडगंगा सहकारी साखर कारखानान्हावरे, शिरूर
5भीमा सहकारी साखर कारखानामधुकरनगर, दौंड
6सोमेश्र्वर सहकारी साखर कारखानासोमेश्र्वर, बारामती
7माळेगाव सहकारी साखर कारखानामाळेगाव, बारामती
8श्रीछत्रपती सहकारी साखर कारखानाभवानीनगर, इंदापूर
9इंदापूर सहकारी साखर कारखानाबिजवडी, इंदापूर
10यशवंत सहकारी साखर कारखानाथेऊर, हवेली
11भीमाशंकर सहकारी साखर कारखानाअवसरी बुद्रुक, आंबेगाव


भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन उरळीकांचन (बाएफ) (हवेली) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.



प्रेक्षणीय स्थळे

आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत.



अष्टविनायकांपैकी

पाच गणपती : महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे.

विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ

महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी

पाच स्थाने पुणे जिल्हात आहेत:- चिंतामणी (थेउर)-थेऊर,महागणपती (रांजणगाव)-रांजणगाव, मोरेश्वर (मोरगाव)-मोरगाव, विघ्नहर (ओझर)-ओझर, गिरिजात्मज (लेण्याद्री)-लेण्याद्री - हे ते पाच विनायक होत.



जेजुरी :

श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे

स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक

येतात. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा

असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे

गर्दी करतात.खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार हा खंडोबाचा गजर

महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद)

मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे बारामती तालुक्यात असून

पुण्यापासून 50 कि.मी. अंतरावर आहे. येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ 15

कि.मी. अंतरावर आहे.



भीमाशंकर :

भारतातील बारापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात,

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी

संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा

प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा - भीमा नदीचा -

उगम होतो.



भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही मोठी खार आढळते. शेकरू (Giant Squirrel)

ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात

चमकणारी वनस्पती आढळते.



उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपती व ग्रामदेवता-तांबडी जोगेश्वरीचे मंदिर, चतु:शृंगीचे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील कानिफनाथ मंदिर, चिंचवड

येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत

ज्ञानेश्र्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील

एका दगडात कोरलेले, आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर,

पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर, कार्ले - भाजे येथील लेणी, वानवडी येथील

महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रातील

किल्ले आपल्याला इतिहासाकडे नेतातच, त्याचबरोबर पर्यटनाचा, प्रसंगी

गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठीही साद घालतात.






ऐतिहासिक

  • शनिवारवाडा - (पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक. पहिल्या बाजीरावाने बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती).
  • लाल महाल - (दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला हा महाल शनिवारवाड्याजवळ आहे. शिवाजी महाराज व जिजाबाई येथे वास्तव्यास होते).
  • इतर- शिंदे छत्री, विश्रामबाग वाडा, आगाखान पॅलेस, दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय.


तालुक्यानुसार









शनिवारवाडा






  • हवेली तालुका - देहू(संत तुकाराम महाराज मंदिर), कसबा गणपती, चतु:शृंगी, सिंहगड किल्ला, खडकवासला धरण, पानशेत धरण, माळशेज घाट, सारस बाग, ओशो पार्क
  • खेड(राजगुरुनगर) तालुका - (आळंदी ज्ञानेश्वर समाधी), भीमाशंकर अभयारण्य, भीमाशंकर,चास कमान धरण,राजगुरुनगर भुईकोट किल्ला
  • मावळ तालुका - लोणावळा, खंडाळा, राजमाची, कार्ला लेणी भाजे लेणी, भुशी डॅम
  • बारामती तालुका - मोरगावचा मयूरेश्वर
  • पुरंदर तालुका - जेजुरी, नारायणगाव, सासवड, लोहगड, भुलेश्वर
  • शिरुर तालुका - वढू तुळापूर (संभाजी महाराजांची समाधी)
  • वेल्हे तालुका - राजगड, तोरणा किल्ला,लिंगाणा,मढेघाट
  • आंबेगाव तालुका - डिंभे धरण
  • भोर तालुका - बनेश्वर भाटघर धरण
  • दौंड तालुका - बहादुरगड, मालठण, कुरकुंभ
  • जुन्नर तालुका - शिवनेरी (शिवाजी महाराजांचे जन्मस्थान), ओझर


तालुके

पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे तालुके आहेत :



  1. जुन्नर
  2. आंबेगाव
  3. खेड
  4. मावळ
  5. मुळशी
  6. हवेली
  7. वेल्हे
  8. भोर
  9. पुरंदर
  10. बारामती
  11. इंदापूर
  12. दौंड
  13. शिरूर
  14. पुणे शहर


राजकीय संरचना

लोकसभा मतदारसंघ ( 4 ) : पुणे ,बारामती,शिरूर व मावळ.

् (मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या

विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे विधानसभा

मतदारसंघ समाविष्ट आहेत.)



विधानसभा मतदारसंघ (21) : जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी , भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटॉन्मेंट व कसबा पेठ.



जिल्ह्यात 75 जिल्हा परिषद मतदारसंघ असून 150 पंचायत समिती मतदारसंघ आहेत.



या जिल्ह्यात 1,401 ग्रामपंचायती आहेत.



शेती

जिल्ह्यात

तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते.

पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील

बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.



ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी

पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक

तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.



दळणवळण

पुणे-मुंबई

हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग (एक्सप्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख

वैशिष्ट्य आहे. मुंबई - बंगलोर(राष्ट्रीय महामार्ग क्र. 4) पुणे -

हैद्राबाद(राष्ट्रीय महामार्ग क्र. 9) व पुणे-नाशिक(राष्ट्रीय महामार्ग

क्र. 50) हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. उपरोक्त

महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्यात अनेक घाट आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम

सीमेवर असलेल्या घाटांमुळे कोकण व मुंबई हे भाग पुणे जिल्ह्याला जोडले गेले

आहेत.



देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा पुणे-मुंबई लोहमार्ग हा

जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा लोहमार्ग आहे. ब्रिटिश काळातच हा लोहमार्ग

बांधला गेलेला आहे. खंडाळा, लोणावळा ही जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थाने याच

मार्गावर आहेत. अनेक द्रुतगती रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दरम्यान दररोज

धावतात. मुंबई-कोल्हापूर हा रेल्वे मार्गही पुणे जिल्ह्यातून जातो.

भारतातील अनेक मोठी शहरे पुण्याला रेल्वेच्या माध्यमातून जोडली गेली असून

पुण्याजवळील खडकी हे लष्करी केंद्रही रेल्वेने जोडले गेले आहे.

पुणे-दौंड-बारामती हा रुंदमापी मार्गही जिल्ह्यात असून पुणे व दौंड ही

जंक्शन्स जिल्ह्यात आहे.



पुणे येथे लोहगाव विमानतळ हा राष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या येथून दुबई,

सिंगापूर, अबू धाबी, फ्रँकफर्ट आदी ठिकाणी जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेवाही

उपलब्ध आहेत.




सम्बन्धित प्रश्न



Comments SHRIDEEP LONDHE on 08-04-2022

Pune collector





नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment