आपण Naveen Bharat Nirmann करण्यासाठी Kaay Yogdan देऊ शकतो Nibandh आपण नवीन भारत निर्माण करण्यासाठी काय योगदान देऊ शकतो निबंध

आपण नवीन भारत निर्माण करण्यासाठी काय योगदान देऊ शकतो निबंध



GkExams on 02-01-2019


काळ्यारात्रीला पार पडून शुभ सकाळ होते. सकाळी शेतकरी रानाकडे जातो. व्यापारी धनाकडे जातो. विद्यार्थी ज्ञानाकडे जातो. थोडक्यात काय तर माणूस आपल्या जगण्याकडे जातो. माणूस जगात असताना सतत नाविन्याचा ध्यास घेत असतो. त्यासाठी विविध तंत्रांचा शोध घेत असतो. अगदी अनादी काळापासून तो नाविन्याचा शोधात आहे. अशा नावीन्यातून नवं तंत्र विकसित होत असतं. अशा तंत्रातून तो आपलं जगणं अधिकाधिक सुकर करत असतो. म्हणजेच तो आपल्या गावाच्या विकासासाठी नवतंत्रज्ञानाच्या उपयोगाविषयी आपण माहिती घेऊयात.


ग्रामगीतेमध्ये तेराव्या अध्यायातील 103 आणि 104 व्या ओव्यांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे.


“ सुंदर असावे वाचनालय! नाना ग्रंथ ज्ञानमय!


करावया सुबुद्धीचा उदय! गाव लोकी!!


काय चालले जगामाजी! कळावे गावी सहजासहजी!


म्हणोनी वृत्तपत्रे असावी ताजी!


आकाशवाणी त्याठायी!!


गावाला जगामध्ये काय चालले आहे याची माहिती व्हावी आणि त्यासाठी आकाशवाणीचा उपयोग करावा असे तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा गावाच्या विकासासाठी उपयोग करण्याचे महत्त्व तुकडोजी महाराजांनी विषद केले आहे.


अलीकडच्या काळात माहिती, तंत्रज्ञान आणि संवादाच्या क्षेत्रात अमुलाग्र क्रांती झाल्याचे आढळून येत आहे. याचाच उपयोग ग्रामीण विकासात करून घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विविध उपयोगांकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून गावांचा विकास घडून येत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषीक्षेत्रात तर दखलपात्र बदल घडून येत आहे. प्रथम कृषीक्षेत्रातील काही नव्या तंत्रांची माहिती घेतली पाहिजे.


अलीकडच्या दशकात शेतीमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. नॅनो म्हणजे छोटा. 80 च्या दशकात जन्म घेतलेल्या नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वनस्पतींमधील सुप्त गुणांवर प्रयोग करून जाती विकसित करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश प्राप्त झाले आहे. नॅनो चिप्सच्या सहाय्याने वनस्पतीमध्ये असणारी विविध जनुके चाचणी केली जाते. त्यातून कोणते जनुक वनस्पतीच्या चांगल्या स्थितीत व आजारपणाच्या काळात स्थिरावते किंवा क्रियाशील राहते याची कल्पना येते. या नॅनोतंत्राचा वापर करून पिकांवर पडणाऱ्या किडी आणि रोगाचे नियंत्रण करता येते. नॅनो यंत्र अथवा नॅनो उपकरणे यांच्या माध्यमातून वनस्पतीची सुदृढता करून घेता येते. यात तंत्राच्या सहाय्याने रासायनिक खतांचा मर्यादित ओहोन आरोग्यावर होणारा परिणाम व जमिनीचे प्रदूषण कमी करण्यास मदत होते. तसेच पिकांच्या उत्पादन क्षमतेच्या वाढीसाठीही या तंत्राची मोठी मदत होते. भाजीपाला साठवण व त्यावरील प्रक्रियेसाठी या तंत्राचा उपयोग करण्यात येतो. ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत तर होतेच मात्र त्यातून गावातील शेतकऱ्यांचा आणि पर्यायाने गावाचा विकास साधण्यास मदत होते. याशिवाय लेसरचा वापर करून शेताचे सपाटीकरण, शेतात रेन वॉटर, हार्वेस्टिंग, जमिनीचे परीक्षण करण्याची पोर्तेबल कीट वापरणे इत्यादी देखील नळ्या तंत्रज्ञानाचे कृषी क्षेत्रातील उपयोगाची उदाहरणे देता येतील.


शेतीमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या वापराला देखील नळ्या तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य झाले आहे. सौर उर्जेचा उपयोग पाणी गरम करणे, पदार्थ शिजविणे याबरोबरच रात्रीच्या वेळी प्रकाश निर्माण करण्यासाठी होतो. अलीकडच्या संशोधनाने आता पिके, फलोत्पादन, खुली कोठारे, कृषीभवने इत्यादींचे संरक्षणासाठी सुद्धा सौरउर्जेचा वापर करणे शक्य झाले आहे. “ सौर फोटोव्होटाईक विद्युत कुंपण” या तंत्राद्वारे हे संरक्षण करता येऊ शकते. यामध्ये रक्षित करावयाच्या क्षेत्रात दिलेल्या कुंपणामध्ये सौरऊर्जेद्वारे सौम्य प्रमाणात वीज प्रवाहित केली जाते. ज्याद्वारे रानटी जनावरे, गुरेढोरे इत्यादींनी विद्युत कुंपणाला स्पर्श केल्याबरोबर त्यांना 0.0003 सेकंद एवढा विद्युत धक्का जाणवतो. शिवाय ज्यातून कुंपणाला कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही. मात्र ती जनावरे पुन्हा त्या कुंपणाला स्पर्श करत नाहीत. आणि आपले क्षेत्र त्यांच्यापासून सुरक्षित राहते. या तंत्राला “सौर कुंपण” म्हणूनही संबोधले जाते.


एखाद्या रोगाची लागण कोणत्याही प्रदेशात झाली तरी त्यावर त्या ठिकाणी वेळोवेळी केलेल्या योग्य आणि यशस्वी उपाययोजनेबाबतची माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. ज्यामुळे आपल्याकडे तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर त्या उपाययोजनांची माहिती घेता येऊ शकते. तसेच अधिक प्रयोगशील शेतकऱ्यांना नवे प्रयोग राबविण्यासाठी मोठी मदत होते. याशिवाय दररोजचे हवामान, वेधशाळेचा पावसाचा अंदाज इत्यादी माहितीदेखील आपण इंटरनेटच्या सहाय्याने प्राप्त करून घेऊ शकतो.


संगणक, मोबाईल, आणि टॅबलेट्स इत्यादी साधने म्हणजे तर नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कारच म्हणावा लागेल. संगणकाने माणसाचं जगणंच समृद्ध झालं आहे. संगणकाच्या सहाय्याने विविध कामे करून गावातील बेरोजगारांना नवा उद्योग मिळू लागला आहे. यातून गावामध्येच व्यवसायाच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. तसेच गावात राहत असतानाचा शेती किंवा एखादा जोडधंदा करीत असतानाच शैक्षणिक पात्रता वाढविणे शक्य झाले आहे. असे अभ्यासक्रम पूर्ण करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ज्यायोगे गावातील युवकांना उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणे शक्य झाले आहे. अल्प भांडवलात आपल्यालाच गावामध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र उभे करता येऊ शकते. ज्यातून नवा व्यवसाय निर्माण होऊ शकतोच आणि गावाला संगणकाने ज्ञान दिल्याचे समाधानही मिळू शकते.


गावातील आठवडी बाजारातही आता तंत्रज्ञानाची जोड देता येणे शक्य होऊ लागले आहे. आपल्या उत्पादनाची माहिती संगणकाच्या सहाय्याने इंटरनेटद्वारे जगासमोर मांडता येते. यामुळे व्यापाऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादनांची माहिती संगणकाच्या पडद्यावर पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा जन्म मालासारखा अधिक माला लोकांपर्यंत पोहचविता येणे शक्य झाले आहे. तसेच यातून उत्पादित मात्र लवकरच विकला जाण्याची शक्यता वाढली आहे.


गावात काम करणाऱ्या शासन नियुक्त प्रतिनिधींना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठीसुद्धा नव्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे.


संगणकाच्या मदतीने गावामध्येच बसून आता आपण आपल्या रेल्वे प्रवासाचे, बस प्रवासाचे आरक्षणही करू शकतो. ज्यामुळे आपला वेळ आणि श्रम वाचतात. यापलीकडे जाऊन गावाबाहेर असणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या विकासात समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना गावातील परिस्थिती, हवामान, पीक-पाऊस, गावातील एखादी घटना इत्यादी माहितीच्या देवाणघेवाणीकरिता ई-मेलचा, एस एम एस चा, मोबाईलचा वापर करणे शक्य झाले आहे. ज्याजोगे बाहेरून येणारे किंवा गावाबाहेर असलेल्या व्यक्तींना गावाशी जोडल्याचे समाधान तर मिळतेच. याशिवाय गावासाठी काही मदत, सहकार्य करावयाचे असल्यास त्यांना त्यांच्या कामात उपयोग होऊ शकेल. याशिवाय गावातील संगणक प्रशिक्षित वर्ग मिळून गावाची संपूर्ण अद्ययावत माहिती देणारा ब्लॉग तयार करू शकतो. ज्यातून गावाची वर्ग मिळून सर्व माहिती एकाच ठिकाणी संगणकाच्या पडद्यावर कोणालाही पाहता येऊ शकेल. ज्यातून आपल्या संपर्कात नसलेल्या गावकऱ्यांपर्यंतही आपली माहिती पोहचू शकते. आणि त्यांनाही निरनिराळ्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी हातभार लावता येऊ शकेल.


आता एवढी सारी साधनं आपल्याकडे असतांना केवळ त्यांना सुयोग्य वापर करणं महत्वाचं आहे. चला तर मग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूयात आणि आपल्या गावाचा विकास साधुयात.




सम्बन्धित प्रश्न



Comments



नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment